Singular Plural in Marathi | वचन व त्याचे प्रकार : (Vachan v tyache prakar) :
वाक्यातील नामाने दर्शवलेली वस्तु एक आहे की अनेक आहेत याचा बोध होतो यालाच वचन असे म्हणतात.
➽ वचनाचे प्रकार (Number) :
मराठी भाषेत वचनाचे दोन प्रकार आहेत.
१] एकवचन
२] अनेकवचन
१) एकवचन :ज्या नामाव्दारे व्यक्ती किंवा वस्तू एकच आहे असा बोध होतो त्या नामास एकवचन समजले जाते.
उदा. : पान, माणूस, पेन, पुस्तक, झाड इ.
२) अनेकवचन :ज्या नामाव्दारे व्यक्ती किंवा वस्तू एकापेक्षा जास्त आहेत असा बोध होतो त्या नामास अनेकवचन समजले जाते.
उदा. : मुले, इमारती, जाडे, पाने, पुस्तके इ.
Marathi Numbers in words | Marathi Ank | मराठी अंक
वचनामुळे नामांच्या रूपात होणारे बदलांचे नियम पाहू :
नियम – १
‘आ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त मध्ये होतात :
➥ मुलगा – मुलगे
➥ कपडा – कपडे
➥ बगळा – बगळे
➥ आंबा – आंबे
➥ चेहरा – चेहरे
‘आ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन तसेच राहते :
➥ भाषा – भाषा
➥ विद्या – विद्या
➥ दिशा – दिशा
➥ सभा – सभा
नियम – २
‘आ’ कारान्त शिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाचे रुपे दोन्ही वचनात सारखीच राहतात :
➥ थेंब – थेंब
➥ देव – देव
➥ कवी – कवी
➥ वर्ग – वर्ग
➥ शिक्षक – शिक्षक
सर्वनामाचे प्रकार : सर्वनामाचे मुख्य सहा प्रकार आहेत. १] पुरुषवाचक सर्वनाम २] दर्शक …अधिक जाणून घ्या…
नियम – ३
‘ई’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन ‘या’ कारान्त मध्ये होतात :
➥ नदी – नद्या
➥ टोपी – टोप्या
➥ गाडी – गाड्या
➥ यादी – याद्या
➥ पगडी – पगड्य
नियम – ४
‘ऊ’ कारान्त स्त्रीलिंगी अनेक वचन ‘वा’ कारान्त मध्ये होतात :
➥ जाऊ – जावा
➥ सासू – सासवा
➥ ऊ – ऊवा
➥ पीसु – पीसवा
Worksheets are given below, scroll down for more…..
वर्कशीट्स खाली दिल्या आहेत, अधिक माहितीसाठी खाली पहा….
वचन व त्याचे प्रकार, वचन व त्याचे प्रकार मराठी, Vachan v tyache prakar, types of vachan, vachan in marathi, वचन (Singular-Plural), वचन | Number (vachan) in Marathi, singular plural meaning in marathi, singular plural words in marathi, singular and plural words list in marathi, Marathi grammar, vachan badla, singular plural, singular and plurals list, plural of manus in marathi, plural of shala in marathi, plural of village in marathi, plural of peacock in marathi, vachan badla in marathi, अनेकवचनी शब्द, plural of nadī in marathi.