Marathi Gender | Ling v tyache Prakar |
लिंग : नामाच्या रूपावरुन एखादी वस्तु वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषजातीची आहे की, स्त्रीजातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून समजते त्याला त्या नामाचे लिंग असे म्हणतात.
➽ लिंगाचे प्रकार :
मराठी भाषेत लिंगाचे तीन प्रकार पडतात.
१] पुल्लिंगी
२] स्त्रीलिंगी
३] नपुसकलिंगी
१) पुल्लिंगी :ज्या शब्दावरून नामाच्या पुरुष जातीचा बोध होतो त्या नामाचे लिंग पुल्लिंगी असे समजावे.
उदा. : शिक्षक, घोडा, मुलगा, झेंडा, सूर्य, चंद्र, सागर, कागद, आरासा इ.
२) स्त्रीलिंगी :ज्या शब्दावरून नामाच्या स्त्री जातीचा बोध होतो त्या नामाचे लिंग स्त्रीलिंगी असे समजावे.
उदा. : वही, मिरची, मुलगी, शिक्षिका, घोडी, चिमणी, खुर्ची, शाळा, नदी, कुत्री, इमारत, पाटी इ.
Marathi Numbers in words | Marathi Ank | मराठी अंक
३) नपुंसकलिंगी :ज्या शब्दावरून नामाच्या स्त्री किंवा पुरुष जातीचा बोध होत नाही त्या नामाचे लिंग नपुंसकलिंगी असे समजावे.
उदा. : पुस्तक, घर, मूळ, पाखरू, लेकरू, पाखरू, झाड, पिल्लू, वासरू, शहर, वाहन इ.
लिंग भेदामुळे नामांच्या रूपात होणारे बदलांचे नियम : (Marathi Gender – Rules)
नियम –
काही प्राणीवाचक ‘अ’ कारान्त पुल्लिंगी शब्दांची स्त्रीलिंगी रुपे ‘ई’ कारान्त होतात :
➥ तरुण – तरुणी
➦ हंस – हंसी
➥ बेडूक – बेडकी
➦ वानर – वानरी
नियम – २
‘आ’ कारान्त पुल्लिंगी प्राणीवाचक नामांचे स्त्रीलिंगी रूप ‘ई’ कारान्त होते :
➥ मुलगा – मुलगी
➦ घोडा – घोडी
➥ पोरगा – पोरगी
➦ कोल्हा – कोल्ही
नियम – ३
काही प्राणीवाचक पुल्लिंगी नामांना ‘ईन’ प्रत्यय लागून त्यांचे स्त्रीलिंगी रूप होतात :
➥ सुतार – सुतरीन
➦ वाघ – वाघीन
➥ माळी – माळीन
➦ माकड – माकडीन
Short notes on birds | पक्षी हा संतुलित पर्यावरणाचं ….
नियम – ४
संस्कृत मधून मराठीत आलेल्या काही नामांची स्त्रीलिंगी रूप ‘ई’ प्रत्यय लागून होतात :
➥ भगवान – भगवती
➦ राजा – राणी
➥ युवा – युवती
➦ श्रीमान – श्रीमती
नियम – ५
काही पुलिंग नामांची स्त्रीलिंगी रुपे पूर्णतः वेगळी होतात :
➥ पिता – माता
➦ राजा – राणी
➥ पुत्र – कन्या
➦ बोकड – शेळी
नियम – ६
सामासिक शब्दांचे लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगावरून ठरते :
➥ मिठभाकरी – स्त्रीलिंगी
➦ पुरणपोळी – स्त्रीलिंगी
➥ साखरभात – पुल्लिंगी
➦ गायरान – नपुसकलिंगी
नियम – ७
परभाषेतून आलेले शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या शब्दांच्या लिंगावरून ठरते.
➥ क्लास(वर्ग) – पुल्लिंगी
➦ कंपनी(मंडळी) – स्त्रीलिंगी
➥ टेबल (बाक) – पुल्लिंगी
➦ पेन्सिल (लेखनी) – स्त्रीलिंगी
Worksheets are given below, scroll down for more…..
वर्कशीट्स खाली दिल्या आहेत, अधिक माहितीसाठी खाली पहा….
इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
लिंग (Gender), dictionary, types of gender in marathi language, common gender in marathi, masculine gender in marathi, cow gender in marathi, gender information in marathi, female gender in marathi.