Nisarg Maza Guru
निबंध/ Essay/Nibandh

Nisarg Maza Guru Marathi Nibandh | निसर्ग माझा गुरु

Nisarg Maza Guru Marathi Nibandh | निसर्ग माझा गुरु : निसर्ग माझा सोबती, निसर्ग माझा गुरू – मराठी निबंध, Nisarg Maza Sobati.

नमस्कार मुलांनो! आज आपण या लेखामध्ये “निसर्ग माझा गुरु” हा निबंध पाहणार आहोत. आधी सांगितल्या प्रमाणे, लक्षात ठेवा निबंध पाठांतर करायचे नसतात. विषय कोणता आहे हे समजून, आपले विचार त्यात क्रमबद्ध पद्धतीने मांडायचे असतात. कधी तुमच्या माहितीसाठी मुद्दे दिलेले असतात. त्यांच्या आधारे निबंध कसा लिहायचा, त्यात काय अपेक्षित आहे आणि आपण निबंध लिहिताना कोणते मुद्दे लक्षात घ्यावयाचे आहेत हे आम्ही नीट समजावून सांगितले आहे (येथे क्लीक करा). चला तर पाहूया आजचा निबंध (Nisarg Maza Guru) निसर्ग माझा गुरु.

याच विषयावर वेग-वेगळे शब्द वापरून निबंध लिहायला दिले जाऊ शकतात, जसे निसर्ग माझा सोबती (Nsarg Maza Sobati) , निसर्ग मराठी निबंध 2022, Nisarg Essay In Marathi, निसर्गावर निबंध लिहा (Essay On Nature in Marathi). हा निबंध लिहिण्यासाठी खाली काही मुद्दे दिले आहेत.

मुद्दे : गुरूंचे महत्त्व —- निसर्ग आपला गुरु —- कोणते धडे देतो? — कृतीतून कसा शिकवतो? — उदाहरणे —- आकाश, नदी, झाडे, फूल वगैरे, मिळणार संदेश.

निसर्ग माझा गुरु – मराठी निबंध (२००+ शब्दात)

खरच निसर्ग हा माझा गुरु आहे. जसे गुरु आपल्याला अज्ञान रुपी अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशमय जगात घेऊन जगात. आपल्यावर चांगले संस्कार करतात.


जे आपल्याला ज्ञान देतात, शिक्षण देतात ते आपले गुरु असतात. या अर्थाने निसर्गाला सुद्धा आपला गुरु मानले पाहिजे. कारण निसर्ग आपल्याला विविध प्रकारचे ज्ञान देतो शिकवण देतो. मग निसर्ग आपला गुरु झालाच ना! निसर्ग प्रत्येक्ष आपल्या सोबत बोलत नसला तरी, तो आपल्या कृतीतून बरेच काही सांगत असतो, शिकवतो असतो. गरज आहे आपल्याला निसर्गाशी एकरूप होण्याची. मी त्याची प्रचिती घेतली आहे. निसर्ग मला प्रत्येक वेळी नवीन धडे देत असतो. म्हणूनच मी निसर्गाला माझा गुरु मानतो.


जेव्हा मी निसर्गाशी एकरूप झालो. तेव्हापासून मला निसर्गाची अनेक रूपे, घटक, आकार अनुभवायला मिळाले. निसर्गातील प्रत्येक घटक आपल्या कृतीतून काही ना काही शिकवण देतच असतो. आपल्याला ते आकलन करण्याची कला असली पाहिजे. मी स्वतःला तशी सवयच लावून घेतली आहे.


काही उदाहरणे पहिली तर तुम्हाला त्यातील सत्यता समजेल. खळखळ वाहणारे नदीचे प्रवाह, असंख्य संकटाला सामोरे जाऊन अखेर सागरा पर्यंत पोहचतात. यावरून नदी सांगते सतत कार्यरत राहा, संकटाना सामोरे जा, पण यशस्वी व्हा. झाडे कधी बोलत नाहीत पण खूप काही सांगतात. सतत दान करत राहा, छोटा-मोठा असा भेदभाव करु नका. मनाने सतत तरुण राहा. अशा प्रकारे पाने, फुले, पशु-पक्षी, किडे-मुंग्या, डोंगर-दऱ्या, नद्या-नाले, यांचे तुम्ही निरीक्षण करा त्यातून तुम्हाला काहीना काही नक्की शिकायला मिळेल.


आता तरी पटले ना ‘निसर्ग माझा गुरु’ आहे ते!

| Related: Mi Pakshi Zalo Tar Nibandh ! …| मी पक्षी झालो तर ! …

निसर्ग माझा गुरु – मराठी निबंध (३००+ शब्दात)

खरच निसर्ग हा माझा गुरु आहे. जसे गुरु आपल्याला अज्ञान रुपी अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशमय जगात घेऊन जगात. आपल्यावर चांगले संस्कार करतात. खऱ्या अर्थाने आपल्याला मानवाचे रूप देतात.

जे आपल्याला ज्ञान देतात, शिक्षण देतात, कसे वागायचे, समाज कसा घडवायचा याचे धडे देतात. जे स्वतःचा आदर्श इतरांपुढे ठेऊन दुसऱ्यांना आदर्श मनुष्य घडवण्यात मोलाची भूमिका निभावतात, ते आपले गुरु असतात. या अर्थाने निसर्गाला सुद्धा आपला गुरु मानले पाहिजे. कारण निसर्ग आपल्याला विविध प्रकारचे ज्ञान देतो शिकवण देतो, न बोलताही प्रबोधनाचे धडे देतो. मग निसर्ग आपला गुरु झालाच ना! निसर्ग प्रत्येक्ष आपल्या सोबत बोलत नसला तरी, तो आपल्या कृतीतून बरेच काही सांगत असतो, शिकवतो असतो, बऱ्याच सूचना देत असतो. गरज आहे आपल्याला निसर्गाशी एकरूप होण्याची. मी त्याची प्रचिती घेतली आहे, किंबहुना नेहमी घेतच असतो. निसर्ग मला प्रत्येक वेळी नवीन धडे देत असतो, काहीतरी नवीन शिकवत असतो. म्हणूनच मी निसर्गाला माझा गुरु मानतो.

मी जेव्हापासून निसर्गाशी एकरूप व्हायला लागलो, मी निसर्गाकडे जिज्ञासू नजरेने पाहायला लागलो. तेव्हापासून मला निसर्गाची अनेक रूपे, घटक, आकार, पैलू अनुभवायला मिळाले. निसर्गातील प्रत्येक घटक आपल्या कृतीतून काही ना काही शिकवण देतच असतो. आपल्याला ते आकलन करण्याची कला असली पाहिजे, ती अभ्यासू नजर असली पाहिजे. मी स्वतःला तशी सवयच लावून घेतली आहे.

.

काही उदाहरणे पहिली तर तुम्हाला त्यातील सत्यता समजेल. हे भव्य आकाश पहा, इतकं विशाल आहे, रूप बदलत असतो, तरीही त्याचे मूळ अस्तित्व आबाधित राखून आहे. काहीही झालं तरी स्वतःची ओळख कधी मिटू देऊ नका. खळखळ वाहणारे नदीचे प्रवाह, असंख्य संकटाला सामोरे जाऊन अखेर सागरा पर्यंत पोहचतात. यावरून नदी सांगते सतत कार्यरत राहा, संकटाना सामोरे जा, पण यशस्वी व्हा. झाडे कधी बोलत नाहीत पण तरीही ते खूप काही सांगतात. सतत दान करत राहा, छोटा-मोठा असा भेदभाव करु नका, इतरांच्या खुशीत समाधान माना. शरीराने व मनाने सतत तरुण राहा. अशा प्रकारे पाने, फुले, पशु-पक्षी, किडे-मुंग्या, डोंगर-दऱ्या, नद्या-नाले, यांचे तुम्ही निरीक्षण करा त्यातून तुम्हाला काहीना काही नक्की शिकायला मिळेल. निसर्गातील प्रत्येक घटक काहीना काही चांगला संदेश देत राहतात.

आता तरी पटले ना ‘निसर्ग माझा गुरु’ या विधानात किती सत्यता आहे ते! यापुढे तुम्हीही याचा अनुभव घ्या, निसर्गाशी एकरूप व्हा, आणि निसर्गाकडून शिकत राहा. निसर्ग तुमचाही गुरु आहे.

|Related: First Day Of Rain in Marathi Essay | पावसाळ्यातील पहिला दिवस निबंध

Other Essays:

Essay on My School in English
मेरा विद्यालय पर निबंध
Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
Essay on tree in Marathi
माझी शाळा निबंध मराठी
My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
जर मी ढग असतो तर :
If I Became The Prime Minister -Marathi Essay

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *