transformation of sentences
मराठी जग

Transformation of Sentences in Marathi | वाक्यांचे रूपांतर

या लेखामध्ये आपण वाक्यांचे रूपांतर म्हणजे काय आणि ते कसे करतात हे पाहणार आहोत.

Marathi Vakya, Vakya Rupantar, Vakyanche Prakar Vakya Parivartan and many more about this.

वाक्यांचे रूपांतर म्हणजे काय ?

वाक्याचा अर्थ ना बदलता एका वाक्य प्रकारातून दुसऱ्या वाक्य प्रकारात बदल करणे, म्हणजे वाक्यरूपांतर किंवा वाक्य परिवर्तन होय.

वाक्यांचे रूपांतर करताना काही नियम असतात ते समजून घेऊ, तसेच त्याचे उदाहरण ही पाहून घेऊ.

1] प्रश्नार्थी वाक्यांचे विधानार्थी वाक्यात रूपांतर :

प्रश्नार्थी वाक्यांचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना, वाक्यातील प्रश्न काढून त्या वाक्यास विधान प्रमाणे बदल करावा आणि शेवटी प्रश्न चिन्हा ऐवजी पूर्ण विराम द्यावा.

प्रश्न नकारार्थी असेल तर त्याचे विधानार्थी वाक्य होकारार्थी असते. आणि जर प्रश्न होकारार्थी असेल तर त्याचे विधानार्थी वाक्य नकारार्थी असते.

उदाहरण :
➛ साने गुजींचे कार्य कोण विसरेल ?
➤साने गुजींचे कार्य कोणी विसरणार नाही.

➛ अभ्यास करण्याची गरज नाही का ?
➤ होय अभ्यास करण्याची गरज आहे.

➛ तू कोठे राहतोस ?
➤ तो येथे राहतो.

| Related : माझा आवडता ऋतू-पावसाळा – निबंध (Around 200 words):

2] उद्गारार्थी वाक्यांचे विधानार्थी वाक्यात रूपांतर :

उद्गारार्थी वाक्यांचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना, वाक्यातील उद्गारवाचक शब्दा ऐवजी विशेषण युक्त शब्द वापरले जाते आणि उद्गारार्थी चिन्हा ऐवजी पूर्ण विराम दिला जातो.

उदाहरण :
➛ किती सुंदर फुल आहे हे !
➤ हे फुल खूप सुंदर आहे.

➛ किती उंच इमारत आहे !
➤ हि इमारत खूप उंच आहे.

➛ किती छान निबंध लिहिला !
➤ हा निबंध खूप छान लिहिला.

3] आज्ञार्थी वाक्यांचे विधानार्थी वाक्यात रूपांतर :

आज्ञार्थी वाक्यांचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना, वाक्यातील आज्ञार्थी क्रियापद शब्दा ऐवजी विधान वाचक क्रियापद वापरावे.

उदाहरण :
➛ वडीलधाऱ्या माणसांचा आदर करा.
➤ वडीलधाऱ्या माणसांचा आदर करावा.

➛ मिताली अक्षर सुंदर काढ.
➤ मितालीचे अक्षर सुंदर आहे.

➛ सगळ्यांनी रांगेत उभे राहा.
➤ सगळ्यांनी रांगेत उभे राहावे.

तुम्हाला नीट समजण्यासाठी, एकच वाक्य चारही वाक्य प्रकारात रूपांतरित करून पाहू.

उदाहरण :
➣ मनीषाची चित्रकला खूप सुरेख आहे. – विधानार्थी वाक्य
➢ मनीषा चित्र सुरेख काढ. – आज्ञार्थी वाक्य.
➣ मनीषाची चित्रकला खूप सुरेख आहे, नाही ? – प्रश्नानार्थी वाक्य .
➢ किती अप्रतिम आहे मनीषाची चित्रकला ! – उद्गारार्थी वाक्य.

Related : Maza Avadta rutu Marathi Nibandh – पावसाळा

4] होकारार्थी वाक्यांचे नकारार्थी वाक्यात रूपांतर किंवा व्यत्यास :


होकारार्थी वाक्यांचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करताना, वाक्यातील होकारार्थी क्रियापद शब्दा ऐवजी नकारार्थी क्रियापद शब्द वापरावे. असे करत असताना वाक्याचा अर्थ बदलणार नाही काही दक्षता घ्यावी.

उदाहरण :
➛ भारतीय हॉकी संघ विजयी झाला आहे. – होकारार्थी (“आहे” ह्या शब्दाने होकार दर्शविला आहे.)
➤ भारतीय हॉकी संघ पराजित झाला नाही. – नकारार्थी (“नाही” ह्या शब्दाने नकार दर्शविला आहे.)

दोन्ही वाक्य जरी वेगळी असली तरी त्याचा अर्थ एकाच आहे,

➛ शिल्पा शांत मुलगी नाही – नकारार्थी
➤ शिल्पा रागीट मुलगी आहे. – होकारार्थी

➛ आता समुद्राला भरती असेल – होकारार्थी
➤ आता समुद्राला ओहोटी नसेल – नकारार्थी

अजून काही वाक्य पाहू म्हणजे आपल्याला समजण्यासाठी अजून सोपे होईल.

पुढील काही वाक्य कंसांत दिलेल्या सुचणे प्रेमाने बदल करून वाक्यांचे रूपांतर करायचे आहे.

(१) किती सुंदर देखावा आहे हा ! (विधानार्थी वाक्य करा)

उत्तर : हा देखावा खूप सुंदर आहे .

(२) ही इमारत खूपच उंच आहे. (उद्गारार्थीं वाक्य करा)

उत्तर : किती उंच इमारत आहे ही !

(३) तू खेळ खेळावेस. (आज्ञार्थी वाक्य करा)

उत्तर : तू खेळ खेळावा.

| Related : नाम म्हणजे काय ? : एखाद्या व्यक्तिला, वस्तुला, पक्षांना, प्राण्यांना, एखाद्या … Read more…

(४) नेहमी दुसऱ्याचे चांगले गुण पाहावेत. (नकारार्थी वाक्य करा)

उत्तर : दुसऱ्याचे वाईट गुण पाहू नयेत.

(५) दीनदुबळ्यांना मदत करा. (विधानार्थी वाक्य करा)

उत्तर : दीनदुबळ्यांना मदत करावी.

(६) राजू नेहमी योगासने करतो. (प्रश्नार्थी वाक्य करा)

उत्तर : राजू नेहमी योगासने करतो का ?

(७) भेदाभेद मिटवून टाका. (विधानार्थी वाक्य करा)

उत्तर : भेदाभेद मिटवून टाकावे.

(८) त्याने निबंध छान लिहिला. (उद्गारार्थीं वाक्य करा)

उत्तर : किती सुरेख निबंध लिहिला त्याने !

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार

To know the transformation of sentences worksheet with answers, learn rules for transformation of sentences, more exercises rules, rules for sentences simple, compound and complex. To transformation of sentences with answers and
sentences affirmative to negative.

4 Replies to “Transformation of Sentences in Marathi | वाक्यांचे रूपांतर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *