Conjunction in Marathi
मराठी जग

Conjunction in Marathi | उभयान्वयी अव्यय :

Conjunction in Marathi (उभयान्वयी अव्यय) : Ubhayanwayi avyay mhanaje kay.

उभयान्वयी अव्यय : ज्या शब्दाव्दारे वाक्यातील दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांचा संबंध जोडला जातो अश्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदा. : म्हणून, आणि, किंवा, अन, पण, व, वा इ.
➥ राजेश कथा व कादंबरी वाचतो.
➦ तू खो-खो खेळ आणि मी लंगडी खेळतो.
➥ विनय दिसायला चांगला आहे, पण विश्वासू नाही.

➤ वरील वाक्यात ““, “आणि” आणि “पण” ही उभयान्वयी अव्यय आहेत.

उभयान्वयी अव्ययाचे प्रकार :

उभायान्वयी अव्ययाचे दोन प्रकार पडतात.

अ) समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय
आ) असमानत्वदर्शक/ गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय

➤ चला प्रत्येक प्रकार तपशीलवार पाहू.

अ) समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय :

ज्या उभयान्वयी अव्ययाने समान दर्जाची दोन स्वतंत्र वाक्य जोडली जातत त्या उभयान्वयी अव्ययांना समानत्वदर्शक/ प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

➽ समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचे चार उपप्रकार पडतात.

१) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय :

ज्या उभयान्वयी मुळे पहिल्या वाक्यात भर घालून दोन स्वतंत्र वाक्य जोडली जातात, अश्या अविकारी शब्दांना समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदा. : शि, व, अन्, आणि शिवाय, आणखी, न इ.
➥ विकास आला आणि वीज गेली.
➦ विजय शाळेत गेला व अभ्यास करू लागला.
➥ नंदाने आज डब्यात भाजी, पोळी अन् पापडही आणले.

➤ वरील वाक्यात “आणि”, “व” आणि “अन्” ही उभयान्वयी अव्यय आहेत.

२) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय :

ज्या उभयान्वयी शब्दामुळे वाक्यात दिलेल्या दोन गोष्टींपैकी एकाच गोष्टीला पसंती दर्शविली जाते अश्या अविकारी शब्दाला विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदा. : वा, अगर, की, किंवा, अथवा, इ.
➥ आज मैदानात किंवा घरी खेळू.
➦ तुला पुस्तक हवे कि वही?
➥ तुला चहा वा सरबत मिळेल.

➤ वरील वाक्यात “किंवा”, “कि” आणि “वा” ही उभयान्वयी अव्यय आहेत.

३) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय :

ज्या उभयान्वयी शब्दामुळे पहिल्या वाक्यामध्ये काही उणीव, कमतारता, दोष असल्याचा दर्शवितात अश्या अविकारी शब्दाला न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदा. : बाकी, पण, किंतु, परी, परंतु, तरीही इ.
➥ माधवने अभ्यास केला, तरीही नापास झाला.
➦ अखिल हुशार आहे, पण आळशी आहे.
➥ फुले उमलली किंतु उन्हामुळे कोमेजली.

➤ वरील वाक्यात “तरीही”, “पण” आणि “किंतु” ही उभयान्वयी अव्यय आहेत.

४) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय :

ज्या उभयान्वयी शब्दामुळे पहिल्या वाक्यातील घटनेच्या परिणाम हा दुसऱ्या वाक्यात दर्शवितात अश्या अविकारी शब्दाला परिणामबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदा. : सबब, यास्वत, म्हणून, तेव्हा, त्यामुळे, याकरिता, इ.
➥ ग्रीष्माने मनापासून अभ्यास केला म्हणून ती पास झाली.
➦ स्वरा नेहमी शांत राहते याकरिता तीची प्रशंसा होते.
➥ बागेत खूप फुले उमलली यास्तव पाहावयास गर्दी झाली.

➤ वरील वाक्यात “म्हणून”, “याकरिता” आणि “यास्तव” ही उभयान्वयी अव्यय आहेत.

Short notes on birds | पक्षी हा संतुलित पर्यावरणाचं ….

आ) असमानत्वदर्शक/ गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय :

ज्या उभयान्वयी अव्ययाने दोन असमान दर्जाची स्वतंत्र वाक्य, म्हणजे एक वाक्य प्रधान व दुसरे गौण वाक्य जोडली जातात त्या उभयान्वयी अव्ययांना असमानत्वदर्शक/ गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदा. :
➥ मानव परीक्षेत पास झाला कारण त्याने खूप अभ्यास केला.
➥ उच्च शिक्षण घ्यावे यास्तव तो पुण्यास गेला.

➽ असमानत्वदर्शक/ गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचे चार उपप्रकार पडतात.

१) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय :

ज्या उभयान्वयी अव्ययामुळे प्रधान वाक्याचे स्वरूप दुसऱ्या वाक्यात कळते अश्या अविकारी शब्दांना स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदा. : की, म्हणजे, म्हणून, जे इ.
➥ पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणजे परिभ्रमण करते.
➦ एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर.
➥ दहा वाजले कि मी झोपणार.

➤ वरील वाक्यात “म्हणजे”, “म्हणजे” आणि “कि” ही उभयान्वयी अव्यय आहेत.

२) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय :

ज्या उभयान्वयी अव्ययामुळे प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतु हा दुसऱ्या गौण वाक्यात कळतो अश्या अविकारी शब्दांना उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदा. : यास्तव, म्हणून, कारण, सबब, की इ.
➥ योग्य उपचार मिळावेत, यास्तव तो मुंबईला आला.
➥ चांगले कपडे मिळावेत म्हणून तो कपड्याच्या मोठ्या दुकानात गेला.

➤ वरील वाक्यात “यास्तव” आणि “म्हणून” ही उभयान्वयी अव्यय आहेत.

Marathi Numbers in words | Marathi Ank | मराठी अंक

३) करणबोधक उभयान्वयी अव्यय :

ज्या उभयान्वयी अव्ययामुळे प्रधान वाक्यातील क्रिया घडण्याचे कारण गौण वाक्यामधून दर्शविले जाते अश्या अविकारी शब्दांना करणबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदा. : का, की, कारण इ.
➥ माझे काम झाले कि मी जाईन.
➥ विराजला मानसशास्त्राची माहिती नाही कारण हा विषय त्याला आवडत नाही.

➤ वरील वाक्यात “कि” आणि “कारण” ही उभयान्वयी अव्यय आहेत.

४) संकेतबोधक उभयान्वयी अव्यय :

ज्या उभयान्वयी अव्ययामुळे प्रधान वाक्यातील क्रिया घडण्याचे संकेत गौण वाक्यात दर्शविले जातात व त्याचा परिणाम प्रधान वाक्यात झालेला दिसतो अश्या अविकारी शब्दांना संकेतबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदा. : जर-तर, म्हणजे, की, तर इ.
➥ जर मेहनत केलीस तर यश मिळेल.
➥ तू झाडावर चढलास की, आपण फळ खाऊ.

➤ वरील वाक्यात “जर-तर” आणि “की” ही उभयान्वयी अव्यय आहेत.

3

QUIZ- छोटी प्रश्नोत्तरी : उभयान्वयी अव्यय(Types of Conjunction in Marathi)

खालील छोटी प्रश्नोत्तरी सोबत आपण किती समजले त्याचे परीक्षण करूया.

अ) खालील वाक्यातून योग्य तो उभयान्वयी अव्यय व उभयान्वयी अव्ययचे प्रकार ओळखा :

 

1 / 8

१) तुला पुस्तक हवे कि वही?

2 / 8

२) फुले उमलली किंतु उन्हामुळे कोमेजली.

3 / 8

३) बागेत खूप फुले उमलली यास्तव पाहावयास गर्दी झाली.

4 / 8

४) एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर.

5 / 8

५) योग्य उपचार मिळावेत, यास्तव तो मुंबईला आला.

6 / 8

६) विराजला मानसशास्त्राची माहिती नाही कारण हा विषय त्याला आवडत नाही.

7 / 8

७) जर मेहनत केलीस तर यश मिळेल.

8 / 8

८) पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणजे परिभ्रमण करते.

Your score is

The average score is 58%

0%

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार

Conjunction in Marathi :

Conjunction meaning in marathi, conjunctivitis meaning in marathi, conjunction in marathi, conjunctivitis in marathi, conjunction examples in marathi, conjunction in marathi grammar, conjunction sentences in marathi, conjunction words in marathi,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *