Hrasva Dirgha Niyam | ऱ्हस्वदीर्घा संबंधीचे नियम : मराठी इ व उ या ऱ्हस्व स्वरांसाठी ‘ ि’ व ‘ ु’ अशी चिन्हे आहेत आणि दीर्घ स्वरांसाठी ‘ी ‘ व ‘ू ‘ अशी चिन्हे आहेत. हे आपण स्वरांची चिन्हे या मध्ये समजून घेतले.
➣ ज्या इ-कारान्त व उ-कारान्त शंब्दांच्या उच्चारासाठी साधारण शब्दांइतकाच वेळ लागतो त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात.
➣ ज्या इ-कारान्त व उ-कारान्त शंब्दांच्या उच्चारासाठी साधारण शब्दांपेक्षा थोडा अधिक वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात.
आता इ-कारान्त, उ-कारान्त व तत्सम शब्द म्हणजे काय ते पाहू.
➥ इ-कारान्त : ज्या शब्दातील शेवटच्या अक्षरातील स्वर हा ‘इ’ असेल तर त्या शब्दास इ-कारान्त शब्द असे म्हणतात.
उदा. :
➢ काडी, पेटी, माती, चढाई इ.
➥ उ-कारान्त : ज्या शब्दातील शेवटच्या अक्षरातील स्वर हा ‘उ’ असेल तर त्या शब्दास उ-कारान्त शब्द असे म्हणतात.
उदा. :
➢ लिंबू, गढू, खडू, सुरु, पाहू, चालू इ.
➥ तत्सम : संस्कृत भाषेमधून मधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात.
उदा. :
➢ विद्या, पत्नी, नदी, वायु, पृथ्वी, गौरी, वाणी, शत्रु इ.
टीप :
इ-कारान्त व उ-कारान्त शब्द हे ऱ्हस्व किंवा दीर्घ असतात.
नियम :
नियम-१ : मराठीतील तत्सम (ऱ्हस्व) इ-कारान्त आणि उ-कारान्त शब्द दीर्घान्त लिहावे.
उदा. :
➥ कवी, माती, गती, गुरु इ.
– इतर शब्दांच्या अंती येणारा इ-कार व उ-कार दीर्घ लिहावा.
उदा. :
➥ पाटी, जादू, पैलू, विनंती इ.
अपवाद : आणि, नि, परंतु, यथामति, तथापि.
नियम-२ : दीर्घ इ-कारान्त व उ-कारान्त शब्दातील उपान्त्य इ -कार व उ-कार ऱ्हस्व लिहावे .
उदा. :
➥ गरिबी, माहिती, हुतुतू, सुरु इ.
अपवाद : नीती, भीती, रीती, कीर्ती हे तत्सम शब्द आहेत.
सर्वनामाचे प्रकार : सर्वनामाचे मुख्य सहा प्रकार आहेत. १] पुरुषवाचक सर्वनाम … अधिक जाणून घ्या…
नियम-३ : दीर्घ आकारांत शब्दाचे उपान्त्य इ-कार व उ-कार दीर्घ लिहावे .
उदा. :
➥ वसूल, वकील, वीट, गरीब इ.
अपवाद : गुण, मधुर, विष इ.
नियम-४ : ज्या आकारांत शब्दात उपान्त्य स्वर ‘इ’ किंवा ‘उ’ आहे व त्या अक्षरानंतर खणखणीत अनुनासिक आहे, तर तो इ-कार किंवा उ-कार ऱ्हस्व लिहावा.
उदा. :
➥ टिंब, सुंभ, डिंक, सुरंग, तुरुंग इ.
नियम-५ : ज्या आकारांत शब्दात शेवटचे अक्षर जोडाक्षर आहे, त्याच्या आधीच्या अक्षरात ‘इ’ किंवा ‘उ’ हे स्वर ऱ्हस्व लिहावेत.
उदा. :
➥ संतुष्ट, शिस्त, सुस्त, गर्विष्ठ, दुर्ग इ.
नियम-६ : ज्या शब्दाच्या अक्षरात ‘अ’ हा स्वर आहे म्हणजे ते शब्द अकारान्त आहेत आणि शेवटून दुसऱ्या अक्षरात ‘इ’ किंवा ‘उ’ हा स्वर आहे , त्या शब्दांचे ‘इ’ व ‘उ’ हे स्वर दीर्घ लिहावेत .
उदा. :
➥ बहीण, खूण इ.
नियम-७ : संस्कृत आकारांत शब्द जसेच्या तसे लिहावेत. त्या शब्दातील उपान्त्य ‘इ’ व ‘उ’ मुळात जसे र्हस्व किंवा दीर्घ असतील तसेच लिहावेत .
उदा. :
➥ सूर्य, पृथ्वी, सत्य, लक्ष्मी, वधू, भू इ.
इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
Hrasva Dirgha Niyam : शुद्धलेखनाचे नियम :
भाषेची नियम व्यवस्था सांगून मराठी लेखन विषयक नियम सोदाहरण लिहा, मराठी लेखन विषयक नियम स्पष्ट करा, लेखन विषयक नियम कोणी लिहिले, शुद्धलेखन समितीने तयार केलेले नियम केव्हा पासून अमलात येऊ लागले, marathi shuddha lekhan pdf, मराठीचे लेखन विषयक नियम स्पष्ट करा, शुद्धलेखन कसे लिहायचे, मराठी शुद्धलेखनाचे नियम, मराठी व्याकरण – शुध्दलेखन, शुद्धलेखनाचे अठरा नियम, लिहिताना र्हस्व-दीर्घचे नियम, ह्रस्व स्वर आणि दीर्घ स्वर, -हस्व-दीर्घाचे नियम काटेकोरपणे, भाषेची नियम व्यवस्था सांगून मराठी लेखन विषयक नियम सोदाहरण लिहा, मराठी लेखन विषयक नियम स्पष्ट करा, लेखन विषयक नियम कोणी लिहिले, शुद्धलेखन समितीने तयार केलेले नियम केव्हा पासून अमलात येऊ लागले, marathi shuddha lekhan pdf, मराठीचे लेखन विषयक नियम स्पष्ट करा, शुद्धलेखन कसे लिहायचे.