Verb in marathi (Verb meaning in Marathi : Kriyapad mhanaje kay.
क्रियापद : ज्या शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाऊन त्या वाक्याचा अर्थ पूर्ण केला जातो त्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
क्रियापद हा विकारी शब्द प्रकार आहे.
उदा. :
➥ निल अभ्यास करतो.
➥ गाय चारा खाते.
➦ स्वरा पुस्तक वाचते.
➥ आमच्या गावाचा संघ जिंकला.
➤ वरील वाक्यात “करतो”, “खाते” “वाचते” आणि “जिंकला” ही क्रियापदे आहेत.
Table of Contents
क्रियापदाचे प्रकार : Verb in marathi & its Types
➽ Verb in marathi and its Types : क्रियापदाचे प्रकार : क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार आहेत.
१. सकर्मक क्रियापद
२. अकर्मक क्रियापद
➽ क्रियापदाचे इतर प्रकार :
३. संयुक्त क्रियापद
४. सहाय्यक क्रियापद
५. व्दिकर्मक क्रियापद
६. उभयविध क्रियापद
७. अपूर्णविधान क्रियापद
८. सिद्ध क्रियापद
९. साधित क्रियापद
१०. प्रयोजक क्रियापद
११. भवकर्तृक क्रियापद
१२. शक्य क्रियापद
१३. गौण क्रियापद
१४. गुप्त क्रियापद
➤ चला प्रत्येक प्रकार तपशीलवार पाहू.
१] सकर्मक क्रियापद :
ज्या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज लागते, त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात.
उदा. :
➥ राम क्रिकेट खेळतो.
➦ विजय फळ खातो.
➥ वेदांती कविता करते.
➦ विशाल मासे पकडतो.
➤ वरील वाक्यात “खेळतो”, “खातो” “करते” आणि “पकडतो” ही क्रियापदे आहेत.
२] अकर्मक क्रियापद :
ज्या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज लागत नाही, त्या क्रियापदाला असकर्मक क्रियापद असे म्हणतात.
उदा. :
➥ भावी लिहिते.
➦ त्विषा बसली.
➥ स्वरा खेळते.
➦ तो गेला.
➤ वरील वाक्यात “लिहिते”, “बसली” “खेळते” आणि “गेला” ही क्रियापदे आहेत.
➽ क्रियापदाचे इतर प्रकार :
३] संयुक्त क्रियापद :
जो क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी धातुसाधीतास सहकार्य करतो, असे धातुसाधीत व सहाय्यक क्रियापद मिळून बनलेल्या क्रियापदास संयुक्त क्रियापद असे म्हणतात.
संयुक्त क्रियापद शब्दापासून कोणत्याही एकाच क्रियेचा बोध होणे आवश्यक आहे.
(धातुसाधीत + सहाय्यक क्रियापद = संयुक्त क्रियापद)
उदा. :
➥ तन्मयी हौदात पोहू लागली. (पोहू – धातुसाधीत, लागली – सहाय्यक क्रियापद)
➦ अमित खेळू लागला. (खेळू – धातुसाधीत, लागला – सहाय्यक क्रियापद)
➥ हर्ष अभ्यास करू लागला. (करू – धातुसाधीत, लागला – सहाय्यक क्रियापद)
धातु : क्रियापद शब्दातील प्रत्येय रहित मूळ शब्दाला ‘धातु’ असे म्हणतात.
उदा. : जा, कर, उठ, बस, खा, पी, इत्यादी धातु आहेत.
आता धातुसाधीते किंवा कृदंते म्हणजे काय ? :
➦ धातुला म्हणजे मूळ शब्दाला विविध प्रत्यय लागूनही क्रिया पूर्ण होत नाही अश्या शब्दांना ‘धातुसाधीते’ किंवा ‘कृंदते’ असे म्हणतात.
➽ धातुसाधीते नाम, विशेषण किंवा क्रियाविशेषणाचे काम करतात.
➦ धातुसाधीते वाक्याच्या सुरूवातीला किंवा वाक्याच्या मध्ये येतात.
➽ धातुसाधीते मिळूनच संयुक्त क्रियापद बनते.
अधिक जाणून घ्या | सर्वनामाचे प्रकार : सर्वनामाचे मुख्य सहा प्रकार आहेत. १] पुरुषवाचक सर्वनाम २] दर्शक सर्वनाम ……
.
४] सहाय्यक क्रियापद :
ज्या वाक्यात धातुसाधीत व क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध करतात अश्या धातुसाधीताला मदत करणार्या क्रियापदाला सहाय्यक क्रियापद असे म्हणतात.
उदा. :
➥ भावी एवढा लाडू खाऊन टाक.
➥ मैदानात मुले खेळू लागली.
➤ वरील वाक्यात “टाक”, “लागली” ही क्रियापदे आहेत.
५] व्दिकर्मक क्रियापद :
ज्या क्रियापदास दोन कर्म लागतात त्यास व्दिकर्मक क्रियापद असे म्हणतात.
➤ वाक्यातील कर्त्यांकडून होणारी क्रिया ही एकाच वेळी दोन घटकांवर घडते.
उदा. :
➥ बाबांनी मुलांना गोष्ट सांगितली –
(बाबा – कर्ता, मुलांना – वाक्यातील अप्रत्यक्ष कर्म, गोष्ट- वाक्यातील प्रत्यक्ष कर्म, सांगितली – व्दिकर्मक क्रियापद)
➥ राहुलने भिकाऱ्याला पैसे दिले.
➥ गुरुजी विधार्थ्यांना गणित शिकवितात.
➤ वरील वाक्यात “सांगितली”, “दिले” आणि “शिकवितात” ही क्रियापदे आहेत.
➽ प्रत्यक्ष कर्म हे नेहमी वस्तूवाचक असते.
➽ अप्रत्यक्ष कर्म हे नेहमी व्यक्तिवाचक असते.
६] उभयविध क्रियापदे :
जे एकच क्रियापद हे दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक अश्या दोन्ही प्रकारे उपयोगात येते त्यास उभयविध क्रियापद असे म्हणतात.
उदा. :
➦ राजेशने मंदिराचे दार उघडले. (सकर्मक क्रियापद)
➥ राजेशच्या घराचे दार उघडले. (अकर्मक क्रियापद)
➦ त्याने माझे पुस्तक हरवले. (सकर्मक क्रियापद)
➥ माझे पुस्तक हरवले. (अकर्मक क्रियापद)
➤ वरील वाक्यात “उघडले” आणि “हरवले” ही क्रियापदे आहेत.
७] अपूर्णविधान क्रियापद :
वाक्यात क्रियापद असूनही वाक्याचा अर्थ पूर्ण होत नसतो अशा क्रियापदास अपूर्ण विधान क्रियापद असे म्हणतात.
➤ या वाक्यात ज्या शब्दामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्या शब्दास ‘विधान पूरक’ किंवा ‘पूरक’ असे म्हणतात.
उदा. :
➥ आशिष झाला.
➦ आशिष कप्तान झाला. (कप्तान – विधानपूरक)
➥ प्रियांका झाली.
➦ प्रियांका शिक्षिका झाली. (शिक्षिका – विधानपूरक)
➤ वरील वाक्यात “झाला” आणि “झाली” ही क्रियापदे आहेत..
८] सिद्ध क्रियापद :
मूळ धातूंना प्रत्यय लागून तयार होणार्या क्रियापदाला सिद्ध क्रियापद असे म्हणतात.
➤ जा, ये, कर, ऊठ, बस हे – सिद्ध धातू आहेत.
उदा. :
➥ प्रितेश रोज शाळेत जातो. – जा + तो (प्रत्येय) = जातो
➦ सारा सकाळी लवकर उठते. – उठ + ते (प्रत्येय) = उठते
➥ आम्ही खूप व्यायाम करतो. – कर + तो (प्रत्येय) = करतो
➦ अनिकेत कार चालवतो. – चालव + तो (प्रत्येय) = चालवतो
➤ वरील वाक्यात “जातो”, “उठते”, “करतो” आणि “चालवतो” ही क्रियापदे आहेत.
Short notes on birds | पक्षी हा संतुलित पर्यावरणाचं ….
९] साधित क्रियापद :
वेगवेगळ्या जातींच्या शब्दांपासून तयार होणार्या धातूंना ‘साधीत धातू’ असे म्हणतात. अशा साधीत धातुंना प्रत्यय लागून तयार होणार्या क्रियापदांना साधीत क्रियापदे असे म्हणतात.
➤ पाणी-पाणाव-पाणावले/ तात/ ते.
➤ हात-हाताळ-हाताळतात/ ते/ णे.
उदा. :
➥ निलचे डोळे पाणावले.
— पाणावणे (धातू) + प्रत्येय = पाणावले (क्रियापद).
➥ तो संगणक हाताळतो.
— हाताळणे (धातू) + प्रत्येय = हाताळतो (क्रियापद).
➥ आम्ही हि पुस्तके पुण्याहून मागवली.
— मागवणे (धातू) + प्रत्येय = मागवली (क्रियापद).
१०] प्रयोजक क्रियापद :
वाक्यातील कर्ता ती क्रिया स्वत: नकरता दुसर्या कडून करवून घेतो असा अर्थ व्यक्त होतो त्या क्रियापदास प्रयोजक क्रियापद असे म्हणतात.
उदा. :
➥ आई मुलांना खेळविते.
➦ विकास मुलांना रडवितो.
➥ मयूर मित्रांना हसवितो.
➤ वरील वाक्यात “खेळविते”, “रडवितो”, आणि “हसवितो” ही क्रियापदे आहेत.
११] भवकर्तृक क्रियापद :
ज्या क्रियापदाचा मूळ अर्थ किंवा भाव हाच त्या वाक्यचा कर्ता मानावा लागतो. अशा क्रियापदांना भवकर्तृक क्रियापद असे म्हणतात.
उदा. :
➥ घरी पोहचण्यापूर्वीच मावळले.
➦ आज खूप लवकर उजाडले.
➥ प्रवासामुळे आज जारा मळमळते.
➤ वरील वाक्यात “मावळले”, “उजाडले”, आणि “मळमळते” ही क्रियापदे आहेत.
१२] शक्य क्रियापद :
जो क्रियापद कर्त्याच्या ठिकाणी क्रिया करण्याचे सामर्थ्य व्यक्त करतो किंवा कर्त्याकडून ती क्रिया करण्याची शक्यता व्यक्त करतो त्या क्रियापदाला शक्य क्रियापद असे म्हणतात.
उदा. :
➥ हर्षालीला आता काम करवते.
➦ विनयला दररोज सात किमी चालविते.
➥ आजारी माणसाला आता थोडे बसवते.
➤ वरील वाक्यात “करवते”, “चालविते”, आणि “बसवते” ही क्रियापदे आहेत.
१३] गौण क्रियापद / अनियमित क्रियापद :
ज्या क्रियापदांना काळांचे व अर्थाचे प्रत्यय न लागता ते वेगळ्याच प्रकारे उच्चारित होतात त्यांना, गौण / अनियमित क्रियापद असे म्हणतात.
उदा. :
➥ परमेश्र्वर सर्वत्र आहे.
➦ त्या रस्त्याने जाऊ नको.
➥ मुलांनी सतत खेळू नये.
➤ वरील वाक्यात “आहे”, “नको”, आणि “नये” ही क्रियापदे आहेत.
१४] गुप्त क्रियापद :
जे क्रियापद वाक्यात नसतात पण त्याचा वाक्यातील अर्थ पूर्ण होण्यासाठी असल्याचा भहास होतो त्या क्रियापदास गुप्त क्रियापद असे म्हणतात.
उदा. :
➥ अति तेथे माती. – पण येथे असते/ होते हे क्रियापद गुप्त पणे आहे.
➥ अति शहाणा त्याचा बैल रिकामा – पण येथे असतो हे क्रियापद गुप्त पणे आहे.
➤ गुप्त क्रियापद हे मुख्यतः म्हणीन मधेच येतात.
इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार