400+ मराठी म्हणी व त्यांचे अर्थ -Proverbs in Marathi with meaning :
400+ Proverbs with Marathi meaning (Proverbs meaning in Marathi) | मराठी म्हणी व त्यांचे अर्थ : मराठी भाषेत तश्या बऱ्याच म्हणी आहेत. या म्हणींन मध्ये त्या-त्या प्रादेशिक बोली भाषेनुसार त्यांच्या शब्दात बदल होतो, पण त्याच्या मागचा त्यांचा अर्थ किंवा आशय मात्र सारखाच असतो. म्हणींचा अर्थ हा त्या संभाषणातील वाक्यांच्या अर्थानुसार थोडा-फार बदलतो. स्मार्ट-स्कूल ने येथे ४०० हुन अधिक म्हणी व त्यांचा अर्थ देण्याचा प्रयत्न केला आहे.
➤मराठी भाषेतील म्हणी :
क्र. | मराठी म्हणी | म्हणींचा अर्थ |
---|---|---|
२०१. | जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही | बाह्य देखाव्याने कोणी ज्ञानी होत नाही. |
२०२. | जारात तुरी भट भटणीला मारी | काल्पनिक गोष्टीवरुन उगाचच भांडण करणे |
२०३. | जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे | जेंव्हा दुसऱ्याच्या स्थितीत आपण जातो तेव्हा तिचे खरी माहिती आपल्याला कळते. |
२०४. | ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी | एकच प्रकारचा स्वभाव असलेल्या व्यक्तींनी एकमेकांची उणिवा काढण्यात अर्थ नसतो. |
२०५. | जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी | मातेकडून बालकावर सुसंस्कार होतात म्हणून ते भविष्यात कर्तुत्ववान होते. |
२०६. | जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही | काही माणसांचा मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही. |
२०७. | जीत्या हुळहुळे आणि मेल्या कानवले | जिवंतपणी दुर्लक्ष करायचे व मेल्यावर त्याचे कोड कौतुक करायचे. |
२०८. | जे न देखे रवि ते देखे कवी | जे सूर्य पाहू शकत नाहीत ते कवी त्याच्या कल्पनेने पाहू शकतो. |
२०९. | जो गुळाने मरतो त्याला विष कशास ? | जेथे गोड बोलून काम होते तेथे विषारी उपाय कशाला करायचे. |
२१०. | ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी | जो आपल्यावर उपकार करतो त्याच्या उपकाराचे गुणगान करावे. |
२११. | ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे | एखाद्याचे चांगले करायला जावे तर तो आपला विरोध करून स्वतःचाच हेका पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. |
२१२. | ज्याचे खावे मीठ त्याचे करावे निट | जो आपल्यावर उपकार करतो त्याचे नेहमी चांगले चिंतावे. |
२१३. | ज्याच्या हाती ससा, तो पारधी | ज्याच्या हाती वस्तू असते त्याला दुसऱ्याच्या कर्तृत्वाचे श्रेय बहाल केले जाते. |
२१४. | झाकली मूठ सव्वा लाखाची | कधी-कधी विचित्र गोष्टी झाकलेल्याच बऱ्या. |
२१५. | टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही | कष्ट सोसल्याशिवाय कोणाला मोठेपण येत नाही. |
२१६. | टिटवी देखील समुद्र आटविते | सामान्य वाटणारा माणूस देखील प्रसंगी महान कार्य करू शकतो. |
२१७. | डोंगर पोखरून उंदीर काढणे | प्रचंड परिश्रम केल्यानंतरही थोडेच यश प्राप्त होणे. |
२१८. | डोळ्यात केर आणि कानात फुंकर | आजार एका जागी व उपचार मात्र दुसऱ्याच जागी. |
२१९. | ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला | वाईट माणसाच्या सहवासामध्ये चांगला माणूसही बिघडला जाऊ शकतो. |
२२०. | ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा | वाईट संगतीचे परिणाम हे नेहमी वाईटच असतात. |
२२१. | तंटा मिटवायला गेला, गव्हाची कणिक करून आला | भांडण मिटविण्याऐवजी उलट हे भडकावणे. |
२२२. | तट्टाला टूमणी, तेजीला इशारत | जी गोष्ट मूर्खाला शिक्षेने ही समजत नाही ती शहाण्याला केवळ इशाऱ्याने समजते. |
२२३. | तरण्याचे कोळसे, म्हातार्याला बाळसे | एखाद्या गोष्टींमध्ये अगदी विरुद्धभास असणे. |
२२४. | तळे राखी तो पाणी चाखी | ज्याच्याकडे एखादे काम सोपवले आहे, त्याने त्याचा थोडा फायदा करून घेणे. |
२२५. | ताकापुरते रामायण | एखाद्याकडून आपले काम होईपर्यंत त्याची स्तुती करत राहणे. |
२२६. | तू दळ माझे आणि मी दळतो गावच्या पाटलाचे | आपले काम दुसऱ्याने करावे आपण मात्र भलत्याचेच काम करावे. |
२२७. | तीथ आहे तर भट नाही, भट आहे तर तीथ नाही | एक गोष्ट उपलब्ध असली तरी तिच्या जोडीला आवश्यक ती गोष्ट उपलब्ध नसणे. |
२२८. | तीन दगडात त्रिभुवन आठवते | संसार केल्यावरच त्यातले खरे मर्म कळते. |
२२९. | तुकारामबुवांची मेख | काहीही न सुटणारी गोष्ट. |
२३०. | तेरड्याचा रंग तीन दिवस | कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलाई हा थोड्या वेळपर्यंतच राहतो. |
२३१. | तेल गेले तूप गेले, हाती राहिले धुपाटणे | उपयोगी दोन गोष्टीमधून आपल्या मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे. |
२३२. | तोंड दाबून बुक्यांचा मार | एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याची संधीही न देणे. |
२३३. | तोबऱ्याला पुढे, लगामाला पाठीमागे | खायला पुढे आणि कामाला मागे असणे. |
२३४. | थेंबे थेंबे तळे साचे | छोट्या-छोट्या बचतीने हि कालांतराने मोठा संचय जमा होतो. |
२३५. | थोरा घराचे श्वान सर्व देती मान | मोठ्या माणसांचा आश्रयात असणाऱ्या व्यक्तीला कारण नसतानाही मोठेपणा दिला जातो. |
२३६. | दगडापेक्षा वीट मऊ | मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी त्रासदायक असणे. |
२३७. | दस की लकडी एक्का बोजा | सर्वानी थोडा हातभार लावल्यास मोठे कामही सहज पूर्ण होते. |
२३८. | दहा गेले, पाच उरले | आयुष्य कमी उरणे. |
२३९. | दाखविलं सोनं हसे मुल तान्हं | पैशाचा मोह प्रत्येकालाच असतो, म्हणून पैशाची लालूच दाखविताच कामे झटकन होतात. |
२४०. | दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत | एक गोष्ट अनुकूल असली तरी तिच्या जोडीला आवश्यक असणारी गोष्ट अनुकूलन नसणे. |
२४१. | दात कोरून पोट भरत नाही | मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून काही उपयोग होत नाही. |
२४२. | दाम करी काम, बिवी करी सलाम | पैसे खर्च केले की कोणतेही काम होते. |
२४३. | दिल चंगा तो कथौटी में गंगा | आपले मन पवित्र असल्यास पवित्र गंगा आपल्याजवझालेळ असते. |
२४४. | दिल्ली तो बहुत दूर है | झालेल्या कामाच्या मानाने खूप काम बाकी असणे |
२४५. | दिवस बुडाला मजूर उडाला | रोजाने व मोलाने काम करणारा त्याची कामाची वेळ संपते ना संपते तोच तो निघून जाणार. |
२४६. | दिव्याखाली अंधार | मोठ्या माणसातदेखील अवगुण असतात . |
२४७. | दुधाने तोंड भाजले, कि ताकपण फुंकून प्यावे लागते | एखाद्या बाबतीत चूक झाली , की प्रत्येक गोष्टीत सावधगिरी बाळगावी लागते . |
२४८. | दुभत्या गाईच्या लाथा गोड | ज्याच्या कडून फायदा होतो, त्याचा त्रासदेखील मनुष्य सहन करतो. |
२४९. | दुरून डोंगर साजरे | कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते; परंतु जवळ गेल्यावर तिचे खरे रूप कळते. |
२५०. | दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते; पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही | दुसऱ्याचा लहानसा दोष आपल्याला दिसतो; पण स्वार्थामुळे स्वतःचे अवगुण दिसत नाहीत . |
२५१. | दृष्टीआड सृष्टी | आपल्या नजरे मागे जे चालते त्याकडे लक्ष देऊ नये |
२५२. | देखल्या देवा दंडवत | सहज दिसले म्हणून विचारपूस करणे. |
२५३. | देणे कुसळांचे घेणे मुसळाचे | पैसे थोडे आणि काम खूप . |
२५४. | देव तारी त्याला कोण मारी ? | देवाची कृपा असेल तर आपले कोणीही वाईट करू शकत नाही. |
२५५. | दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी | नशिबात नसेल तर जवळ आलेली संधी सुद्धा दूर जाते. |
२५६. | देश तसा वेश | परिस्थितीप्रमाणे वागणे बदलणे . |
२५७. | दैव आले द्यायला अन् पदर नाही घ्यायला | नशिबाने मिळणे पण घेता न येणे |
२५८. | दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई | नशिबावर अवलंबून असणाऱ्यांना काहीच मिळत नाही पण काम करणारा कधीच उपाशी राहत नाही |
२५९. | दैव देते आणि कर्म नेते | नशिबामुळे सगळे मिळणे पण स्वतःच्या कृत्यामुळे सगळे गमावणे . |
२६०. | नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे | . काही लोकांना कितीही समजावून सांगितले तरी काही उपयोग नसतो . |
२६१. | दोन मांडवांचा वऱ्हाडी उपाशी | दोन वस्तूंवर अवलंबून असणाऱ्या चे काम होत नाही. |
२६२. | धनगराची कुत्रे लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी | काहीच कामाचे नसणे. |
२६३. | धर्म करता कर्म उभे राहते | एखादी चांगली गोष्ट करत असताना अनेकदा त्यातून चुकीची गोष्ट निष्पन्न होते . |
२६४. | धार्याला (मोरीला) बोळा व दरवाजा मोकळा | छोट्या गोष्टीकडे लक्ष्य देणे परंतु मोठी कडे लक्ष्य न देणे |
२६५. | धिटाई खाई मिठाई, गरीब खाई गचांड्या | वाईट लोकांचे काम सहज होते तर गरिबांना खूप प्रयत्न करावे लागते. |
२६६. | न कर्त्याचा वार शनिवार | एखादे काम करायचे नसते तोवेगवेगळी करणे देवून ते करायचे टाळतो . |
२६७. | नऊ दिवस | कोणत्याही नवीन गोष्टीच महत्व काही काळ टिकून कालांतराने कमी होते . |
२६८. | नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने | चुकीचं काम करणाऱ्यांच्या मार्गात एक सारख्या अनेक अडचणी येतात |
२६९. | नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहू नये | नदीचे उगमस्थान व ऋषीचे कूळ शोधायला जाऊ नये कारण त्यात काहीतरी दोष असतोच. |
२७०. | नाक दाबले, की तोंड उघडते | एखाद्या माणसाच्या कमजोरी चा फायदा घेऊन हवे ते काम करून घेणे . |
२७१. | नाकापेक्षा मोती जड | मालकापेक्षा नोकर वरचढ असणे |
२७२. | नावडतीचे मीठ आळणी | आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती वाईटच दिसते |
२७३. | नागव्यापाशी उघडा गेला, सारी रात्र हिवाने मेला | आधीच दरिद्री असणाऱ्याकडे मदत मागणे . |
२७४. | नागिन पोसली आणि पोसणाराला डसली | वाईट माणसाशी कितीही चांगले वागले तर ते आपल्याशी वाईटच वागणार |
२७५. | नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे | एकाला फसवून दुसऱ्याला मदत करणे |
२७६. | नाचता येईना अंगण वाकडे | आपल्याला एखादे काम करता येत नसेल तेव्हा आपला कमीपणा लपविण्यासाठी त्या गोष्टीत दोष दाखवणे |
२७७. | नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे | देवाचे नाव घेऊन स्वार्थ जपणे. |
२७८. | नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा | नाव मोठे लक्षण छोटे . |
२८०. | नाही पण जण्याची तरी असावी | एखादी वाईट कृत्य करताना म्हणाला काही वाटले नाही तरी जगाला काय वाटेल याचा विचार करावा |
२८१. | निंदकाचे घर असावे शेजारी | निंदा करणारा माणूस आसपास असल्यामुळे आपल्याला आपले दोष कळतात |
२८२. | नेसेन तर पैठणी (शालू) च नेसेन, नाही तर नागवी बसेन | अतिशय हट्टीपणाचे वर्तन करणे |
२८३. | पडलेले शेण माती घेऊन उठते | एखाद्या चांगल्या माणसावर काहीतरी दोष आला की त्याने किती जरी निवारण केले तरी त्याच्या चारित्र्यावर डाग राहतोच |
२८४. | पदरी पडले पवित्र झाले | कोणती गोष्ट एकदा स्वीकारली कि तिला नाव ठेवणे योग्य नसते |
२८५. | पळसाला पाने तीनच | सगळीकडे एक सारखीच परिस्थिती असणे |
२८६. | पाचामुखी परमेश्वर | जास्त लोक म्हणतील तेच खरे मानावे |
२८७. | पाची बोटे सारखी नसतात | सगळ्या माणसांचा स्वभाव वेगवेगळा असतो |
२८८. | पाप आढ्यावर बोंबलते | पाप लपून राहत नाही |
२८९. | पायलीची सामसूम चिपट्याची धामधूम | जिथे मोठी शांत असतात तेथे छोटे वरचढ असतात |
२९०. | पायाची वाहन पायीच बरी | मूर्ख माणसाला अधिक सन्मान दिला तर तो जास्त मूर्खपणा करतो. |
२९१. | पाहुनी आली आणि म्होतुर लावून गेली | पाहुणे म्हणून येणे आणि तोटा करून जाणे |
२९२. | पी हळद नि हो गोरी | कोणत्याही गोष्टीत उतावळेपणा करणे |
२९३. | पुढच्याच ठेच मागचा शहाणा | पुढच्याच्या अनुभवावरून आपण बोध घेतो व सावधपणे वागतो. |
२९४. | पुढे तिखट मागे पोचट | दिसायला फार मोठी असणे पण प्रत्यक्षात तसे नसणे. |
२९५. | पुत्र मागण्यास गेली भ्रतार (नवरा) घालवून आली | फायदा करून घेण्यासाठी जाणे परंतु स्वतःचेच नुकसान येणे. |
२९६. | पै दक्षिण लक्ष प्रदक्षिणा | पैसा कमी आणि काम जास्त असणे. |
२९७. | पोटी कस्तुरी वासासाठी फिरे भिरीभिरी | स्वतः जवळच असणारी वस्तू शोधण्यासाठी सर्वकडे फिरणे. |
२९८. | पोर होई ना व सवत सहिना | आपल्याकडून होत नाही व दुसऱ्यालाही करू द्यायचे नाही अशी स्थिती असणे. |
२९९. | फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय | राजाने दिलेला न्याय मन सारखा नसला किंवा चुकीचा जरी असला तरी तो मानावा लागतो. |
३००. | फुटका डोळा काजळाने साजरा करावा | आपल्यातील दोष, जो सुधारू शकत नसेल तर तो लपवता येईल तितका लपवावा. |
Marathi Numbers in words | Marathi Ank | मराठी अंक
Proverbs meaning in Marathi :
क्र. | मराठी म्हणी | म्हणींचा अर्थ |
---|---|---|
३०१. | फुल ना फुलाची पाकळी | वास्तविक देण्याचे सामर्थ्य नसते, तेंव्हा त्यापेक्षा खूप कमी देऊन मन राखणे. |
३०२. | फुले वेचली तिथे गोवर्या वेचणे | जेथे आनन्द उपभोगला तेथे दुःख भोगणे |
३०३. | बकरीचे शेपूट माशाही वारीना व लाजही राखीना | काहीच उपयोग नसणारी वस्तू |
३०४. | बळी तो कान पिळी | बलवान मनुष्य दुसऱ्यांवर हुकूम गाजवतो |
३०५. | बाप तसा बेटा | बापासारखे गुण मुलात असणे |
३०६. | बाप से बेटा सवाई | वडिलांपेक्षा मुलगा अधिक हुशार असणे |
३०७. | बारक्या फणसाला म्हैस राखण | ज्याच्या पासून धोका आहे त्याच्याकडेच संरक्षणाची जबाबदारी देणे |
३०८. | बावळी मुद्रा देवळी निद्रा | दिसण्यास मूर्ख पण व्यवहारत हुशार माणूस |
३०९. | बुडत्याला काडीचा आधार | मोठ्या संकटाच्यावेळी मिळालेली थोडीशी मदतसुद्धा महत्त्वाची ठरते |
३१०. | बैल गेला आणि झोपा केला | एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली तजवीज ही व्यर्थ ठरते |
३११. | बोडकी आली व केस कर झाली | विधवा स्त्रीच लग्न होणे |
३१२. | बोलेल तो करेल | नुसती बडबड करणाऱ्याकडून काहीही काम होऊ शकत नाही |
३१३. | भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी | एखाद्याला आश्रय दिला तर तो समाधान न मानता जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करतो |
३१४. | भरवशाच्या म्हशीला टोणगा | आपण ज्या व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवतो अशाच व्यक्ती कडून विश्वासघात होतो |
३१५. | भागीचे घोडे की किवणाने मेले | भागीदारीत असणाऱ्या गोष्टीचा उपयोग सर्वच घेतात काळजी मात्र कोणीच घेत नाही |
३१६. | भिंतीला कान असतात | गोष्ट कितीही गुप्त ठेवली तरी ती उघड होतेच |
३१७. | भित्यापाठी ब्रह्मराक्षस बिद्री | काही कारण नसताना घाबरणे |
३१८. | भीक नको पण कुत्रा आवर | मनात नसले तर मदत करू नये परंतु निदान आपल्या कार्यात अडथळा आणू नये अशी परिस्थिती |
३१९. | भीड भिकेची बहीण | घाबरून नकार देण्याचे टाळले तर शेवटी आपणावर भीक मागण्याची पाळी येणे |
३२०. | मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये | कोणाच्याही चांगुलपणाचा दुरुपयोग करू नये |
३२१. | मन जाणे पाप आपण | आपण केलेले पाप दुसऱ्याला माहिती नसले तरी आपल्याला माहिती असतेच |
३२२. | मन राजा मन प्रजा | एखादे काम सांगणारे आपले मनच आणि करणारे पण मनच |
३२३. | मनात मांडे पदरात धोंडे | केवळ मोठ मोठ्या योजना करणे परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही न पडणे अशी स्थिती |
३२४. | मनी वसे ते स्वप्नी दिसे | ज्या गोष्टींचा आपण सतत विचार करतो तीच गोष्ट आपल्याला स्वप्नात दिसते |
३२५. | मल्हारी माहात्म्य | चुकीच्या ठिकाणी चुकीची गोष्ट करणे . |
३२६. | मांजरीचे दात तिच्या पिल्लाला लागत नाही | आई वडिलांच्या बोलण्याचा मुलांवर वाईट परिणाम होत नाही |
३२७. | माणकीस बोललं, झुणकीस लागलं | एकाला बोललेलं दुसऱ्याला लागणे |
३२८. | मानेवर गळू आणि पायाला जळू | आजार एक आणि उपाय दुसराच |
३२९. | मामुजी मेला अन् गांव गोळा झाला | छोट्याशा गोष्टीचा बाजार करणे |
३३०. | मारुतीची शेपूट | वाढत जाणारे काम |
३३१. | मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू | छोट्याशा गोष्टीचा प्रमाणापेक्षा जास्त आनंद साजरा करणे |
३३२. | मुंगीला मुताचा पूर | लोकांना छोटस संकट ही खूप मोठं वाटते |
३३३. | मुलाचे पाय पाळण्यात दिसतात | लहान वयातच व्यक्तीचे गुण व अवगुण कळतात |
३३४. | मूर्ख लोक भांडते वकील घरी बांधते | दोन मूर्ख लोकांच्या भांडणाचा फायदा तिसऱ्याला होतो |
३३५. | रडत राऊत रडत राव घोड्यावर स्वार | एखायाची इच्छा नसताना जबाबदारी त्याच्या अंगावर पडणे |
३३६. | म्हशीला मणभर दूध | एखादा व्यक्ती मेल्यानंतर त्याचे गुणगान करणे |
३३७. | यथा राजा तथा प्रजा | सर्वसामान्य लोक नेहमी मोठ्या किंवा वरिष्ठ लोकांचे अनुकरण करतात |
३३८. | या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे | फसवाफसवी करणे |
३३९. | ये रे कुत्र्या खा माझा पाय | आपण होऊन संकट आपल्यावर ओढवून घेणे |
३४०. | रंग जाणे रंगारी | ज्याचे ज्ञान त्यालाच माहित |
३४१. | राईचा पर्वत करणे | मूळ गोष्ट अगदी क्षुल्लक असताना तिचा वरचढ करून सांगणे. |
३४२. | राज्याचे घोडे आणि खासदार उडे | वस्तू एकाची आणि मिजास मात्र दुसऱ्याचीच. |
३४३. | रात्र थोडी सोंगे फार | कामे भरपूर पण वेळ थोडा असणे. |
३४४. | रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत | मुख्य गोष्ट सोडून बाकी सर्व काही सांगणे. |
३४५. | येरे माझ्या मागल्या | चांगल्या अर्थाने केलेला उपदेश सोडून पूर्वीप्रमाणेच चुकीचे वागणे. |
३४६. | रोज मरे त्याला कोण रडे | तीच ती गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील महत्व निघून जाते. |
३४७. | लंकेत सोन्याच्या विटा | दुसरीकडे कितीही फायद्याची गोष्ट असली तरी तिचा आपल्याला उपयोग नसतो. |
३४८. | लकडी दाखविल्या शिवाय मकडी वळत नाही | भीती किंवा धाक दाखवल्या शिवाय शिस्त लागत नाही. |
३४९. | लग्नाला गेली आणि बारशाला आली | अतिशय उशिराने पोहोचणे. |
३५०. | लग्नाला वीस तर वाजंत्री ला तीस | मुख्य कार्य सोडून उप कार्यालाच खर्च अधिक करणे. |
३५१. | लाज नाही मला कोणी काही म्हणा | निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या बोलण्याची पर्वा करत नाही |
३५२. | लेकी बोले सुने लागे | एखाद्याला असे बोलणे जे दुसऱ्याला लागेल |
३५३. | लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण | लोकांना उपदेश करायचा आणि स्वता त्याच्या उलट वागायचे |
३५४. | वरातीमागून घोडे | वेळ निघून गेल्यानंतर काम करणे |
३५५. | वळणाचे पाणी वळणावर जाणे | निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी व्हायच्या त्या होतातच |
३५६. | वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातोच | वाईट व्यक्तीला वाईट म्हणा किंवा चांगले म्हणा तो त्रास द्यायचा तो देणारच |
३५७. | वारा पाहून पाठ फिरविणे | परिस्थिती पाहून वागणे |
३५८. | वासरात लंगडी गाय शहाणी | मूर्ख माणसामध्ये कमी ज्ञान असणारा श्रेष्ठ असतो |
३५९. | वाहत्या गंगेत हात हात धुणे किंवा आपल्या तव्यावर पोळी भाजून घेणे | अनुकूल परिस्थितीत आपला होईल तो फायदा करून घेणे |
३६०. | विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर | गरजेच्या वस्तू घेऊन फिरणे |
३६१. | विचाराची तूट तेथे भाषणाला उत | मूर्ख लोकांच्या गर्दीत नुसती योग्य वेळेत बडबड असते |
३६२. | विशी विद्या तिशी धन | योग्य वेळेत केलेल्या कामावरून एखाद्याच्या कर्तुत्वाचा अंदाज बांधता येतो |
३६३. | विश्वासही ठेवला घरी चारी सुना गरवार करी | विश्वास तोडणे |
३६४. | शहाण्याला शब्दाचा मार | शहाण्या माणसाला त्याच्या चुकीबद्दल समजावून सांगितले तरी कळते |
३६५. | शितावरून भाताची परीक्षा | वस्तूच्या लहान भागावरून त्या संपूर्ण वस्तूची माहिती करून घेणे |
३६६. | शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी | चांगल्या कामातून चांगल्याच गोष्टी उत्पन्न होतात |
३६७. | शेजी देईल काय आणि मन धायेल काय ? | शेजारणीने एखादा पदार्थचांगल्या मानाने करून दिला तरीच आपल्या मनाची तृप्ति होऊ शकत नाही |
३६८. | शेजीबाईची कढी, धावधाव वाढी | दुसऱ्याची वस्तू घेऊन एखाद्यावर उपकार करणे |
३६९. | शेरास सव्वाशेर | एखाद्याला त्याच्यापेक्षा वरचढ माणूस भेटणे |
३७०. | श्रीच्या मागोमाग ग येतो | संपत्तीसोबत गर्वपण येतो |
३७१. | संग तसा रंग | संगती प्रमाणे वागणूक असणे |
३७२. | संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात | एखाद्या गोष्टीची सुरुवात मुळापासून करणे |
३७३. | सगळेच मुसळ केरात | महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याने घेतलेली सगळी मेहनत वाया जाणे |
३७४. | समर्थाघरचे श्वान त्याला सर्व देती मान | मोठा च्या घरच्या छोट्या व्यकयीलाही मान द्यावा लागतो |
३७५. | सरड्याची धाव कुंपणापर्यंतच | प्रत्येकाच्या कामास त्याची शक्ती व कुवत यांची मर्यादा पडते |
३७६. | सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी | एकदम अशक्य असलेली गोष्ट करणे |
३७७. | सात हात लाकुड नऊ हात ढलपी | एखादी गोष्ट खूप मोठी करून सांगणे |
३७८. | साप साप म्हणून भुई धोपटणे | संकट नसताना त्याचा आभास निर्माण करणे |
३७९. | सारा गांव मामाचा एक नाही कामाचा | जवळ खूप माणसे असणे पण वेळेला कोणीच उपयोगी न पडणें |
३८०. | सुंभ जळाला तरी पीळ जात नाही | संपती गेली तरी गर्व जात नाही |
३८१. | सुरुवातीलाच माशी शिंकली | कोणत्याही कामाच्या सुरुवातीलाच अपशकुन होणे |
३८२. | स्नान करून पुण्य घडे तर पाण्यात बेडूक काय थोडे | वरवरच्या चांगल्या कामाने पुण्य मिळत नाही. |
३८३. | हत्ती गेला पण शेपूट राहिले | कामाच्या बहुतेक भाग पूर्ण झालं आणि थोडेच शिल्लक राहिले आहे. |
३८४. | हत्ती बुडतो अन् शेळी ठाव मागते | जेथे भलेभले हात टेकतात तेथे साधारण कोणी बाजी मारतो. |
३८५. | हत्तीच्या दाढे मध्ये मिऱ्याचा दाणा | मोठ्या उपायांची गरज असताना अतिशय छोटे उपाय करत बसणे. |
३८६. | हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते | संकटे येतात ती मोठ्या प्रमाणावर पण कमी होताना मात्र हळूहळू कमी होतात. |
३८७. | हलवायाच्या घरावर तुळशीपत्र | परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसर्यालाच देणे स्वतःला काहीच नुकसान न होता. |
३८८. | हाजिर तो वजीर | जो वेळेवर हजर असतो त्याचाच फायदा होतो. |
३८९. | हात ओला तर मित्र भला | तुमच्या पासून काही फायदा होणार असेल तर लोक तुमची स्तुती करतात. |
३९०. | हात फिरे तिथे लक्ष्मी वसे | उद्योगी माणसाच्या घरी सदैव्य संपत्ती नांदत राहते. |
३९१. | हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे | जे आपल्या हातात आहे ते सोडून उगीचच दुसरे मिळवण्याच्या आशेने हाती आहे ते गमावण्याची वेळ येणे. |
३९२. | हातच्या काकणाला आरसा कशाला | स्पष्ट दिसत असलेल्या गोष्टीला पुरावा कशाला. |
३९३. | हिरा तो हिरा गार तो गार | गुणी माणसाचे गुण हे प्रकट होतातच. |
३९४. | हिऱ्या पोटी गारगोटी | चांगल्या च्या पोटी वाईट गोष्ट होणे. |
३९५. | हृदयाचा उन्हाळा आणि डोळ्यांच्या पावसाळा | उगीच खोटे अश्रू ढाळत बसणे. |
३९६. | एका पिसाने मोर होत नाही | छोट्याश्या यशाने प्रसिद्धी मिळत नाही. |
३९७. | होळी जळाली आणि थंडी पळाली | होळीनंतर थंडी कमी होत जाणे. |
३९८. | नाव मोठे लक्षण खोटे | नाव लौकिक मोठे असणे, पण अस्तित्वात मात्र काहीच नसणे. |
३९९. | सासू बोले सुने लागे | बोलायचे दुसऱ्यासाठी पण नाव कुना वेगळ्याचेच घ्यायचे. |
४०० | कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात | चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे. |
Proverbs meaning in Marathi :
(Proverbs meaning in Marathi : )इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
Proverbs meaning in Marathi : 50 marathi proverbs, proverbs in english to marathi, proverbs meaning in marathi, Marathi Mhani (मराठी म्हणी), मराठीतील सर्व म्हणी, मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे, मराठी म्हणी व त्यांचे अर्थ, marathi mhani v tyanche arth, list of marathi mhani, marathi v arth, marathi mhani with meaning. list of marathi mhani, marathi mhani list,