preposition meaning in marathi
मराठी जग

Preposition meaning in Marathi | शब्दयोगी अव्यय

Preposition meaning in Marathi | शब्दयोगी अव्यय (Shabdayogi Avay/ Shabdyogi Avyay )

Preposition meaning in Marathi : जो शब्द नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येऊन त्याचा संबंध वाक्यातील इतर शब्दांशी दर्शविला जातो त्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.

उदा. :
➥ आमच्या घरासमोर एक फुलबाग आहे.
➦ बाकावर भावी बसली आहे.
➥ उन्हामुळे लोकं झाडाखाली विश्रांती घेत आहेत.

➤ वरील वाक्यात “समोर”, “वर” आणि “मुळे” ही शब्दयोगी अव्यय आहेत.

➽ शब्दयोगी अव्ययांची वैशिष्ट्ये :
– शब्दयोगी अव्यये मुख्यत: नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात.
पण कधी कधी शब्दयोगी अव्यये ही क्रियापदे व क्रियाविशेषणे यांना सुद्धा जोडून येतात.

Table of Contents

शब्दयोगी अव्ययाचे प्रकार :

शब्दयोगी अव्ययाचे खालील प्रकार पडतात :

१) कालवाचक शब्दयोगी अव्यय :

कालवाचक क्रियाविशेषण अव्ययांचे दोन उपप्रकार पडतात :

अ) कालदर्शक शब्दयोगी अव्यय :

उदा. : पर्यंत, पावेतो, गतिवाचक, आतून, खालून, पुढे, आधी, तूर्त, नंतर, मधून, पूर्वी, पासून इ.
➥ आज दुपारपर्यंत पाऊस थांबेल.
➥ आजपासून तो कधीच गावी जाणार नाही.

➤ वरील वाक्यात “पर्यंत” आणि “पासून” ही शब्दयोगी अव्यय आहेत.

ब) गतिवाचक शब्दयोगी अव्यय :

उदा. : आतून, मधून, पासून, पर्यंत इ.
➥ परवापासून शाळा उघडणार आहे.
➥ वर्षातून मी दोनदा फिरायला जातो.

➤ वरील वाक्यात “पासून” आणि “आतून” ही शब्दयोगी अव्यय आहेत.

२) स्थलवाचक शब्दयोगी अव्यय :

उदा. : मागे, पुढे, मध्ये, आत, बाहेर, अलीकडे, पलीकडे, समोर, दूर, पाशी, नजीक, जवळ, ठायी इ.
➥ मनोज माझ्याजवळ बसला होता.
➦ मुले वर्गात बसली होती.
➥ माझी कार घरासमोर उभी आहे.

➤ वरील वाक्यात “जवळ”, “आत” आणि “समोर” ही शब्दयोगी अव्यय आहेत.

Short notes on birds | पक्षी हा संतुलित पर्यावरणाचं ….

.

३) करणवाचक/ साधनदर्शक शब्दयोगी अव्यय :

उदा. : कडून, व्दारा, करवी, हाती, मुळे, योगे, करून इ.

➥ पाऊसामुळे पाणीच पाणी झाले.
➦ सभासदांद्वारा आपला काम घ्यावा.
➥ सूत्रांकडून हि बातमी मिळाली.

➤ वरील वाक्यात “मुळे”, “व्दारा” आणि “कडून” ही शब्दयोगी अव्यय आहेत.

४) हेतुवाचक शब्दयोगी अव्यय :

उदा. : करिता, अथा, प्रीत्यर्थ, निमित्त, स्तव, साठी, कारणे इ.
➥ हरीश पाण्यासाठी गावभर फिरला.
➥ मी अभ्यासाकरिता ग्रंथालयात जातो.

➤ वरील वाक्यात “साठी” आणि “करिता” ही शब्दयोगी अव्यय आहेत.

Marathi Numbers in words | Marathi Ank | मराठी अंक….

.

५) व्यक्तिरेखावाचक शब्दयोगी अव्यय :

उदा. : विना, वाचून, शिवाय, खेरीज, परता, व्यक्तिरिक्त इ.

➥ मेहनतीशिवाय यश प्राप्त होणे शक्य नाही.
➥ अभ्यासाविना परीक्षेत पस होणे अशक्य.

➤ वरील वाक्यात “शिवाय” आणि “विना” ही शब्दयोगी अव्यय आहेत.

.

६) तुलनावाचक शब्दयोगी अव्यय :

उदा. : तम, मध्ये, पेक्षा, तर, परीस इ.
➥ भावीपेक्षा स्वरा उंच आहे.
➥ वासरामध्ये लंगड़ी गाय शहाणी.

➤ वरील वाक्यात “पेक्षा” आणि “मध्ये” ही शब्दयोगी अव्यय आहेत.

.

७) योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय :

उदा. : जोगी, योग्य, सम, प्रमाणे, सारख्या, समान, बरहुकूम इ.
➥ हे पाणी पिण्यायोग्य आहे.
➥ तो पेन माझ्या मनाजोगी आहे.

➤ वरील वाक्यात “योग्य” आणि “जोगी” ही शब्दयोगी अव्यय आहेत.

.

८) कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय :

उदा. : पण, च, फक्त, मात्र, केवळ, ना इ.
➥ त्विषाच हे गणित सोडवू शकते.
➥ भावीमात्र हे कार्य करू शकते.

➤ वरील वाक्यात “च” आणि “मात्र” ही शब्दयोगी अव्यय आहेत.

.

९) संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय :

उदा. : ही, केवळ, पण, बारीक, सुद्धा, देखील, फक्त इ.
➥ वेदांतीदेखील खो-खो खेळते.
➥ भावीसुद्धा गणित सोडविते.

➤ वरील वाक्यात “देखील” आणि “सुद्धा” ही शब्दयोगी अव्यय आहेत.

.

१०) संबंधवाचक शब्दयोगी अव्यय :

उदा. : विशी, विषयी, संबधी इ.
➥ खेळाविषयी मला आवड आहे.
➥ परीक्षेसंबंधी कोणाला काही माहिती नाही.

➤ वरील वाक्यात “विषयी” आणि “संबधी” ही शब्दयोगी अव्यय आहेत.

.

११) साहचार्यवाचक शब्दयोगी अव्यय :

उदा. : सह, संगे, निशी, समवेत, सकट, बरोबर, सहित, सोबत इ.
➥ लहानमुलांसंगे मन रमते.
➥ मित्रांसोबत मी खेळायला गेलो होतो.

➤ वरील वाक्यात “संगे” आणि “सोबत” ही शब्दयोगी अव्यय आहेत.

.

१२) भागवाचक शब्दयोगी अव्यय :

उदा. : पैकी, पोटी, आतून इ.
➥ दोनपैकी एकच पर्याय निवडणे योग्य.
➥ पृथ्वीच्याआतून खूप खनिज प्राप्त होतात.

➤ वरील वाक्यात “पैकी” आणि “आतून” ही शब्दयोगी अव्यय आहेत.

.

१३) विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय :

उदा. : ऐवजी, जागी, बद्दल, बदली इ.
➥ आशिषऐवजी मनीषची निवड उगाच झाली.
➥ अमितबद्दल आम्हा सर्वांना खात्री आहे.

➤ वरील वाक्यात “ऐवजी” आणि “बद्दल” ही शब्दयोगी अव्यय आहेत.

.

१४) दिकवाचक शब्दयोगी अव्यय :

उदा. : प्रति, कडे, लागी, प्रत इ.
➥ देशाप्रती माझे प्रेम आहे.
➥ भावीकडे माझा फोन आहे.

➤ वरील वाक्यात “प्रति” आणि “कडे” ही शब्दयोगी अव्यय आहेत.

.

१५) विरोधावाचक शब्दयोगी अव्यय :

उदा. : उलटे, विरुद्ध, उलट इ.
➥ राकेश उलटे बोलत होता.
➥ रमेश विरुद्ध सुरेश अशी स्पर्धा सुरु आहे.

➤ वरील वाक्यात “उलटे” आणि “विरुद्ध” ही शब्दयोगी अव्यय आहेत.

.

१६) परिणामवाचक शब्दयोगी अव्यय :

उदा. : भर
➥ संतोष दिवसभर काम करत होता.
➥ वेदांती तासभर खेळात होती.

➤ वरील वाक्यात “भर” आणि “भर” ही शब्दयोगी अव्यय आहेत.

7

QUIZ- छोटी प्रश्नोत्तरी : शब्दयोगी अव्यय (Types of Preposition in Marathi)

खालील छोटी प्रश्नोत्तरी सोबत आपण किती समजले त्याचे परीक्षण करूया.

अ) खालील वाक्यातून योग्य तो शब्दयोगी अव्यय व शब्दयोगी अव्ययचे प्रकार ओळखा :

 

1 / 8

१) आजपर्यंत तो कधीच गावी गेला नाही.

2 / 8

२) माझी गाडी घरासमोर उभी आहे.

3 / 8

३) मी अभ्यासाकरिता ग्रंथालयात जातो.

4 / 8

४. तो पेन माझ्या मनाजोगी आहे.

5 / 8

५) भावीफक्त हे कार्य करू शकते.

6 / 8

६) खेळाविषयी मला आवड आहे.

7 / 8

७) अमितबद्दल विनायक समारंभाला गेला.

8 / 8

८) वेदांती तासभर खेळात होती.

Your score is

The average score is 77%

0%

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार

Preposition meaning in Marathi :
शब्दयोगी अव्यय, ओळख शब्दयोगी अव्यय म्हणजे, शब्दयोगी अव्यय व्याख्या मराठी, शब्दयोगी अव्यय याचे उदाहरण, शब्दयोगी अव्यय in English, खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा, शब्दयोगी अव्यय एक्झाम पल्स, केवलप्रयोगी अव्यय उदाहरण मराठी. शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार, Shabdayogi Avyay, Prepositions in Marathi, Learn Prepositions in Marathi, Marathi Prepositions, Preposition Marathi, Prepositions with verbs in Marathi,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *