Vakyanche Prakar
मराठी जग

Types of Sentence in Marathi |वाक्य व त्यांचे प्रकार

Types of Sentence in Marathi |वाक्य व त्याचे प्रकार : Vakyanche Prakar in Marathi, Vakya ke bhed in Marathi.

या लेखात आपण वाक्य म्हणजे काय?, वाक्य कसे बनले जाते?, वाक्यात येणाऱ्या शब्दांचे प्रकार किती आहेत?, वाक्यातील शदांचे महत्व काय? हे आणि अशा बऱ्याच प्रश्नांचे उत्तरं, आज आपण येथे मिळविणार आहोत. वाक्यरचनेचे किती प्रकार पडतात? विद्यार्थी वाक्य मराठी, वाक्याचा प्रकार ओळखा, विधानार्थी वाक्याचे उदाहरण, मराठी वाक्य रचना पाहणार आहोत.

सर्वात अगोदर वाक्य म्हणजे काय. ?

मराठी भाषेची सुरुवात ही स्वर आणि व्यंजन यापासून होते. स्वर व व्यंजन मिळून अक्षर तयार होते. अक्षरं एकत्र येऊन शब्द तयार होतात. अश्या शब्दांच्या रचना करून तयार केलेल्या अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात.

➦ वाक्यात शब्दांची रचना अर्थपूर्णअसेल तरच त्याला आपण वाक्य असे म्हणतो.
➦ कोणतेही शब्द कसेही जोडले आणि त्यातून अर्थ बोध होत नसेल तर ते कितीही शब्द असतील तर त्यास वाक्य म्हणता येणार नाही.
➥ या शब्दाचा संचामध्ये कर्ता, कर्म, प्रश्न, उद्गार, आज्ञा आणि कधीकधी एक किंवा अधिक गौण वाक्य असतात. हे वाक्य पूर्णविराम किंवा प्रश्नचिन्हासह समाप्त होते.
➦ अर्थपूर्ण वाक्यातील प्रत्येक शब्दाचा संबंध त्याच्या इतर शब्दांशी असतो. वाक्यातील या शब्दाच्या संबंधा मुळेच आपल्याला त्या वाक्याचा पूर्ण अर्थ कळतो.
➥ वाक्यातील अश्या शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत,
शब्दांच्या या आठ जातीं पैकी चार विकारी व चार अविकारी जाती होतात.
➥ विकारी शब्दांच्या जातीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे शब्द प्रकार येतात.
➥ तसेच अविकारी शब्दांच्या जातीमध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय.
➦ नाम व सर्वनाम हे वाक्यातील कर्ता असतात. कर्ता व क्रियापद हे वाक्यातील मुख्ये पद असतात. क्रियापदानुसार वाक्यात कर्म जोडलं जाते.
➦ जर वाक्यात क्रियापद सकर्मक असेल तर त्या वाक्यातील कर्म हे त्या वाक्यतील तिसरे महत्वाचा पद मानले जाते.

| Related : Types of Figure of Speech | All types with examples

वाक्याची रचना कशी करावी :

वाक्यात कोणते शब्द कोणत्या क्रमाने यावेत याबाबत खास असे कोणतेही नियम नाहीत किंबहुना ते असू शकतही नाहीत. कारण कोणते वाक्य कोणत्या भावनेने बोलले जाते यावर त्या शब्दांची क्रमवारी ठरली जाते. पण तरीही मगाशी सांगितल्या प्रमाणे, वाक्यातील एखाद्या शब्धचा संबंध दुसऱ्या जवळच्या शब्दाशी नक्की असला पाहिजे. हा संबंध असला तरच त्या वाक्याचा खरा अर्थ समाजाला जाईल. हे अर्थपूर्ण संबंध जोडण्यासाठीच वाक्यातील शब्दांची रचना योग्य पद्धतीने करावी लागते. शब्दांची हि रचना करण्यासाठी काही नियम ठरले आहेत. भाषेच्या या नियमांनाच व्याकरण असे म्हणजेत. कोणतीही भाषा, शुद्ध आणि अर्थपूर्ण बनविण्या साठी व्याकरणाचे नियम माहित असणे आवश्यक आहे.

➥ सर्व साधारण पणे कर्ता हा वाक्यात सुरूवातीला आला पाहिजे, विषेशण असल्यास ते कर्त्या सोबत जोडावे.
➦ क्रियापद आणि क्रियेचेप्रकार दर्शविणारे शब्द हे आपल्या क्रियाविशेषणासह वाक्याच्या शेवटी लिहावेत.
➥ कर्म वाक्याच्या मध्यभागी जोडावे.

➦ वाक्यात उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करण्यात आला असेल तर ते अव्यय ज्या दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडते त्याच्या अनुसंगाने मध्यभागी लिहिले जावे.
➥ वाक्यात केवलप्रयोगी अव्यय किंवा संबोध बोधक शब्दांचा उपयोग करावयाचा असल्यास ते वाक्याच्या सुरूवातीला करावे.
➦ अशा प्रकारे वाक्यात शब्दांची रचना केली जाते.

मराठीत वाक्याचे दोन प्रकार आहेत :

अ) अर्थावरून पडणारे प्रकार
आ) स्वरूपावरुन पडणारे प्रकार

) अर्थावरून वाक्याचे प्रकार :

१) विधानार्थी वाक्य : (Assertive Sentence)

ज्या वाक्यात कर्त्या सोबत साधारण विधान केले जाते, त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात.

या वाक्यात साधारण विधान म्हणजेच स्टेटमेंट (statement) केली जाते. हि वाक्ये होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतात. या वाक्यांच्या शेवटी पूर्णविराम दिला जातो.


उदा .
१) मी मराठी बोलतो.
२) भावी खूप छान आहे.
३) निल पुस्तक वाचतो.
४) आकाश स्वच्छ आहे.
५) घर खूप सुरेख आहे.
६) हे फळ सुंदर नाही — (नकारार्थी)

२) प्रश्नार्थी वाक्य : (Interrogative Sentence)

ज्या वाक्यात कर्त्याने प्रश्न विचारला जातो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.

साधारणतः सोमोरच्या वक्ती कडून आपल्याला उत्तर अपेक्षित असेल तर अशा वाक्यांचा उपयोग केला जातो. संवाद पुढे चालू राहण्यासाठी अशा वाक्यांचाच उपयोग होतो. हि वाक्येही होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतात. या वाक्यांच्या शेवटी प्रश्न चिन्ह ( ? ) लिहिणे आवश्यक असते.

उदा. :
१) तू अभ्यास केला का ?
२) तू गाणे कधी शिकलास ?
३) वेदांती कोणते चित्र काढते ?
४) स्वरा कोणत्या इयत्तेत शिकते ?
५) भाविक कोणता रंग आवडतो ?
६) तुला फळं का आवडत नाहीत ? — (नकारार्थी)

३) आज्ञार्थी वाक्य : (Imperative Sentence)

ज्या वाक्यामधून आज्ञा, उपदेश, विनंती, आशीर्वाद, प्रार्थना ई. भावनांचा बोध होतो त्या वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.

या वाक्यातील क्रियापदावरून वाक्यातून आज्ञा, प्रार्थना, विनंती, उपदेश, आशीर्वाद, हुकूम अशा भावना दिल्या किंवा केल्या जातात.

उदा.
१) देव तुझे कल्याण करो – आशीर्वाद
२) कोणी आवाज करू नका. -विनंती
३) हे ईश्वरा सर्वांचं कल्याण कर.- प्रार्थना
४) तो आवाज आधी बंद कर. – आज्ञा
५) कधी खोटे बोलू नये – उपदेश
६) उद्या हे काम झालेच पाहिजे – हुकूम

| Related : Synonyms in Hindi | समानार्थी शब्द | Samanarthi

४) उद्गारार्थी वाक्य :

ज्या वाक्यामध्ये कर्त्याच्या मनातील भावनां किंवा तीव्र इच्छा व्यक्त केल्या जातात, त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.

– या वाक्यातून आपण आनंद, दुःख, वेदना, आश्चर्य अशा अचानक होणाऱ्या तीव्र इच्छा व्यक्त करतो. या वाक्यांच्या शेवटी किंवा त्या शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह ( ! ) लिहिणे आवश्यक असते.

उदा.
१) अबब ! किती मोठा पराक्रम हा.
२) शाब्बास ! अखेर तू करून दाखवलंस.
३) वा ! तुझ्या सारखा तूच.
४) किती सुंदर हा धबधबा !
५) मी वैमानिक झलो तर !
६) हुरें ऽऽ ! आखेर आपण विजयी झालो.

) अर्थावरून वाक्याचे प्रकार : उप प्रकार आहेत.

१) होकारार्थी वाक्य :

ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्या वाक्यास होकारार्थी वाक्य असे म्हणतात .

– हि वाक्य विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी किंवा उद्गारार्थी ह्या सर्व प्रकारात येऊ शकतात.

उदा .
१) मला खेळायला खूप आवडते.
२) वेदांती अभ्यास करत आहे.
३) रुद्र आता खूप बोलू लागला आहे.
४) भारतीय संघाचा विजय झाला.
५) हे फुल खूप सुंदर आहे.
६) वाद-विवाद मिटवून टाका.

) नकारार्थी वाक्य :

ज्या वाक्यामधून स्पष्टपणे नकार दर्शविला जातो त्या वाक्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात.

-हि वाक्य विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी किंवा उद्गारार्थी ह्या सर्व प्रकारात येऊ शकतात.

उदा.
१) मला चहा आवडत नाही.
२) मला स्वस्थ बसने रुचत नाही.
३) आई कधी अराम करत नाही.

३) संकेतार्थी वाक्य :

जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली तर दुसरी गोष्ट घडेल असे संकेत दिले जातात, त्या वाक्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा.
१) जर मेहनत केली तरच यश मिळेल.
२) लक्ष देऊन काम केले असते तर नुकसान टळले असते.
३) जर यावर्षी पाऊस पडला तर चांगले पीक येईल.

४) विधार्थी वाक्य :

जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या स्वरूपावरुन कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा, तर्क किंवा अंदाज अशा गोष्टींचा बोध होत असेल तर अशा वाक्यास विधार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा.

१) तूच सामना जिकणार असे वाटते – शक्यता
२) मुलांनी आई वडिलांची सेवा करावी. – कर्तव्य
३) तू माझी साथ द्यावी असे माला वाटते – इच्छा
४) ते काम फक्त मराठेच करू शकतात. – योग्यता
५) आज कदाचित पाऊस येतील – अंदाज
६) बहुतेक आजपासून हे सर्व बंद होईल – तर्क

Marathi Numbers in words | Marathi Ank | मराठी अंक….

आ) स्वरूपावरुन/ रचनेवरून वाक्याचे प्रकार :

१) सरल (शुद्ध ) वाक्य :

ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व विधेय असतो, त्या वाक्यास सरळ किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात.

उदा.
१) भावी भात खाते.
२) अमित क्रिकेट खेळतो.
३) दिलीप पुस्तक वाचतो.
४) अनिल भाकरी खातो.
५) राज अभ्यास करतो.
६) मदन छान हसतो.

२) संयुक्त वाक्य :

जी दोन किंवा अधिक सरळ वाक्य ही उभयान्वि अव्ययांनी जोडली जातात, त्या वाक्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात.

उदा.
१) विजा चमकू लागल्या आणि वाराही सुटला.
२) देशात भ्रष्टाचार वाढला तशी बेकारी वाढली.
३) मी ते काम केले तसा वादही सुटला.
४) रस्ते मोठे झाले आणि गाड्याही वाढल्या.
५) विचार करत गेलो तसे कोडे सुटत गेले.
६) जसे बोलतो तसे वागत ही जा.

३) मिश्र वाक्य :

जेव्हा वाक्यातील एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य ही उभयान्वि अव्ययाने जोडलेली असतात, ते हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात.

उदा.
१) पुढे चांगलं शिकावं म्हणून तो शहरात गेला.
२) तो मुंबईला आला आणि प्रसिद्ध झाला.
३) सचिनने चांगले निर्णय घेतले म्हणून भारत जिंकला.
४) गाव स्वच्छ झालं आणि देशात झळकलं.
५) चांगली गुणांनी पास व्हावं म्हणून त्याने अभ्यास केला.

Short notes on birds | पक्षी हा संतुलित पर्यावरणाचं … Read more.

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार

➦ समूह दर्शक नावे

Types of Sentence in Marathi: types of sentences in Marathi grammar. vakyanche prakar. Sentence and its types in Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *