Plastic nibandh marathi
निबंध/ Essay/Nibandh

Plastic Nibandh Marathi | प्लास्टिक प्रदूषणाचा भस्मासुर

Plastic Nibandh Marathi | प्लास्टिक प्रदूषणाचा भस्मासुर: मराठी निबंध, Plastic Pradushanacha Bhasmasur.

नमस्कार मुलांनो! आज आपण या लेखामध्ये “प्लास्टिक प्रदूषणाचा भस्मासुर” हा निबंध पाहणार आहोत. निबंध म्हणजे विषय समजून, आपले विचार क्रमबद्ध पद्धतीने मांडणे. तुमच्या माहितीसाठी मुद्दे दिलेले असतात. त्यांच्या आधारे निबंध कसा लिहायचा, त्यात काय अपेक्षित आहे आणि आपण निबंध लिहिताना कोणते मुद्दे लक्षात घ्यावयाचे आहेत हे आम्ही नीट समजावून सांगितले आहे (येथे क्लीक करा). चला तर पाहूया आजचा निबंध (Plastic Marathi Nibandh) प्लास्टिक प्रदूषणाचा भस्मासुर.

मुद्दे: माणसाने लावलेले शोध — प्लास्टिक वस्तू व वापर — प्रदूषण — होणारे आजार —- गाईगुरांना हानीकारक — नैसर्गिक आपत्ती — सणासुदीसाठी उपयोग — नैसर्गिक वस्तूंचा वापर आवश्यक — प्रदूषण मुक्त देश.

|Related: First Day Of Rain in Marathi Essay | पावसाळ्यातील पहिला दिवस निबंध

प्लास्टिक प्रदूषणाचा भस्मासुर – मराठी निबंध (२००+ शब्दात)

माणसाने बुद्धी आणि विज्ञाच्या जोरावर स्वतःची खूप प्रगती केली आहे. हे करत असताना अनेक नवनवीन शोध लावले त्यातील एक शोध म्हणजे प्लास्टिकचा. अनेक गोष्टी साठी प्लास्टिक उपयुक्त असल्याने लोकांनी त्यांचे मनापासून स्वागत केले. जसे प्लास्टिकची खेळणी, खुर्च्या, टेबल, कपाट, औषधाच्या बाटल्या, विजेच्या वस्तूंचे आवरण अशा अनेक वस्तू तयार झाल्या. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण प्लास्टिकचा वापर करत असतो.

पण याची दुसरी बाजू कोणाच्याच लक्षात आली नाही. सहज उपलब्द होत असल्यामुळे प्लास्टिकच्या अतिवापर होऊ लागला. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे घनकचरा होऊ लागला. सामान्य उपायाने प्लास्टिकच्या कचरा नष्ट होत नाही. त्यामुळे पर्यावरणाला प्लास्टिकचे प्रदूषण वाढले. दररोज हजारो टन प्लास्टिक कचरा जमा होतोय. प्लास्टिक जाळला तरी नष्ट होत नाही, त्याने प्रदूषण वाढते. अस्थमा, दमा, असे आजार होण्याचा धोका संभवतो. प्लास्टिकच्या पिशव्या गाईगुरे खातात. यामुळे अनेक प्राणी मृत्युमुखी पडतात, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

वेगवेगळ्या सणांमध्ये, उत्सवात आपण डेकोरेशन करतो. यासाठी वापरण्यात येणाऱ्या थर्माकोल हासुद्धा प्लास्टिक सारखा घातक पदार्थ आहे. आपण याचाही वापर आपण टाळला पाहिजे. प्लास्टिकचा भस्मासूर नष्ट करायचा असेल तर प्लास्टिकचा उपयोग करणे टाळायला हवे. याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. प्लास्टिकच्या पिशव्या ऐवजी, कापडाचा, कागदाच्या पिशव्या वापरा. काचेची किंवा धातूची ताट वाटी ग्लास वापरावेत. फुले, कागद सजावटीसाठी वापरल्या पाहिजेत. सरकारने प्लास्टिक वर बंदी आणण्यापेक्षा, प्लास्टिक, थर्माकोल वापरताना स्वतःच बंधने घाला. प्लास्टिकचा उपयोग पूर्णपणे टाळला पाहिजे म्हणजे आपला देश प्रदूषणमुक्त होईल. चला तर आपण प्रतिज्ञा करूया प्लास्टिक वापर आजपासून बंद करू.

। प्लास्टिकचा वापर बंद करू ।
। जग सारे प्रदूषण मुक्त करू ।

प्लास्टिक प्रदूषणाचा भस्मासुर – मराठी निबंध (३००+ शब्दात)

माणसाने बुद्धी आणि विज्ञाच्या जोरावर स्वतःची खूप प्रगती केली आहे. हे करत असताना अनेक नवनवीन शोध लावले त्यातील एक शोध म्हणजे प्लास्टिकचा. प्लास्टिकचा माणसाला अनेक प्रकारे फायदा झाला. अनेक गोष्टी साठी प्लास्टिक उपयुक्त असल्याने लोकांनी त्यांचे मनापासून स्वागत केले. जसे प्लास्टिकची खेळणी, खुर्च्या, टेबल, कपाट, औषधाच्या बाटल्या, मुलांचे खाऊचे डबे, पाण्याच्या बाटल्या, विजेचे बटन, विजेच्या वस्तूंचे आवरण, एवढेच काय जेवणासाठी प्लास्टिकची भांडी अशा अनेक वस्तू तयार झाल्या. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण प्लास्टिकचा वापर करत असतो.

पण याची दुसरी बाजू कोणाच्याच लक्षात आली नाही. सहज उपलब्द होत असल्यामुळे प्लास्टिकच्या अतिवापर होऊ लागला. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे घनकचरा होऊ लागला. सामान्य उपायाने प्लास्टिकच्या कचरा नष्ट होत नाही. त्यामुळे पर्यावरणाला प्लास्टिकचे प्रदूषण वाढले. दररोज हजारो टन प्लास्टिक कचरा जमा होतोय. आता संपूर्ण जगापुढे हा कचरा नष्ट कसा करायचा हाच, सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्लास्टिक जाळला तरी नष्ट होत नाही, त्याचे अवशेष राहतातच. जाळल्यावर निर्माण होणारा वायू माणसाला हानिकारक आहे, त्याने प्रदूषण वाढते. अस्थमा, डोळ्यांचे विविध विकार, खोखला, दमा, असे अनेक आजार होण्याचा धोका संभवतो. आपण घरातील कचरा प्लास्टिकच्या पिशव्यातून बाहेर टाकतो. गाईगुरे हाच कचरा खातात, त्यामुळे त्यांच्या पोटात काचऱ्या सोबत प्लास्टिकही जातं. यामुळे अनेक प्राणी मृत्युमुखी पडतात, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. प्रदूषणाचा अतिरेक झाल्यामुळे, हवामानावर अनिष्ट परिणाम होतो. पर्यावरणाचा समतोल बिघडतो, मग अवेळी पाऊस पडणे, भूकंप होणे, महापूर, प्रलय येणे, प्रचंड तापमान वाढणे असे प्रकार होऊ लागतात. यामुळे खूप मुठ्या प्रमाणावर वित्तहानी आणि जीवितहानी होते.

.

वेगवेगळ्या सणांमध्ये, उत्सवात आपण डेकोरेशन करतो. यासाठी वापरण्यात येणाऱ्या थर्माकोल हासुद्धा प्लास्टिक सारखा घातक पदार्थ आहे. आपण याचाही वापर आपण टाळला पाहिजे. कारण यामुळे आपण आपलेच जीवन धोक्यात आणत आहोत. प्लास्टिकचा भस्मासूर नष्ट करायचा असेल तर प्लास्टिकचा उपयोग करणे टाळायला हवे. जितकं शक्य होईल तितकं नैसर्गिक वस्तू वापरून, पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. प्लास्टिकच्या पिशव्या ऐवजी, कापडाचा, कागदाच्या पिशव्या वापरा. प्लास्टिकच्या ताटां ऐवजी, काचेची किंवा धातूची ताट वाटी ग्लास वापरावेत. मातीच्या नैसर्गिक मूर्ती बनवाव्यात. फुले, कागद सजावटीसाठी वापरल्या पाहिजेत. सरकारने प्लास्टिक वर बंदी आणण्यापेक्षा, प्लास्टिक, थर्माकोल वापरताना स्वतःच बंधने घाला. प्लास्टिकचा उपयोग पूर्णपणे टाळला पाहिजे म्हणजे आपला देश प्रदूषणमुक्त होईल. चला तर आपण प्रतिज्ञा करूया प्लास्टिक वापर आजपासून बंद करू.

। प्लास्टिकचा वापर बंद करू ।
। जग सारे प्रदूषण मुक्त करू ।

| Related: Mi Pakshi Zalo Tar Nibandh ! …| मी पक्षी झालो तर ! …

Other Essays:

Essay on My School in English
➦ मेरा विद्यालय पर निबंध
Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
➦ Essay on tree in Marathi
माझी शाळा निबंध मराठी
➦ My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
जर मी ढग असतो तर :
➦ If I Became The Prime Minister -Marathi Essay

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech

I hope you get the answer to all the questions. Plastic Nibandh Marathi, plastic Mukt Bharat Marathi Nibandh, plastic Bandi Nibandh Marathi, plastic Mukt Bharat Nibandh Marathi Madhe, plastic Pradushan Marathi Nibandh, Chala Baruya plastic Mukt Mumbai Nibandh in Marathi,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *