Jar Mi Dhag Asato tar.
निबंध/ Essay/Nibandh मराठी जग

Jar Mi Dhag Asato Tar | जर मी ढग असतो तर :

Jar Mi Dhag Asato Tar | जर मी ढग असतो तर :

मी ढग असतो तर मराठीत निबंध | या लेखात आम्ही ‘मी ढग असतो तर…’ या विषयावर सुमारे दोनशे शब्दांत आणि चारशे शब्दांत निबंध दिला आहे.
जर मी ढग असते तर (Jar Mi Dhag Asato Tar Var Nibandha) या निबंधात मी माझ्या भावना सहज आणि सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
Jar Mi Dhag Asato Tar – nibandh (जर मी ढग असतो तर – निबंध), दोन वेग-वेगल्या शब्द संख्येत दिले आहेत. यामुळे तुम्हाला तुमचे विचार लिहिणे सोपे जाईल.

जर मी ढग असतो तर ! ( 00 शब्द)

एके दिवशी मी अशाच आकाशात ढग बघत होतो, तेव्हाच माझ्या मनात विचार आला, की जर खरच मी ढग असतो तर. तो कधी या आकाराचा, तर कधी त्या आकाराचा होऊन, लहान मुलांना हसवले असते, मोकळ्या आकाशात पक्ष्यासारखा उडत राहिलो असतो.

जर मी ढग असतो, तर मी आकाशातून प्रवास करून संपूर्ण पृथ्वीभोवती फिरत राहिलो असतो. आकाशातून पृथ्वीचे दृश्य खूपच अप्रतिम असते. वेगवेगळ्या देशांच्या सीमा, आमहा ढगांना रोखू शकत नाही, त्यांना बांधून ठेवू शकत नाही.

जर मी ढग असतो, तर मी नेहमीच चांगला ढग बनण्याचा प्रयत्न केला असता. जिथे पाण्याची सर्वात जास्त गरज असते, तिथे पाऊस बरसलो असतो. शेतकऱ्यांच्या आशेचा पाऊस झालो असतो. माझ्यासाठी सर्व समान आहेत, जात नाही, धर्म नाही, सर्व एकच.

ढग तेंव्हा बनले जातात, जेव्हा समुद्र आणि महासागरातील पाण्याचे उष्णतेमुळे बाष्पीभवन होऊन ते आकाशात वर जातात, तेव्हा ते ढगाचे रूप धारण करतात. ढग सुद्धा पाऊस तेव्हाच पाडू शकतो जेव्हा इतर परिस्थिती एकत्र येऊन पाऊस पडण्याची संमती देतात. एकंदरीत, आम्ही मुक्त असूनही कैदी असल्या सारखे आहोत. पण तरीही, मला ढग असल्याचा खूप अभिमान आहे. माझ्यामुळे नद्या वाहतात, पृथ्वी, शेते हिरवीगार होतात. म्हणूनच मी शेवटी हेच सांगेन, जर मी ढग असतो तर मला खूप आनंद झाला असता.

| Related : Majhi Aai Nibandh in Marathi | माझी आई निबंध मराठी

जर मी ढग असतो तर ! (४00 शब्द)

एके दिवशी मी अशाच आकाशात ढग पाहत होतो, तेव्हाच माझ्या मनात विचार आला, की जर मी खरच ढग असतो तर. किती मजा आली असती, मी काय-काय केलं असतं. मी माझ्याच विचारात गेलो आणि म्हटलं, मी ढग असतो तर मला खूप आनंद झाला असता. तो कधी या आकाराचा, तर कधी त्या आकाराचा होऊन, लहान मुलांना हसवलं असतं. मोकळ्या आकाशात पक्ष्यासारखा उडत राहिलो असतो.

जर मी ढग असतो, तर मी आकाशातून प्रवास करून संपूर्ण पृथ्वीभोवती फिरत राहिलो असतो. आकाशातून दिसणारे पृथ्वीचे दृश्य खूप अप्रतिम असतं. निसर्गाचे हे सुंदर दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी न्याहाळत राहिलो असतो. आपल्याच स्वार्थापोटी या विविध देशांच्या निर्माण झालेल्या सीमा, आम्हा ढगांना रोखू शकत नाही, बांधून ठेवूही शकत नाही.

जर मी ढग असतो, तर मी नेहमीच चांगला ढग बनण्याचा प्रयत्न केला असता. उन्हात चालणाऱ्या वाटसरूला सावली दिली असती. जिथे पाण्याची सर्वात जास्त गरज असते, तिथे बरसलो असतो. पावसाच्या आशेने डोळे ओलावलेल्या शेतकऱ्यांचे, आशेचा पाऊस झालो असतो. पावसाच्या पाण्याने तहानलेल्या नागरिकांची तहान भागवली असती.
माझ्यासाठी सर्व काही समान आहेत. उच्च-नीच नाही, जात-धर्म नाही आणि देश-परदेशी नाही. मी सर्व ठिकाणी समान रीतीने पाऊस पाडत राहीन. मी सदैव सर्वांना आनंद देत राहीन आणि माझ्यामुळे कोणाचेही दुःख होऊ नये, कोणाचेही नुकसान होऊ नये यासाठी सतत प्रयत्न करत राहिलो असतो.

| Related : माझा आवडता ऋतू-पावसाळा – निबंध (Around 200 words):

पण आम्ही ढग जरी मुक्त दिसत असलो तरी मुक्त नाहीत. आपण सर्व या निसर्गाच्या नियमांद्वारे निर्देशित, नियंत्रित आणि सूचिबद्ध आहोत. जेव्हां समुद्र आणि महासागरातील पाण्याचे उष्णतेमुळे बाष्पीभवन होऊन वाफ आकाशात जाते, हीच वाफ एकत्रितपणे ढगाचे रूप धारण करते आणि आकाशात हवेबरोबर तरंगते. यानंतर वारा जिथे वळतो तिथे ढग वाहत राहतात. ढग देखील तेव्हाच पाऊस पाडू शकतात जेव्हा वातावरणाचे तापमान आणि इतर परिस्थिती एकत्रितपणे पाऊस पाडण्यासाठी अनुमती देते. एकंदरीत, मी मुक्त असूनही कैदी आहे.

होय, मी एक कैदी आहे, परंतु तरीही, मला ढग असल्याचा खूप अभिमान आहे. माझ्यामुळे नद्या वाहतात, झाडे फुलतात, पृथ्वी हिरवीगार होते. शेते-शिवारे डोलू लागतात. ढग बनून जीव-जंतूंच्या जीवनात आनंद वाटून देण्याची संधी मला मिळते. म्हणूनच मी शेवटी हि पुन्हा तेच सांगेन, जर मी ढग असतो तर मला खूप-खुप आनंद झाला असता.

| Related : Maza Avadta rutu Marathi Nibandh – पावसाळा

If I were a Cloud Essay In Marathi| जर मी ढग असतो तर निबंध| Yadi Mai badal hota in Hindi
ढगा वरील हिंदी निबंध हे एखाद्या लहान ढगाच्या आत्मचरित्रासारखे आहे.

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *