marathi mhani
मराठी जग

Proverbs with Marathi meaning | मराठी म्हणी व अर्थ

400+ Proverbs with Marathi meaning | मराठी म्हणी व त्यांचे अर्थ : मराठी भाषेत तश्या बऱ्याच म्हणी आहेत. या म्हणींन मध्ये त्या-त्या प्रादेशिक बोली भाषेनुसार त्यांच्या शब्दात बदल होतो, पण त्याच्या मागचा त्यांचा अर्थ किंवा आशय मात्र सारखाच असतो. म्हणींचा अर्थ हा त्या संभाषणातील वाक्यांच्या अर्थानुसार थोडा-फार बदलतो. स्मार्ट-स्कूल ने येथे ४०० हुन अधिक म्हणी व त्यांचा अर्थ देण्याचा प्रयत्न केला आहे.

➤मराठी भाषेतील म्हणी :

क्र. मराठी म्हणीम्हणींचा अर्थ
१.देव तारी त्याला कोण मारी ?जर देवाची कृपा आपल्यावर असेल तर आपले कोणीही वाईट करू शकत नाही.
अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ?प्रत्येक गोष्टीला ठराविक मर्यादा ही असतेच.
३.अंगापेक्षा बोंगा मोठामूळ गोष्टींपेक्षा त्याच्या अनुषांगिक गोष्टींचा मोठेपण जास्त असणे.
४.अंगाले सुटली खाज, हाताला नाही लाजगरज असेल तर कोणतीही गोष्ट करावी लागते.
५.अंगावरचे लेणे, जन्मभर देणेदागिन्याकरिता कर्ज काढायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे.
६.अंत काळापेक्षा मध्यान्हकाळ कठीणमरण्याच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक त्रासदायक वाटतात.
७.अंथरूण पाहून पाय पसरावेआपली मर्यादा जाणून कोणतेही कार्य करावे.
८.अंधारात केले, पण उजेडात आलेकितीही गुप्तपणे केलेली गोष्ट एक-ना-एक दिवस उजेडात येतेच.
९.अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धेकोणतेही ज्ञान नसतानाही स्वतःला महाज्ञानी समाजात असतात.
१०.अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी ?स्वतः केलेली चूक मान्य न करता, उलटी ती दुसऱ्याच्या माथी मारून मारून मोकळे होणे.
११.अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्थाकोणतेही तथ्य नसतानाही, अशक्यकोटीतील गोष्टी करणे.
१२.अचाट खाणे आणि मसणात जाणे.कोणत्याही गोष्टीचा अतिरके हा वाईटच असतो.
१३.अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचेएकाने कृत्य केले आणि त्रास मात्र साऱ्यांना झाला.
१४.अडक्याची अंबा आणि गोंधळाला रुपये बारामुख्य गोष्टीपेक्षा त्याच्या अनुषंगिक गोष्टींचाच खर्च जास्त असणे.
१५.अडला हरी गाढवाचे पाय धरीएखाद्या बुद्धीमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते
१६.अडली गाय फटके खायएखादा माणूस अडचणीत सापडला, की त्याला सर्व कडून त्रास दिले जाते.
१७.अति तेथे मातीकोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसान दायकच असतो.
१८.अति शहाणा त्याचा बैल रिकामाजो मनुष्य फार शहाणपणा करतो त्याचे कार्य अधुरेच राहते.
१९.अतिपरिचयात अवज्ञाजास्त जवळीकता झाल्यास अपमान होण्याची शक्यता असते.
२०.अती झाले अन आसू आलेकोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसान दायकच असतो.
२१.अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणेदुसऱ्याकडून आवश्यक ती मदत घ्यायची शिवाय आणखीनही काही गोष्टी मागून घेऊन मिजास दाखवायची.
२२.अन्नाचा येते वास, कोरीचा घेते घासएखादी गोष्ट करायची नाही, पण त्यात मन असणे.
२३.हापापाचा माल गपापालोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन कधी टिकत नाही.
२४.अर्थी दान महापुण्यगरजू माणसाला दान केल्यामुळे पुण्य मिळते.
२५.अळी मिळी गुप चिळीरहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी गप्प बसणे.
२६.अवचित पडे, नि दंडवत घडेस्वतःची चूक लपविण्याचा प्रयत्न करणे.
२७.अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूपअतिशय उतावळेपणाचे काम.
२८.अवसबाई इकडे पुनवबाई तिकडेएकमेकांच्या विरुद्ध बाजू.
२९.असंगाशी संग आणि प्राणाशी गाठदुर्जन माणसाची सोबत केल्यास जीवालाही धोका निर्माण होतो
३०.असतील शिते तर जमतील भुतेएखाद्या माणसाकडून फायदा करून घ्यायचा असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.
३१असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्यादिवशी शिमगाअनुकूलता असेल तेव्हा मजा करणे आणि नसेल तेव्हा उपाशी राहण्याची पाळी येणे.
३२.आंधळं दळतं कुत्रं पिठ खातंएकानं मेहनत करायची आणि दुसर्‍यांनं त्याचा फायदा घ्यायचा .
३३आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळेअपेक्षेपेक्षा जास्त प्राप्त होणे.
३४.आंधळ्या बहिर्यांची गाठएकमेकांना मदत करण्यास अयोग्य असणार्‍या दोन माणसांची भेट होणे .
३५.आईचा काळ बायकोचा मवाळआईकडे लक्ष्य न देता बायकोची काळजी घेणे.
३६.आईची माया अन् पोर जाईल वायागरजेपेक्षा जास्त लाड केले तर मुले बिघडतात
३७.आग खाईल तो कोळसे ओकेलजसे काम तसे फळ
३८आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरत्रास एकीकडे, उपाय भलतीकडे.
३९आचार भ्रष्टी सदा कष्टीज्याचे विचार चांगले नसतील . तो नेहमी दु:खी असतो.
४०.आजा मेला नातू झालाएखादा तोटा होणे , त्याच वेळी फायद्याची गोष्ट होणे .
४१.आठ पूरभय्ये नऊ चौबेखूप मूर्ख लोकांपेक्षा चार हुशार पुरेसे.
४२.आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपलीअति मूर्खपणाची अतिशयोक्ती.
४३.आत्याबाईला जर मिशा असत्या तरनेहमी कोणत्याही कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे.
४४.आधणातले रडतात व सुपातले हसतातस्वतः संंकटात असतानाही दुसर्‍याचे दुःख पाहून हसू येते.
४५.आधी पोटोबा मग विठ्ठोबापहिले खाण्यापिण्याची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा.
४६.आधी शिदोरी मग जेजूरीपहिले जेवण मग देवपूजा
४७.आधीच उल्हास त्यात फाल्गुन मासअगोदरच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या आळशी स्वभावाला पोषक, परिस्थिती निर्माण होणे.
४८.आधीच तारे, त्यात गेले वारेविचित्र व्यक्तीच्या वागण्यात भर पडणारी घटना घडणे.
४९.आधीच मर्कट तशातही मद्य प्यालाआधीच करामती व त्यात मद्य पिऊन जास्तच विचित्र परिस्थिती निर्माण होते.
५०.आपण मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाहीस्वतः अनुभवल्या शिवाय शहाणपण नसते.
५१.आपण हसे लोळायला, शेंबूड आपल्या नाकालाज्या अवगुणासाठी आपण दुसर्‍याला हसतो,तेच दोष आपल्या अंगी असणे
५२.आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कारटंस्वत:चे चांगले आणि दुसर्‍यांचे वाईट असा स्वभाव असणे.
५३.आपला हात जगन्नाथआपली प्रगती ही आपल्या कर्मावर अवलंबून असते.
५४.आपली पाठ आपणास दिसत नाहीआपले दुर्गुण स्वतःला कधीच दिसत नाहीत.
५५.आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकुनदुसऱ्याला त्रास देण्यासाठी स्वतःचे नुकसान करून घेणे.
५६.आपलेच दात आपलेच ओठआपल्याच माणसाने चूक केल्यामुळे अडचण निर्माण होणे .
५७.आपल्याच पोळीवर तूप ओढणेफक्त आपलाच फायदा करून घेणे.
५८.आयजीच्या जीवावर बायजी उदारदुसऱ्याचा पैसा खर्च करून उदारता दाखवणे
५९.आयत्या बिळात नागोबादुसर्‍याने केलेल्या गोष्टीचा आपण फायदा उठविणे.
६०.आलीया भोगाशी असावे सादरकाहीही कटकट न करता असलेली परिस्थिती स्वीकारणे.
६१.आवळा देऊन कोहळा काढणेआपला फायद्यासाठी एखाद्या व्यक्तीला छोटी वस्तू देऊन मोठी वस्तू घेणे .
६२.इकडे आड तिकडे विहीरदोन्ही बाजूंनी अडचणीची अवस्था निर्माण होणे.
६३.इच्छा तेथे मार्गकोणतीही गोष्ट करण्याची इच्छा असेल तर मार्ग निघतोच.
६४.इच्छिलेले जर घडते तर भिक्षूकही राजे होतेइच्छेप्रमाणे सगळे झाले तर सर्व लोक धनवान झाले असते.
६५.इन मीन साडेतीनएखादी गोष्ट करण्यासाठी कमीत कमी लोक हजर असणे.
६६.ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतोजन्मास आलेल्याचे पालन पोषण कसेही होतेच.
६७.उंदराला मांजर साक्ष एखादी वाईट गोष्ट करताना एकमेकांस साथ देणे .
६८.उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठीप्रत्येक मनुष्य आपल्या कुवतीनुसार काम करतो.
६९.उंबर पिकले आणि नडगीचे (अस्वलाचे) डोळे आलेफायद्याची वेळी येणे; पण त्याचा फायदा न घेता येणे.
७०.उकराल माती तर पिकतील मोतीमशागत केली तर चांगले पीक येतेच .
७१.उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला?एखादे काम हातात घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो.
७२.उचल पत्रावळी, म्हणे जेवणारे किती?जे काम करायचे ते सोडून देऊन दुसऱ्याच पंचायती करणे.
७३उचलली जीभ लावली टाळ्यालामागचा पुढचा विचार न करता बोलणे
७४.उठता लाथ बसता बुक्कीप्रत्येक चुकीच्या कामाबद्दल शिक्षा करणे.
७५.उडत्या पाखराची पिसे मोजणेअगदी सहजपणे कोणत्याही कठीण कामाची परीक्षा करणे.
७६.उथळ पाण्याला खळखळाट फारअंगी थोडेसे गुण असणाऱ्या माणसाने खूप बढाई मारणे .
७७.उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूकएखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही वेळ वाट पहावी लागते.
७८.उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंगअतिशय उतावीळपणाने काम करणे.
७९.उतावळी बावरी (नवरी) म्हातार्‍याची नवरीअति उतावळेपणाने आपलेच नुकसान होते.
८०.उद्योगाचे घरी रिद्धी – सिद्धी पाणी भरीजेथे उद्योग केला असतो तेथे संपत्ती ही येतेच.
८१.उधारीचे पोते, सव्वा हात रितेजी गोष्ट दुसऱ्या कडून मागून घ्यावी लागते, ती नेहमी कमीच भासते.
८२.एक ना धड भाराभर चिंध्याएकाच वेळी अनेक कामे केली की कोणतेच काम पूर्ण होत नाही.
८३.उभारले राजवाडे तेथे आले मनकवडेपैसा आला की, तिच्या मागे हाजी-हाजी करणारे ही येतात.
८४.उभ्याने यावे आणि ओणव्याने जावेयेताना ताठ मानेने यावे आणि जाताना खाली मान घालून जावे.
८५.उसाच्या पोटी कापूससद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती असणे.
८६.ऊराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणेअतिशय दयनीय परिस्तिथी.
८७.ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नयेकोणत्याही चांगल्या गोष्टीचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
८८.एक कोल्हा सतरा ठिकाणी व्यालाएका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे.
८९.एका कानावर पगडी, घरी बाईल उघडीबाहेर खूप मोठा दिखावा, पण घरी मात्र दारिद्र्य.
९०.एका खांबावर द्वारकाएकाच व्यक्तीवर सर्व अवलंबून असणे.
९१.एका पिसाने मोर होत नाहीछोट्याश्या यशाने प्रसिद्धी मिळत नाही.
९२.एका माळेचे मणीसर्वजण सारख्याच स्वभावाचे असणे.
९३.एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीतदोन महान माणसे एकत्र गुण्यागोविदाने राहू शकत नाहीत.
९४.एका हाताने टाळी वाजत नाहीदोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्याचाच दोष असतो असे नाही.
९५.एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडीदुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा करवून घेणे.
९६.एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नयेदुसऱ्याने वाईट केले म्हाजून, आपणही त्याच्या सारखे वाईट कृत्य करू नये.
९७.ऐकावे जनाचे करावे मनाचेलोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या जे योग्य वाटेल तेच करावे.
९८.ऐंशी तेथे पंचऐंशीअतिशय उधळेपणाची वृत्ती असणे.
९९.ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार |मोठ्या व्यक्तीला यातनाही तितक्याच मोठ्या असतात.
१००.ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कोठे?सांगितलेले काम बाजूला सोडून नकोत्या चौकशा करणे.

सर्वनामाचे प्रकार : सर्वनामाचे मुख्य सहा प्रकार आहेत. १] पुरुषवाचक सर्वनाम … अधिक जाणून घ्या…

क्र. मराठी म्हणीम्हणींचा अर्थ
१०१.ओढ फुटो किंवा खोकाळ फुटोकोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण करणे.
१०२.ओळखीचा चोर जीवे न सोडीओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा नेहमी धोकादायक असतो.
१०३.औटघटकेचे राज्यखुप कमी वेळेसाठी राहणारी गोष्ट.
१०४.कडू कारले तुपात तळले सारखरेत घोळले तरीही कडू ते कडूचकिती ही प्रयत्न केले तरीही एखाद्या दुर्गुणी माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही.
१०५.कणगीत दाणा तर भिल उताणागरजेपेक्षा जास्त जवळ असले की लोक कोणाची पर्वा करत नाहीत.
१०६.कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडीकधी गरीबी तर कधी श्रीमंती येणे.
१०७.कधी तुपाशी तर कधी उपाशीकधी श्रीमंती तर कधी गरीबी येणे.
१०८.कर नाही त्याला डर कशाला ?ज्याने काही गुन्हा किंवा वाईट कृत्य केले नाही त्याने परिणामाला घाबरण्याची गरज नाही.
१०९.करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापतेकाही गोष्टी अश्या असतात कि त्या केल्या तरी वाईट किंवा न केल्या तरी वाईटच.
११०.करावे तसे भरावेजशी कर्म केले असेल त्याप्रमाणे चांगले वा वाईट फळ मिळते.
१११.बोलेन ती पूर्व दिशामी जे करेन ते योग्य, मी जे म्हणेन तेच बरोबर असे वागणे.
११२.करुन करुन भागला आणि देवध्यानी लागलाखूप वाईट कामे करून अखेर देवपुजेला लागणे.
११३.कशात काय अन फाटक्यात पायअगोदरच वाईट असताना आणखी वाईट घडणे.
११४.का ग बाई रोड, तर म्हणे गावाची ओढउगाचच निरर्थक गोष्टींची काळजी करणे.
११५.कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावातचुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे.
११६.काकडीची चोरी फाशीची शिक्षालहानश्या अपराधाला खूप मोठी शिक्षा देणे.
११७.काखेत कळसा नि गावाला वळसावस्तु जवळ असतानाही इतरत्र शोध घेणे.
११८.काजव्याचा उजळ त्याच्या अंगाभोवतीछोट्या गोष्टींचा प्रभाव हा मर्यादित असतो.
११९.काठी मारल्याने पाणी दुभंगत नाहीरक्ताचे नाते काही केले तरीही तुटत नसतात.
१२०.काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाहीजे काम भरपूर पैशाने होत नाही, ते थोड्याश्या अधिकाराने होते.
१२१.काडीचोर तो माडीचोरएखाद्या माणसाने लहान अपराध केला असताना त्याचा संबंध दुसऱ्या मोठ्या अपराधाशी जोडणे.
१२२.काना मागुन आली आणि तिखट झालीमागून येणाऱ्या व्यक्तीने आपल्यावर वरचढ होणे.
१२३.कानात बुगडी, गावात फुगडीआपल्या जवळ थोडी संपत्ती असताना त्याचे मोठे प्रदर्शन करणे.
१२४.काप गेले नी भोके राहिलीवैभव गेले आणि फक्त त्याच्या खुणा राहिल्या.
१२५.कामापुरता मामास्वतःचे काम करून घेईपर्यंत गोड-गोड बोलणे.
१२६.काल महिला आणि आज पितर झालाअतिशय उतावळेपणाची वृत्ती असणे.
१२७.काळ आला होता. पण वेळ आली नव्हतीअंत होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे.
१२८.कावळा बसायला अन फांदी तुटायला एकच वेळकसलाही संबंध नसताना निव्वळ योगायोगाने दोन गोष्टी एकाचवेळी घडणे.
१२९.कावळ्याच्या शापाने गाय मरत नाहीशूद्र माणसाने केलेल्या दोषारोपांनी थोरांचे नुकसान होत नसते.
१३०.कावीळ झालेल्यास सर्व जग पिवळे दिसतेज्या प्रकारची दृष्टी असते त्याच प्रकारे सर्व जण दिसतात.
१३१.कुंपणाने शेत खाल्ले तर दाद मागावी कोणाकडेराखण करणाऱ्यानेच विश्वासघात करून चोरी करणे.
१३२.कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचाआपल्या हातात असलेल्या वस्तूवर आपलाच हक्क सांगणे.
१३३.कुडी तशी पुडीजसा देहा प्रमाणे आहार असणे.
१३४.केस उपटल्याने का मढे हलके होते ?जेथे मोठ्या उपायांची गरज असते तेथे छोट्या उपायांचा काय उपयोग.
१३५.कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेचकितीही प्रयत्न केले तरी काहींच्या मूळच्या स्वभावत बदल होत नाही.
१३६.कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळस्वार्थासाठी शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे.
१३७.केळी खाता हरखले, हिशेब देता चरकलेएखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसे देताना नकोसे वाटते.
१३८.केळीला नारळी अन घर चंद्रमौळीअतिशय दारिद्र्याची परिस्तिथी असणे.
१३९.कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाहीनिश्चित घडणाऱ्या गोष्टी ह्या कधीच टाळता येत नाहीत.
१४०.कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभट्टाची तट्टाणीमहान गोष्टींची तुलना शुल्लक गोष्टीं सोबत होऊ शकत नाही.
१४१.कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशीचूक एकाची आणि शिक्षा मात्र दुसऱ्याला
१४२.कोरड्याबरोबर ओले ही जळतेअपराध्यासोबत निरपराध्याची गणना होणे.
१४३.कोल्हा काकडीला राजीछोट्या-छोट्या गोष्टींनी खुश होणे.
१४४.कोळसा उगाळावा तितका काळाचवाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकी ती वाईटच.
१४५.खर्चनाऱ्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखतेखर्च करणारा स्वच्छेने खर्चकरतो, परंतु दुसऱ्याला ते रुचत नाही.
१४६.खऱ्याला मरण नाहीखरे कधीच लपत नाही.
१४७.खाई त्याला खवखवेजो वाईट काम करतो त्याला नेहमी भीती वाटते.
१४८.खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशीपरिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने बिनधास्त वागणारा.
१४९.खाऊ जाणे तो पचवू जाणेएखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही तयार असतो.
१५०.खाण तशी मातीजसे आई वडिल त्याप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे.
१५१.खायला काळ भुईला भारनिरूपयोगी मनुष्याचा सर्वांनाच भार वाटतो.
१५२.खोट्याच्या कपाळी गोटाखोटेपणाने वाईट काम करणाऱ्यांचे नेहमी नुकसानच होते.
१५३.ग ची बाधा झालीअहंकारी होणे.
१५४.गरज सरो नि वैध मरोआपले काम झाले की मदत करणाऱ्याची पर्वा न करणे.
१५५.गरजवंताला अक्कल नसतेगरज असेल तर दुसऱ्याचे हवे तसे बोलणे निमूटपणे सहन करावे लागते.
१५६.खाऊन माजावे टाकून माजू नयेपैशाचा वा संपत्तीचा कधी गैरवापर करू नये.
१५७.गरजेल तो पडेल कायकेवळ बडबड करणारा माणस काही विशेष करू शकत नाही.
१५८.गर्वाचे घर खालीगर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते.
१५९.गळ्यात पडले झुंड हसून केले गोडगळ्यात पडल्यावर वाईट गोष्टी सुद्धा गोड मानून सहन करावी लागते.
१६०.गळ्यातले तुटले ओटीत पडलेनुकसान होता होता टळणे.
१६१.गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खालीएखादी गोष्ट साध्य झाली तर ठीक नाही तर तिचा दूसरा काही उपयोग करणे.
१६२.गाड्याबरोबर नळ्याची यात्रामोठ्यांच्या आश्रयाने कधी-कधी लहानांचाही फायदा होतो.
१६३.गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळमूर्ख लोक एकत्र आल्यावर मूर्खपणाचेच कृत्य घडते.
१६४.गाव करी ते राव न करीश्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे करू शकत नाही ते साधारण माणसे एकीच्या बळावर सहज करू शकतात.
१६५.गाढवाच्या पाठीवर गोणीएखाद्या गोष्टीची करबसल अनुकूलता असून उपयोग नाही तर तिचा फायदा हि करून घेता यायला हवा.
१६६.गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होतामुर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा काहीही उपयोग नसतो.
१६७.गाढवाला गुळाची चव काय ?ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नसतो त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळत नाही.
१६८.गाय व्याली, शिंगी झालीएखादी अघटित घटना घडणे.
१६९.गुरुची विद्या गुरूला फळलीएखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे.
१७०.गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्यज्याची वस्तु त्यालाच भेट म्हणून देणे.
१७१.गोगलगाय नि पोटात पायबाहेरून छान वाटणारी पण मनात कपट असणारी व्यक्ती.
१७२.गोरागोमटा कपाळ करंटादिसायला देखणा पण नशिबाने दुर्दैवी असा व्यक्ती.
१७३.घडाई परिस मडाई जास्तमुख्य गोष्टीपेक्षा त्याच्या आनुषंगिक गोष्टींचाच खर्च जास्त असणे.
१७४.घर ना दार देवळी बिऱ्हाडस्वतःच्या डोक्यावर कोणतीच जबाबदारी नसलेली व्यक्ती.
१७५.घर पहावे बांधून लग्न पहावे करूनस्वतःच्या अनुभवानेच माणूस शहाणा होतो.
१७६.घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतातकोणावर बिकट परिस्थिती आली तर सारे त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात.
१७७.घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडेआधीच असलेल्या अडचणीत आणखी भर पडण्याची घटना घडणे
१७८.घरोघरी मातीच्या चुलीसर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.
१७९.घेता दिवाळी देता शिमगाघ्यायला आनंद वाटतो तर द्यायच्या वेळी नकोसे वाटणे.
१८०.घोडे कमावते आणि गाढव खातेएकाने परशराम करावे व आळशी व्यक्तीने त्याचा गैर फायदा घ्यावा.
१८१.घोडे खाई भाडेधंद्यात फायद्या पेक्षा खर्चच जास्त असणे.
१८२.चढेल तो पडेलगर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही.
१८३.चमत्काराशिवाय नमस्कार नाही, पराक्रमावाचून पोवाडा नाहीलोकांना काही विशेष कार्य करून दाखविल्याशिवाय लोक आपल्याला मान देत नाहीत.
१८४.चवलीची कोंबडी आणि पावली फळणावळमुख्य गोष्टीच्या पयोगापेक्षा तिचा देखभालीचाच खर्च जास्त असणे.
१८५.चार जणांची आई बाजेवर जीव जाईजर जबाबदारी अनेकांची असेल तर काळजी घेण्यासाठी कोणीच घेत नाहीत.
१८६.चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचेप्रत्येकाला अनुकूल परिस्थिती ही येतेच.
१८७.चालत्या गाडीला खीळव्यवस्थित चाललेल्या कार्यात अडचण येणे.
१८८.चिंता परा ते येई घरादुसऱ्याचे वाईट चिंतित राहिले, कि ते कधी-ना-कधी आपल्यावरच उलटते.
१८९.चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडे उडतातस्वतःच्याच हाताने स्वतःची बदनामी करून घेणे.
१९०.चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर भागुबाईघरात शूर पणाचा आव आणायचा व बाहेर मात्र घाबरायचे.
१९१.चोर सोडून संन्याशालाच फाशीखऱ्या अपराध्याला सोडून निरपराध माणसाला शिक्षा देणे.
१९२.चोरांच्या हातची लंगोटीज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून काहीतरी मिळवून घेणे.
१९३.चोराची पावली चोराला ठाऊकवाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळत असतात.
१९४.चोराच्या उलट्या बोंबास्वतः गुन्हा करून दुसऱ्यावर दोषांरोप करणे.
१९५.चोराच्या मनात चांदणेवाईट कृत्य करणाऱ्यालाच आपले कृत्य उघडकीस येईल की काय अशी भीती सतत वाटत राहते.
१९६.चोरावर मोरएखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याच्या वरचढ ठरणे.
१९७.जलात राहून माशाशी वैर करू नयेज्यांच्या सहवासात रहावे लागते त्यांच्याशी शत्रुत्व करून घेऊ नये.
१९८.जळतं घर भाड्याने कोण घेणार ?नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोणीच करत नाही.
१९९.जळत्या घराचा पोळता वासाप्रचंड नुकसानीतून जे वाचले ते आपले समजून समाधान मानावे.
२००.जशी देणावळ तशी धुणावळजितका मोबदला त्याच प्रमाणात काम करणे.

नाम म्हणजे काय ? : एखाद्या व्यक्तिला, वस्तुला, पक्षांना, प्राण्यांना, एखाद्या ठिकाणाला तसेच काल्पनिक घटक, व्यक्तीच्या भावना किंवा… Read more…

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार

50 marathi proverbs, proverbs in english to marathi, proverbs meaning in marathi, Marathi Mhani (मराठी म्हणी), मराठीतील सर्व म्हणी, मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे, मराठी म्हणी व त्यांचे अर्थ, marathi mhani v tyanche arth, list of marathi mhani, marathi v arth, marathi mhani with meaning.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *