Marathi Swar chinhe | स्वरांची चिन्हे : मराठीतील सर्व स्वर चिन्हे :
मराठी भाषेत व्यंजनाला स्वर जोडला जातो, या स्वरांना ठराविक चिन्हे योजली आहेत. या चिन्हांनाच स्वरांची चिन्हे असे म्हणतात.
सर्वात अगोदर आपण व्यंजन व अक्षर यातील फरक समजून घेऊ. मराठीत ‘क्’ हे अक्षर नसून ते व्यंजन आहे. जेंव्हा व्यंजनाला स्वर जोडला जातो, जसे क् + अ = क; भ् + आ = भा.
म्हणजेच व्यंजनास स्वर जोडला कि ते अक्षर बनते.
अक्षरांचा उच्चार हा नेहमी पूर्ण असतो.
स्वरांचा उच्चार ही नेहमी पूर्ण असतो म्हणून सर्व स्वर ही अक्षरे आहेत.
बदलत्या काळानुसार भाषेतही सुधारणा कराव्या लागतात, त्या अनुषंगाने मराठीत ‘ॲ’ व ‘ऑ’ या स्वरांना मान्यता मिळाली आहे.
आता पाहूया स्वरांची चिन्हे आणि त्यांचे कार्य :
१) काना :
व्यंजनास ‘आ’ चा स्वर जोडण्यासाठी ज्या चिन्हाचा उपयोग होतो त्यास काना असे म्हणतात.
लिपीमध्ये याचे चिन्ह ‘ा’ असे आहे.
उदा : भ् + आ = भा.
२) वेलांटी :
व्यंजनास ‘इ’ व ‘ई’ हे स्वर जोडण्यासाठी ज्या चिन्हांचा उपयोग होतो त्यास वेलांटी असे म्हणतात.
लिपीमध्ये हे चिन्ह ऱ्हस्व ‘इ’ साठी ‘ि’ आणि दीर्घ ‘ई’ साठी ‘ी’ हि चिन्हे आहेत.
उदा : भ् + इ = भि तसेच व् + ई = वी
ऱ्हस्व अक्षरांचा उच्चार करण्यासाठी जितका वेळ लागतो त्या पेक्षा अधिक वेळ दीर्घ अक्षरांचा उच्चार करण्यासाठी लागतो.
हाच नियम ऱ्हस्व व दीर्घ उ-ऊ साठी लागू होतो.
३) उकार :
व्यंजनास ‘उ’ व ‘ऊ’ हे स्वर जोडण्यासाठी ज्या चिन्हांचा उपयोग होतो त्यास उकार असे म्हणतात.
लिपीमध्ये हे चिन्ह ऱ्हस्व ‘उ’ साठी ‘ु’ आणि दीर्घ ‘ऊ’ साठी ‘ू’ हि चिन्हे आहेत.
उदा : भ् + उ = भु तसेच व् + ऊ = वू
ऱ्हस्व अक्षरांचा उच्चार करण्यासाठी जितका वेळ लागतो त्या पेक्षा अधिक वेळ दीर्घ अक्षरांचा उच्चार करण्यासाठी लागतो.
४) ऋकार :
व्यंजनास ‘ऋ’ चा स्वर जोडण्यासाठी ज्या चिन्हाचा उपयोग होतो त्यास ऋकार असे म्हणतात.
लिपीमध्ये याचे चिन्ह ‘ ृ’ असे आहे.
उदा : भ् + ऋ = भृ .
तसेच लृ हा स्वर व्यंजनास जोडला कि “क् + लृ = क्लृ” यापऊन क्लृप्ती असे शब्द आहे.
५) मात्रा :
व्यंजनास ‘ए, ऐ, ओ, औ’ हे स्वर जोडण्यासाठी ज्या चिन्हांचा उपयोग होतो त्यास मात्रा असे म्हणतात.
लिपीमध्ये याचे ए साठी ‘े’, ऐ साठी ‘ ै’, ओ साठी ‘ ो’ आणि औ साठी ‘ ौ’ अशी चिन्हे आहेत.
उदा : भ् + ए = भे, भ् + ऐ = भै, भ् + ओ = भो, भ् + औ = भौ.
६) अर्धचंद्र :
व्यंजनास ‘ॲ’ व ‘ऑ’ चा स्वर जोडण्यासाठी ज्या चिन्हाचा उपयोग होतो त्यास अर्धचंद्र असे म्हणतात.
लिपीमध्ये याचे चिन्ह ‘ॅ’ व ‘ॉ’ असे आहे.
उदा : भ् + ॲ = भॅ , भ् + ऑ = भॉ,
Marathi Numbers in words | Marathi Ank | मराठी अंक
खालील दोन चिन्हे हि स्वर चिन्हे नाहीत. ती लिपीतील चिन्हे आहेत जसे :
७) बिंदू :
व्यंजनास अनुनासिक किंवा अनुस्वार चे स्वर जोडण्यासाठी ज्या चिन्हाचा उपयोग होतो त्यास बिंदू असे म्हणतात.
लिपीमध्ये याचे चिन्ह ‘ं’ असे आहे.
उदा : भ् + अं = भं.
८) विसर्ग :
अक्षराच्या पुढे देण्यात येणाऱ्या एकाखाली एक असलेल्या दोन बिंदूंनच्या चिन्हाला विसर्ग असे म्हणतात.
लिपीमध्ये याचे चिन्ह ‘ ः ‘ असे आहे.
उदा : भ् + : = भः .
हि सर्व चिन्हे व्यंजनाला क्रमाने जोडली कि बाराखडी तयार होते.
उदा : क, का, कि, की, कु, कू, के, कॅ, कै, को, कॉ, कौ.
अ ते औ अश्या बारा स्वरांना बाराखडी असे म्हणतात, हिलाच बाराक्षरी असेही म्हणतात.
लक्षात ठेवा पूर्वीच्या अं, अः, ऐवजी ‘ॲ’ व ‘ऑ’ या स्वरांचा समावेश झालेला आहे.
Marathi Swar chinhe :
Marathi – आ चे स्वर चिन्ह, मराठी स्वर चिन्हे,
इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार