Types of Tense in Marathi
मराठी जग

Types of Tense in Marathi |काळ व त्याचे प्रकार

Types of tense in marathi (काळ – Tense) : एखाद्या वाक्यातील क्रियापदावरून त्या वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडली आहे याचा बोध होतो, त्या वेळेला त्या वाक्याचा ‘काळ’ असे म्हणतात.

मराठीत काळाचे प्रमुख तीन प्रकार आहेत.
१) वर्तमान काळ
२) भूतकाळ
३) भविष्यकाळ

वर्तमान काळभूतकाळभविष्यकाळ
साधा भावी आंबा खाते. भावीने आंबा खाल्ला. भावी आंबा खाईल.
चालू भावी आंबा खात आहे. भावी आंबा खात होती. भावी आंबा खात असेल.
पूर्ण भावीने आंबा खाल्ला आहे. भावीने आंबा खाल्ला होता. भावीने आंबा खाल्ला असेल.
चालू पूर्ण भावी रोज आंबा खाते. भावी रोज आंबा खात असे. भावी रोज आंबा खात राहील.

Types of tense in marathi | चला प्रत्येक प्रकार तपशीलवार पाहू :

१) वर्तमानकाळ :

वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून क्रिया आता घडत आहे असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘वर्तमानकाळ’ असे समजावे.

उदा. :
➥ भावी चिकू खाते.
➦ वेदांती शाळेत जात आहे.
➥ ग्रीष्मा खो-खो खेळते.
➦ राजेश क्रिकेट खेळतो.

वर्तमान काळाचे चार उपप्रकार पडतात.
अ) साधा वर्तमान काळ :
वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून क्रिया आता घडत आहे असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘साधा वर्तमान काळ’ असे समजावे.

उदा. :
➥ भावी आंबा खाते.
➦ वेदांती शाळेत जाते.
➥ निल अभ्यास करतो.
➦ विजय पोहायला जातो.

आ) अपूर्ण वर्तमान काळ/ चालू वर्तमान काळ :
वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून क्रिया अजून चालू आहे असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘चालू वर्तमान काळ’ असे समजावे.

उदा. :
➦ भावी आंबा खात आहे.
➦ वेदांती शाळेत जात आहे.
➥ निल अभ्यास करत आहे.
➦ विजय पोहायला जात आहे.

इ) पूर्ण वर्तमान काळ :
वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून क्रिया वर्तमानकाळातील असून ती आत्ताच पूर्ण झालेली आहे असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘पूर्ण वर्तमान काळ’ असे समजावे.

उदा. :
➥ भावीने आंबा खाल्ला आहे.
➦ वेदांती शाळेत गेली आहे.
➥ निलने अभ्यास केला आहे.
➦ विजय पोहायला गेला आहे.

ई) रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ :
एखाद्या वाक्यातील क्रिया वर्तमानकाळातील असून ती क्रिया सातत्त्याने घडत असल्याचा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘चालू पूर्ण वर्तमानकाळ’ असे समजावे.

उदा. :
➦ भावी रोज आंबा खाते.
➦ वेदांती दररोज शाळेत जाते.
➥ निल रोज अभ्यास करतो.
➦ विजय नेहमी पोहायला जातो.

Marathi Numbers in words | Marathi Ank | मराठी अंक

२) भूतकाळ :

वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून क्रिया घडून गेली आहे असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘भूतकाळ’ असे समजावे.

उदा. :
➥ भावीने चिकू खाल्ला.
➦ वेदांती शाळेत गेली.
➥ ग्रीष्मा खो-खो खेळली.
➦ राजेश क्रिकेट खेळला.

भूतकाळ काळाचे चार उपप्रकार पडतात. Types of tense in marathi :

अ) साधा भूतकाळ काळ :
वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून क्रिया आधीच घडून झाली आहे असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘साधा भूतकाळ काळ’ असे समजावे.

उदा. :
➥ भावीने आंबा खाल्ला.
➦ वेदांती शाळेत गेली.
➥ निलने अभ्यास केला.
➦ विजय पोहायला गेला.

आ) अपूर्ण भूतकाळ काळ/ चालू भूतकाळ काळ :
वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून भूतकाळात घडलेली क्रिया अजून चालू आहे असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘चालू भूतकाळ काळ’ असे समजावे.

उदा. :
➦ भावी आंबा खात होती.
➦ वेदांती शाळेत जात होती.
➥ निल अभ्यास करत होता.
➦ विजय पोहायला जात होता.

इ) पूर्ण भूतकाळ :
वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून क्रिया भूतकाळात घडून पूर्ण झाली आहे असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘पूर्ण भूतकाळ’ असे समजावे.

उदा. :
➥भावीने आंबा खाल्ला होता.
➦ वेदांती शाळेत गेली होती.
➥ निलने अभ्यास केला होता.
➦ विजय पोहायला गेला होता.

ई) रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ :
एखाद्या वाक्यातील क्रिया भूतकाळातील असून ती क्रिया सातत्त्याने घडत असल्याचा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘चालू पूर्ण भूतकाळ’ असे समजावे.

उदा. :
➥ भावी रोज आंबा खात असे.
➦ वेदांती दररोज शाळेत जात असे.
➥ निल रोज अभ्यास करत असे.
➦ विजय नेहमी पोहायला जात असे.

नाम म्हणजे काय ? : एखाद्या व्यक्तिला, वस्तुला, पक्षांना, प्राण्यांना, एखाद्या ठिकाणाला तसेच काल्पनिक घटक.… Read more…

३) भविष्यकाळ :

वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून क्रिया पुढे होणार आहे असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘भविष्यकाळ’ असे समजावे.

उदा. :
➥ भावी चिकू खाईल.
➦ वेदांती शाळेत जाईल.
➥ ग्रीष्मा खो-खो खेळेल.
➦ राजेश क्रिकेट खेळेल.

भविष्यकाळ काळाचे चार उपप्रकार पडतात.

अ) साधा भविष्यकाळ काळ :
वाक्यातील क्रिया येणाऱ्या काळात होणार आहे असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘साधा भविष्यकाळ काळ’ असे समजावे.

उदा. :
➥ भावी आंबा खाईल.
➦ वेदांती शाळेत जाईल.
➥ निल अभ्यास करील.
➦ विजय पोहायला जाईल.

आ) अपूर्ण भविष्यकाळ काळ/ चालू भविष्यकाळ काळ :
वाक्यातील भविष्यात होणारी क्रिया चालू असेल, पण पूर्ण झालेली नसेल असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘चालू भविष्यकाळ काळ’ असे समजावे.

उदा. :
➥ भावी आंबा खात असेल.
➦ वेदांती शाळेत जात असेल.
➥ निल अभ्यास करत असेल.
➦ विजय पोहायला जात असेल.

इ) पूर्ण भविष्यकाळ :
वाक्यातील भविष्यकाळात होणारी क्रिया पूर्ण झाली असल्याचा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘पूर्ण भविष्यकाळ’ असे समजावे.

उदा. :
➥ भावीने आंबा खाल्ला असेल.
➦ वेदांती शाळेत गेली असेल.
➥ निल अभ्यास केला असेल.
➦ विजय पोहायला गेला असेल.

ई) रीती भविष्यकाळ / चालू पूर्ण भविष्यकाळ :
एखाद्या वाक्यातील क्रिया भविष्यकाळातील असून ती क्रिया सातत्त्याने घडत राहणारी असेल आसा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ ‘चालू पूर्ण भविष्यकाळ’ असे समजावे.

उदा. :
➥ भावी रोज आंबा खात राहील.
➦ वेदांती दररोज शाळेत जात राहील.
➥ निल रोज अभ्यास करत जाईल.
➦ विजय नेहमी पोहायला जात राहील.

नामाचे प्रकार : नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत :… Read more…

66

QUIZ- छोटी प्रश्नोत्तरी : काळ व त्याचे प्रकार (Types of Tense in Marathi)

खालील छोटी प्रश्नोत्तरी सोबत आपण किती समजले त्याचे परीक्षण करूया.

➤ खालील शब्दांचे काळ व त्याचे प्रकार ओळखा :

1 / 10

१) विजय नेहमी पोहायला जात राहील.

2 / 10

२) निलने अभ्यास केला आहे.

3 / 10

३) निलने अभ्यास केला होता.

4 / 10

४) भावीने आंबा खाल्ला.

5 / 10

५) वेदांती शाळेत जाते.

6 / 10

६) वेदांती शाळेत जात असेल.

7 / 10

७) तन्मयी शाळेत जात होती.

8 / 10

८) ग्रीष्मा आंबा खात आहे.

9 / 10

९) विजय नेहमी पोहायला जात असे.

10 / 10

१०) भावी आंबा खाईल.

Your score is

The average score is 55%

0%

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार

टेन्स चे प्रकार :

Types of tense in marathi, Kal v tyache prakar, Types of Tenses,काळाचे प्रकार, Tense (काळ व काळाचे प्रकार), इंग्लिश ग्रामर इन मराठी pdf, टेन्स वाक्य, टेन्स चे प्रकार, tense chart, marathi tense sentences, types of tenses, इंग्रजी काळ, present tense in marathi, Tense (काळ व काळाचे प्रकार), English Grammar Tenses explained in marathi, Simple Past Tense in Marathi, Present/Past/Future Perfect Tense in Marathi, tense in marathi meaning, टेन्स चे प्रकार, marathi tense sentences, definition of tense in marathi, present tense in marathi, english grammar in marathi pdf, past tense in marathi, future tense in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *