Adver in Marathi
मराठी जग

Adverb in Marathi | क्रियाविशेषण अव्यय

Adverb in Marathi : जो शब्द वाक्यातील क्रियापदा बद्दल विशेष माहिती सांगतो अश्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
➤ जसे विशेषण हे नाम व सर्वनाम बद्दल विशेष माहिती देते, तसे क्रियाविशेषण अव्यय हे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देते.

उदा. : कधीकधी, थोडी, सर्वदा, हळू, फार, मागून, जलद.

क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार :

➽ क्रियाविशेषण अव्यय प्रकार : क्रियाविशेषण अव्ययाचे मुख्य दोन प्रकार होतात. (Adverb in Marathi and its types)

अ) अर्थावरून क्रियाविशेषण अव्यय
आ) स्वरूपावरून क्रियाविशेषण अव्यय

➤ चला प्रत्येक प्रकार तपशीलवार पाहू.

अ) अर्थावरून क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार :

१) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय :

कालवाचक क्रियाविशेषण अव्ययांचे पुन्हा तीन उपप्रकार पडतात :

अ) कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय :

ज्या शब्दामुळे वाक्यातील क्रिया केव्हा घडली हे दर्शविले जाते अश्या अविकारी शब्दांना कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा. : काल, पूर्वी, आज, रात्री, दिवसा, मागे, तूर्त, सध्या, हल्ली इ.
➥ उदय उद्या गावाला जाईल.
➦ विजय काल शाळेत गेला होता.
➥ रमणचा पूर्वी अपघात झाला होता.

➤ वरील वाक्यात “उद्या”, “काल” आणि “पूर्वी” ही क्रियाविशेषणे अव्यय आहेत.

ब) सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय :

ज्या शब्दामुळे वाक्यातील क्रियेचे सातत्य दर्शविले जाते अश्या अविकारी शब्दांना सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा. : सदा, नेहमी, सदैव, आजकाल, दिवसभर, रात्रीभर इ.
➥ रोगाचे निदान अद्याप सापडले नाही.
➦ देवाचे नित्य स्मरण करावे.
➥ मैदानात नेहमी क्रीडास्पर्धा होतात.
➤ वरील वाक्यात “अद्याप”, “नित्य” आणि “नेहमी” ही क्रियाविशेषणे अव्यय आहेत.

क) आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय :

ज्या शब्दामुळे वाक्यातील घटनेची पुनरावृत्ती दर्शविले जाते अश्या अविकारी शब्दांना आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा. : वारंवार, सालोसाल, दिवसेंदिवस, दररोज, पुन्हापुन्हा, फिरूनफिरून, क्षणोक्षणी इ.
➥ माणसे पुन्हापुन्हा तीच चूक करीत आहेत.
➦ आई दररोज मंदिरात जाते.
➥ असावरी क्षणोक्षणी देवाची प्रार्थना करते.

➤ वरील वाक्यात “पुन्हापुन्हा”, “दररोज” आणि “क्षणोक्षणी” ही क्रियाविशेषणे अव्यय आहेत.

Short notes on birds | पक्षी हा संतुलित पर्यावरणाचं ….

२) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय :

ज्या शब्दामुळे वाक्यातील क्रियेचा स्थळ किंवा ठिकाणाचा बोध होत अश्या अविकारी शब्दांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा. : येथे, तेथे, वर, खाली, जेथे, कोठे, मध्ये, पुढे, मागे, जिकडे-तिकडे, अलीकडे, पलीकडे इ.

स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययांचे पुन्हा दोन उपप्रकार पडतात :

अ) स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय :

ज्या शब्दामुळे वाक्यातील क्रियेचा ठिकाणाचा बोध होत अश्या अविकारी शब्दांना स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा. :
➥ जिकडे-तिकडे समुद्रच दिसत आहे.
➦ मी नदी पलीकडे थांबलो.
➥ तेथे पक्षी बसला आहे.

➤ वरील वाक्यात “जिकडे-तिकडे”, “पलीकडे” आणि “तेथे” ही क्रियाविशेषणे अव्यय आहेत.

ब) गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय :

ज्या शब्दामुळे वाक्यातील क्रियेचा गतीचा बोध होतो अश्या अविकारी शब्दांना गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा. : दुरून, वरून, खालुन, इकडून, तिकडून, मागून, पुढून, लांबून इ.
➥ बस लांबून निघून गेली.
➦ बाजारात जातांना पुढून टांगेवाला आला.
➥ मोर दुरून पळून गेला.

➤ वरील वाक्यात “लांबून”, “पुढून” आणि “दुरून” ही क्रियाविशेषणे अव्यय आहेत. (Adverb in Marathi)

Marathi Numbers in words | Marathi Ank | मराठी अंक

३) रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय :

ज्या शब्दामुळे वाक्यातील क्रियेची रीत दाखविली जाते अश्या अविकारी शब्दांना रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा. : कसे, असे, सावकाश, झटकन इ.

रितीवाचक क्रियाविशेषण अव्ययांचे पुन्हा तीन उपप्रकार पडतात :

अ) प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय :

ज्या शब्दामुळे वाक्यातील क्रिया कश्या प्रकारे होते हे दर्शविले जाते अश्या अविकारी शब्दांना प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा. : हळू, सावकाश, भरभर, असे, कसे, आपोआप, मुद्दाम,, तसे जसे, कसे, उगीच, जलद इ.
➥ दिलीप भरभर चालतो.
➦ महेश हळू धावतो.
➥ प्रितेश सावकाश चालतो.

➤ वरील वाक्यात “भरभर”, “हळू” आणि “सावकाश” ही क्रियाविशेषणे अव्यय आहेत.

ब) अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्यय :

ज्या शब्दामुळे वाक्यातील क्रिया कश्या प्रकारे होते याचे अनुकरण होते अश्या अविकारी शब्दांना अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा. : बदाबद, चमचम, पटापट, पटकण, टपटप, झटकण, इ.
➥ साराने झटकण अभ्यास केला.
➦ वेदांती पटकन लिहिते.
➥ भावि पटपट फुले वेचते.

➤ वरील वाक्यात “झटकण”, “पटकन” आणि “पटपट” ही क्रियाविशेषणे अव्यय आहेत.

क) निश्चयदर्शक क्रियाविशेषण अव्यय :

ज्या शब्दामुळे वाक्यातील क्रिया निश्चित होणार असे दर्शविले जाते अश्या अविकारी शब्दांना निश्चयदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा. : खरोखर, नक्की, पक्का, खुशाल इ.
➥ अमित नक्की धावण्याची शर्यत जिंकणार.
➦ तू खुशाल झोपी जा.
➥ भावी खरोखर आंबा खाणार आहे.

➤ वरील वाक्यात “नक्की”, “खुशाल” आणि “खरोखर” ही क्रियाविशेषणे अव्यय आहेत.

.

४) प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय :

ज्या शब्दामुळे वाक्यातील प्रश्नाचा बोध होतो अश्या अविकारी शब्दांना प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा. :
➥ तू आंबा खाते का?
➦ तुम्ही पुस्तक वाचले ना?
➥ तुम्ही अभ्यास केला का?

➤ वरील वाक्यात “का”, “ना” आणि “का” ही क्रियाविशेषणे अव्यय आहेत.

.

५) संख्यावाचक/ परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय :

ज्या शब्दामुळे वाक्यातील क्रिया किती वेळा घडली किंवा क्रियेच्या परिमाणाचा बोध होतो अश्या अविकारी शब्दांना संख्यावाचक/ परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा. : जरा, जास्त, किंचित, काहीसा, कमी, थोडा, अगदी, बिलकुल, क्वचित, अत्यंत, मुळीच, भरपूर, मोजके, पूर्ण इ.
➥ आकाश अतिशय हुशार आहे.
➦ राजेश क्रिकेट जास्त आवडतो.
➥ तुम्ही जरा कमी बोला.

➤ वरील वाक्यात “अतिशय”, “जास्त” आणि “जरा” ही क्रियाविशेषणे अव्यय आहेत.

.

६) निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय :

ज्या शब्दामुळे वाक्यातील क्रियेचा निषेध किंवा नकार दर्शविला जातो अश्या अविकारी शब्दांना निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा. :
➥ निल न विसरता अभ्यास करतो.
➦ भावी ना चुकता शाळेत जाते.
➥ रमेशने खरे सांगितले तर ना !
➤ वरील वाक्यात “न”, “ना” आणि “ना” ही क्रियाविशेषणे अव्यय आहेत.

आ) स्वरूपावरून क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार :

१) सिद्ध क्रियाविशेषण अव्यय :

जे शब्द मुळातच क्रियाविशेषण असतात अश्या अविकारी शब्दांना सिद्ध क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा. : मागे, पुढे, येथे, तेथे, इ.
➥ ग्रीष्मा तेथे जाणार होती.
➦ प्रथम मागे गेला.
➥ आम्ही येथे थांबतो.

➤ वरील वाक्यात “तेथे”, “मागे” आणि “येथे” ही क्रियाविशेषणे अव्यय आहेत.

.

२) सामासिक क्रियाविशेषण अव्यय :

जे जोडशब्द किंवा सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाचे काम करतात अशा क्रियाविशेषणांना सामासिक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा. : दररोज, प्रतिदिन, रात्रंदिवस, गावोगाव, गैरहजर, समोरासमोर, घरोघर, यथाशक्ती, आजन्म इ.
➥ सुरक्षेसाठी पोलिस गोवोगाव फिरतात.
➦ वासुदेव घरोघर फिरतो.
➥ स्वरा रात्रंदिवस अभ्यास करते.

➤ वरील वाक्यात “गोवोगाव”, “घरोघर” आणि “रात्रंदिवस” ही क्रियाविशेषणे अव्यय आहेत.

३) साधीत क्रियाविशेषण अव्यय :

जे शब्द नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, शब्दयोगी अव्यय यांच्यापासून झालेल्या क्रियाविशेषणांना साधीत क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

साधीत क्रियाविशेषण अव्ययाची उदाहरणे :
नामसाधीत : सकाळी, दुपारी, व्यक्तिश:, वस्तूत:, रात्री, दिवसा.
सर्वनामसाधीत : यावरून, यामुळे, त्यामुळे, कित्येकदा,
विशेषणसाधीत : एकदा, मोठयाने, जोराने, इतक्यात, थोडक्यात.
धातुसाधीत : हसत, खेळात, पळतांना, धावतांना, खेळतांना.
अव्ययसाधीत : इकडून, तिकडून, कोठून, वरून, खालून.
प्रत्यय सधीत : मन:पूर्वक, कालानुसार, शास्त्रदृष्ट्या, मानसिकदृष्टया.

उदा. :
➥ त्विषा कित्येकदा खरे बोलते.
➦ मयुरी धावताना पडली.
➥ रोहित मोठ्याने बोलला.

➤ वरील वाक्यात “कित्येकदा”, “धावताना” आणि “मोठ्याने” ही क्रियाविशेषणे अव्यय आहेत.

Adverb in Marathi : (Quiz)

[ays_quiz id=’42’]

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार

Adverb in Marathi : adverb in marathi, meaning of adverb in marathi, adverb sentence in marathi, types of adverbs in marathi, adverb definition in marathi, adverb examples in marathi, क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार – Adverbs in Marathi – Smart School | Kriyavisheshan in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *