samas in marathi
मराठी जग

Samas in marathi | समास व समासाचे प्रकार

Samas in marathi | समास : समास म्हणजे एकीकरण किंवा जोड. जेंव्हा दोन किंवा अधिक शब्दांच्या संयोगाने तयार झालेला एक शब्द म्हणजे समास किंवा सामासिक शब्द होय.

उदा. : प्रतिदिन, गुणदोष, आमरण

अधिक माहिती :

➤ सामासिक शब्दालाच समासयुक्त शब्द किंवा जोडशब्द ही म्हणतात.
➢ प्रतिदिन या शब्दात ‘प्रति’ व ‘दिन’ हे दोन शब्द आहेत. या दोन शब्दांना जोडून एक जोड शब्द तयार झाला.
➤ सामासिक शब्दातील मूळ शब्दांना ‘पद’ असे म्हणतात.
➢ सामासिक शब्दातील पहिल्या शब्दाला ‘पूर्वपद’ असे म्हणतात. वरील ‘प्रतिदिन’ या शब्दात ‘प्रति’ – हे पूर्वपद आहे.

शब्दातील दोन शब्दांपैकी कोणत्या पदाला अधिक महत्व आहे त्यावरून समासाचे प्रमुख चार प्रकार पडतात | Samas in marathi

प्रमुख चार प्रकार :

१. अव्ययीभाव समास
२. तत्पुरुष समास
३. व्दंव्द समास
४. बहुव्रीही समास

१. अव्ययीभाव समास :

ज्या समासिक शब्दातील पहिले पद प्रमुख असून अव्ययी असते व या शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणा प्रमाणे होतो त्यास ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात.

उदा.
➥ प्रतिदिन : प्रत्येक दिवशी
➦ दारोदारी : प्रत्येक दारी
➥ गावोगाव : प्रत्येक गावात
➦ गैरहजर : हजार नसलेला
➥ गल्लोगल्ली : प्रत्येक गल्लीत

➢ वरील उदाहरणात काही शब्द मराठी भाषेतील, संस्कृत भाषेतील, अरबी व फारसी भाषेतील आहेत.
➢ वरील उदाहरणात प्रति, हा संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेला शब्द आहे. संस्कृत मधील उपसर्गांना अव्ययच मानले जाते.

Marathi Numbers in words | Marathi Ank | मराठी अंक

२. तत्पुरुष समास :

ज्या समासिक शब्दातील दुसरे पद प्रमुख असते त्या शब्दास ‘तत्पुरुष समास’ असे म्हणतात.

उदा.
➥ प्रतिदिन : प्रत्येक दिवशी
➦ राजपुत्र : राजाचा पुत्र
➥ महादेव : महान असा देव
➦ तोंडपाठ : तोंडाने पाठ
➥ कंबरपट्टा : कंबरेचा पट्टा
➦ वनभोजन – वनातील भोजन
➥ गायरान – गाईसाठी रान

➢ या समासिक शब्दाचा विग्रह करताना गाळलेला शब्द, विभक्तीप्रत्यय स्वरूपात लिहावा लागतो.

तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकर पडतात.

१. अलुक तत्पुरुष :

ज्या विभक्ती तत्पुरुष समासातील पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा ऱ्हास किंवा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात.
उदा.
➥ अग्रेसर
➦ तोंडी लावणे
➥ युधिष्टिर,
➦ कर्तरीप्रयोग
➥ पंकेरूह

२. उपपद तत्पुरुष :

ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद महत्वाचे असून व ते धातुसाधीत किंवा कृदंत म्हणून उपयोगात त्या शब्दास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात.

उदा.
➥ शेतकरी – शेती करणारा
➦ देशस्थ – देशात राहणारा
➥ ग्रंथकार – ग्रंथ करणारा
➦ ग्रामस्थ – गावात राहणारा
➥ सुखद – सुख देणारा
➦ मार्गस्थ – मार्गावर असणारा

३. विभक्ती तत्पुरुष :

ज्या तत्पुरुष समासातील शब्दाचा कोणत्या तरी एका पदाच्या विभक्तीचा अर्थ सांगणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात.

उदा.
➥ देशगत : देशाला गट – व्दितीया तत्पुरुष समास
➦ कृष्णाश्रित : कृष्णाला आश्रित – व्दितीया तत्पुरुष समास
➥ गुणहिण : गुणांनी हीन – तृतीया तत्पुरुष समास
➦ क्रीडांगण : क्रीडेसाठी अंगण – चतुर्थी तत्पुरुष समास
➥ गर्भश्रीमंत : गर्भापासून श्रीमंत – पंचमी तत्पुरुष समास
➦ धर्मवेड : धर्माचे वेडे – षष्ठी तत्पुरुष समास
➥ पाणसाप : पण्यातील साप – सप्तमी तत्पुरुष समास

४. नत्र तत्पुरुष समास :

ज्या तत्पुरुष समासिक शब्दातील पूर्व पद हे नकारार्थी किंवा निषेध दर्शविणारे असते त्यास नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात. Samas in marathi

उदा. :
(अ, न, नि, ना, अन्, बे, गैर इ.)
➥ गैरहजर : हजर नसलेला
➦ अयोग्य : योग्य नसलेला
➥ निरोगी : रोग नसलेला
➦ अशक्य : शक्य नसलेला
➥ अहिंसा : हिंसा नसलेला
➦ अनादर : आदर नसलेला
➥ अज्ञान : ज्ञान नसलेला

५. कर्मधारय तत्पुरुष समास :

ज्या तत्पुरुष समासिक शब्दातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य अश्या आशयाचा असतो त्या शब्दास कर्मधारय तत्पुरुष समास असे म्हणतात.

उदा. :
(अ, न, नि, ना, अन्, बे, गैर इ.)
➥ महाराष्ट्र : महान असे राष्ट्र
➦ घननीळ : निळा असा घन
➥ महादेव : महान असा देव
➦ चरणकमळ : चरण हेच कमळ
➥ श्यामसुंदर : सुंदर असा श्याम
➦ खडीसाखर : खडयसारखी साखर

कर्मधारण्य समासाचे पुन्हा 7 उपप्रकर पडतात.

i) विशेषण पूर्वपद कर्मधारय समास : या सामासिक शब्दातील पहिले पद विशेषण असते .
उदा. : पितांबर, महादेव, नीलकमल, रक्तचंदन, लघुपट

ii) विशेषण उत्तरपद कर्मधारय समास : या सामासिक शब्दातील दुसरे पद विशेषण असते.
उदा. : भाषांतर, घननील, पुरुषोत्तम, वेशांतर

iii) विशेषण उभयपद कर्मधारय समास : या सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषण असतात.
उदा. : श्यामसुंदर, पांढराशुभ्र, लालभडक, हिरवागार इ.

iv) उपमान पूर्वपद कर्मधारय समास : या सामासिक शब्दातील पहिले पद उपमान असते व ते विशेषणासारखे काम करते.
उदा. : कमलनयन, चंद्रमुख, राधेश्याम इ.

v) उपमान उत्तरपद कर्मधारय समास : या सामासिक शब्दातील दुसरे पद उपमान असते व ते विशेषणासारखे काम करते.
उदा. : नरसिंह, चरणकमल, मुखचंद्र इ.

vi) अव्यय पूर्वपद कर्मधारय समास : या सामासिक शब्दातील पहिले पद अव्यय असते व ते विशेषणासारखे काम करते.
उदा. : सुगंध, सुहास्य, सुपुत्र, सुनयन, कुकर्म इ.

vii) रूपक कर्मधारय समास : या सामासिक शब्दातील दोन्ही पदे एकरूप असतात.
उदा. : विद्याधन, तपोबल, योगसाधना इ.

६. व्दिगू समास :

ज्या कर्मधारय सामासिक शब्दातील पूर्व पद हे संख्याविशेषण असते व त्यातून एक समूह सुचविला जातो त्या शब्दास व्दिगू समास असे म्हणतात.

उदा. :
➥ त्रिभुवन : तीन भुवनांचा समूह
➦ नवरात्री : नऊ रात्रींचा समूह
➥ पंचपाळे : पाच पाळ्यांचा समूह
➦ सप्ताह : सात दिवसांचा समूह
➥ पंचवटी : पाच वडांचासमूह
➦ चौघडी : चार घोड्यांचा समूह

७. मध्यमपदलोपी समास :

ज्या सामासिक शब्दांतील पूर्व पदाचा उत्तर पदाशी संबंध दर्शविणारी मधले काही शब्द लोप करावे लागतात त्या शब्दास मध्यमपदलोपी समास असे म्हणतात.

उदा. :
➥ पुरणपोळी : पुरण घालून केलेली पोळी
➦ लंगोटीमित्र : लंगोटी घालत असल्या पासूनचा मित्र
➥ दूधभात : दूध घालून केलेला भात
➦ कांदेपोहे : कांदे घालून केलेले पोहे
➥ गुरुबंधू : गुरूचा शिष्य या नात्याने बंधू.

नाम म्हणजे काय ? : एखाद्या व्यक्तिला, वस्तुला, पक्षांना, प्राण्यांना, एखाद्या ठिकाणाला तसेच .… Read more…

३. व्दंव्द समास :

ज्या समासिक शब्दातील दोन्ही पदे प्रधान म्हणजेच अर्थाच्या संदर्भाने सारख्या दर्जाची असतात त्यास ‘व्दंव्द समास’ असे म्हणतात.

उदा.
➥ मायबाप : माय आणि बाप
➦ स्त्रीपुरुष : स्त्री आणि पुरुष
➥ हरिहर : हरि आणि हर
➦ बहीणभाऊ : बहीण आणि भाऊ
➥ पशुपक्षी : पशु आणि पक्षी

➢ या समासातील पदे उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.

व्दंव्द समासाचे खलील 3 प्रकार पडतात. (Types of Samas in marathi)

अ) इतरेतर व्दंव्द समास :

ज्या समासिक शब्दाचा विग्रह करतांना आणि, व, ह्या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग होतो, त्यास ‘इतरेतर व्दंव्द समास’ असे म्हणतात.
उदा.
➥ आईबाप : आई आणि बाप
➦ पशुपक्षी : पशू आणि पक्षी
➥ हरिहर : हरि आणि हर
➦ दक्षिणोत्तर : दक्षिण आणि उत्तर

आ) वैकल्पिक व्दंव्द समास :

ज्या समासिक शब्दाचा विग्रह करतांना किंवा, अथवा, वा यांसारख्या विकल्प बोधक उभयन्वयी अव्ययांचा उपयोग होतो त्यास ‘वैकल्पिक व्दंव्द समास’ असे म्हणतात.
उदा.
➥ पासनापास : पास किंवा नापास
➦ बरेवाईट : बरे किंवा वाईट
➥ तीनचार : तीन किंवा चार
➦ पापपुण्य : पाप किंवा पुण्य
➥ खरेखोटे : खरे किंवा खोटे

इ) समाहार व्दंव्द समास :

ज्या समासिक शब्दातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्याच जातीच्या दुसऱ्या पदार्थाचाही समावेश केला जातो त्यास ‘समाहार व्दंव्द समास’ असे म्हणतात.
उदा.
➥ भाजीपाला : भाजी, पाला तसेच इतर भाज्या
➦ चहापाणी : चहा, पाणी तसेच इतर नाष्ट्याचे पदार्थ
➥ मीठभाकर : मीठ, भाकर व साधे खाद्यपदार्थ
➦ पालापाचोळा : पाला, पाचोळा व इतर कचरा
➥ केरकचरा – केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ

नामाचे प्रकार : नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत :… Read more…

४) बहुव्रीही समास :

ज्या समासिक शब्दातील कोणतेच पद महत्वाचे किंवा प्रमुख नसून यातून वेगळ्याच अर्थाच्या वस्तूंचा किंवा व्यक्तींचा बोध होतो, त्यास ‘बहुव्रीही समास’ असे म्हणतात.

उदा.
➥ प्राप्तधन : प्राप्त आहे धन ज्यास असा.
➦ नीलकंठ : कंठ निळा आहे असा तो (शंकर)
➥ दशमुख : दहा तोंड आहेत ज्यास असा. (रावण)

बहुव्रीही समासाचे पुन्हा चार उपपक्रार पडतात.

अ) प्रादिबहुव्रीही समास :

ज्या बहुव्रीही समासिक शब्दातील पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वि या सारख्या उपसर्गानी जोडलेले असते, त्यास ‘प्रादिबहुव्रीही समास’ असे म्हणतात.
उदा.
➥ प्रज्ञावंत – बुद्धी असलेला
➦ प्रमुख : सर्वात मुख्य आहे असा
➥ सुमंगल : पवित्र आहे असा
➦ निघृण : निघून गेलेली आहे घृणा ज्यातून असा
➥ प्रबळ : अधिक बलवान असा तो

आ) विभक्ती बहुव्रीही समास :

ज्या समासिक शब्दाचे विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते. अशा सर्वनामाची जी विभक्ती असते त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्यास ‘विभक्ती बहुव्रीही समास’ असे म्हणतात.
उदा.
➥ प्राप्तोदक : प्राप्त आहे उदक ज्याला तो ➭ व्दितीया बहुव्रीही विभक्ती
➦ जितशत्रू : जित आहे शत्रू ज्याने तो ➭ तृतीया बहुव्रीही विभक्ती
➥ पंचकोण : पाच आहेत कोन ज्याला तो ➭ चतुर्थी बहुव्रीही विभक्ती
➦ निरंकार : गट झाले आहेत अहंकार ज्याचे तो ➭ पंचमी बहुव्रीही विभक्ती
➥ जितेंद्रिय : जित आहे इंद्रिये ज्याची असा ➭ षष्ठी बहुव्रीही विभक्ती
➦ पूर्णब्रम्ह : पूर्ण आहेत ब्रह्म असा तो ➭ सप्तमी बहुव्रीही विभक्ती

इ) नत्र बहुव्रीही समास :

ज्या बहुव्रीही समासिक शब्दाचे पहिले पद नाकार्थी असते त्याला ‘नत्र बहुव्रीही समास’ असे म्हणतात.
➭ या समासातील पूर्व पदात अ, न, अन, नि याकारख्या नाकार्थी शब्दांचा वापर केला जातो.
उदा.
➥ नीरस : नाही रस ज्यास तो
➦ अखंड : नाही खंड ज्याला तो
➥ निर्धन : नाही धन ज्याकडे तो
➦ निरोगी : नाही रोग ज्याला तो
➥ अनादी : नाही आदी असा तो
➦ अनियमित : नियमित नाही असा तो

ई) सहबहुव्रीही समास :

ज्या बहुव्रीही समासिक शब्दाचे पूर्व पद ‘सह’ किंवा ‘स’ अशी अव्यये असून हा शब्द विशेषणाचे कार्य करतो त्यास ‘सहबहुव्रीही समास’ असे म्हणतात.
उदा.
➥ सहर्ष : हर्ष सहित आहे असा जो
➦ सफल : फल सहित आहे असा तो
➥ सहकारी : इतरां सहित आहे असा जो
➦ सबल : बला सहित आहे असा जो
➥ सविनय : विनय सहित आहे असा तो

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार

Samas in marathi : समास व त्याचे प्रकार, समास व त्याचे प्रकार, समास व समासाचे प्रकार, समास मराठी व्याकरण, समासाचे प्रकार (Types Of Compound), samas v tyache prakar, samasache prakar, samas mhanaje kay, Samas in marathi |.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *