Paus Padla Nahi Tar
निबंध/ Essay/Nibandh

Paus Padla Nahi Tar, New Essay | पाऊस पडला नाही तर (300+ words)

Paus Padla Nahi Tar Essay | पाऊस पडला नाही तर :

नमस्कार मुलांनो! आज आपण Smart School Infolips च्या या लेखामध्ये “पाऊस पडला नाही तर” (Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh) हा निबंध पाहणार आहोत. निबंध म्हणजे विषय समजून, आपले विचार क्रमबद्ध पद्धतीने मांडणे. तुमच्या माहितीसाठी मुद्दे दिलेले असतात. त्यांच्या आधारे निबंध कसा लिहायचा, त्यात काय अपेक्षित आहे आणि आपण निबंध लिहिताना कोणते मुद्दे लक्षात घ्यावयाचे आहेत हे आम्ही नीट समजावून सांगितले आहे (येथे क्लीक करा). निबंध वाचून पाऊस नसल्याने काय परिणाम होऊ शकतात या अंदाज येईल, पाऊस आपल्याला का उपयोगी आहे हे ही समजेल. आशा आहे तुम्हाला तो आवडेल.

Paus Padla Nahi Tar Essay : (300+ Words)

शाळेत जाण्याची तयारी झाली होती, आणि अचानक पावसाची सुरुवात झाली. पण त्या दिवशी खूप पाऊस पडत होता, .घरी नेहमीप्रमाणे सकाळच्या बातम्या सुरु होत्या आणि तेव्हा माहित झाले की, मुसळधार पडणाऱ्या पावणे, सगळीकडे पाणीच पाणी केले होते. जागोजागी पाणवठे झाले होते, सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

मग कर, मी अगदी आनंदाने नाचू लागले, पण थोड्याच वेळात टीव्हीवर पाऊस पडल्याने काय-काय नुकसान झाले आहे ते बघितले. पावसामुळे इतकं नुकसान होऊ शकतो हे पाहून थक्कच झालो. माझ्या मनात कल्पना आली की पाऊस पडला नाही तर किती बरे होईल. लोकांचे असे हाल तर होणार नाहीत ना.

पाऊस पडला नाही तर लोकांना पावसाच्या पाण्याने त्रास होणार नाही, लोकांचे घर, शेत वाहून जाणार नाहीत. पाणी साचून कोणाचेही काही नुकसान होणार नाही आणि लोक आनंदाने राहतील. पण क्षणात माझ्या मनात दुसरा विचार आला, अरे खरच असे झाले तर.

|Related: My Village Essay in Marathi | माझा गाव मराठी निबंध

पाऊस नसेल तर आपल्याला पाणी कसे मिळेल.जर पाऊसच पडला नाही तर, नद्या, नाळे, धरणे, तळे काहीच राहणारच नाही. पावसाच्या पाण्यावर तर हे सारे अवलंबून असतात. पाणी नाही तर नद्या आणि तलावांमध्ये राहणारे जीव जगू शकणार नाहीत.

आपल्या आजूबाजूला सुंदर हिरवेगार निसर्ग जो दिसतो आहे, तो जिवंत कसा राहील. पण जर पाऊस नसला तर झाडे जी आपल्याला हवा देतात, खायला फळ आणि सावली देतात ते जगूच शकणार नाहीत. पावसाच्या पाण्याविना सर्व झाडे सुकून जातील, मरून जातील. जे सुंदर निसर्ग आपण बघतो ते केवळ एक रखरखीत वाळवंट बनेल. ही पृथ्वी दगड धोंड्यांचे प्रदेश बनून राहील.

पाऊस पडला नाही तर पहिल्या पावसात भिजण्याची मजा घेता येणार नाही, पावसात तयार होणारे इंद्रधनुष्य बघायला मिळणार नाही. जर पाऊस पडला नाही तर आपल्याला खायला अन्न मिळणार नाही. कारण पावसा विना शेती होणे अशक्य. जर का पाऊस पडला नाही तर या पृथ्वीवर जीवन शक्य होणार नाही कारण सर्व सजीवांना पिण्यासाठी पाणी आवश्यक आहे, तेच मिळाले नाही तर त्यांचे अस्तित्वच राहणार नाही.

पाऊस पडल्याने नुकसान होते हे खरे आहे पण त्यामध्ये आपलीच चूक आहे कारण आपण सगळीकडे सिमेंटचे जंगल तयार करत आहोत. जमिनीला पाणी शोषता येत नाही. आणि शहरांमध्ये पावसाच्या पाण्याला नीट वाहता येत नाही. परिणामी पावसाचे पाणी घरा-घरांना शिरते, यामुळे आपले नुकसान होते. पाऊस आहे तर जीवन आहे, म्हणून पाऊस हा पडलाच पाहिजे.

|Related : Sainikache Atmavrutta Essay in Marathi | सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध

Paus Padla Nahi Tar Essay : (400+ Words)

मुद्दे: असा विचार आला ? — कशी मजा करायला मिळणार नाही ? —- पावसाचे महत्व —- काय परिणाम होईल ? — विश्वाची स्थिती कशी असेल ? — निसर्गावर होणारा परिणाम — पृथ्वी स्थिती काय असेल ? — कल्पना कारणे दुःखदायक.

जून महिना उलटून गेला तरी पाऊसाला सुरुवात झाली नव्हती. गावातील सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यावेळी अचानक माझ्या मनात विचार आला की खरोखरच जर पाऊस पडलाच नाही तर…

पाऊस आला नाही तर पावसाळ्याची मजा लुटता येणार नाही. ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळणार नाही. पाऊस आला नाही तर छत्री, रेनकोट यांचा काही उपयोगच होणार नाही. पावसाच्या पाण्यातून कागदी होड्या सोडता येणार नाहीत. चिखलात उड्या मारत दुसऱ्याच्या अंगावर चिखल उडवण्याची मजा करायला मिळणार नाही. शाळेला सुट्टी मिळणार नाही, जास्त पावसाचे कारण सांगून शाळेला दांडी मारता येणार नाही. पडत्या पावसात आईच्या हातच्या गरमा-गरम भाज्यांचा आस्वाद घेता येणार नाही.

हे सर्व असले तरी, पाणी हे जीवन आहे. त्याचा उपयोग पिण्यासाठी, शेतीसाठी, वीज निर्मितीसाठी केला जातो. पावसाला मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. पावसामुळे मानवाच्या अनेक गरजा होतात. पावसावर संपूर्ण शृष्टीचे चक्र अवलंबून आहे. इतका महत्वाचा हा पाऊस आला नाही तर नद्या, नाले कोरडे पडतील. त्यामुळे शेतीतला व पिकांना पाणी मिळणार नाही. याचाच परिणाम म्हणजे मानव पशुपक्षी या सर्वांना मरणकळा येईल. पाण्याच्या अभावी सर्वत्र दुष्काळ पडेल. शेते पीकणार नाहीत, विहिरी आटून जातील, पिण्यासाठी पाणी मिळणार नाही, जमिन रखरखीत पडेल. झाडे, वेली, पाने-फुले सुकून जातील. जनावरांना चारा न मिळाल्यामुळे ती सुद्धा मरून जातील. संपूर्ण सजीव सृष्टी संकटात येईल. हे सुंदर दिसणारे विश्व स्मशाना प्रमाणे भकास दिसू लागेल. ही पृथ्वी न राहता, इतर ग्रहां प्रमाणे बेजान ग्रह बनेल.

पाऊस आला नाही तर परमेश्वराने आपल्यासाठी निर्माण केलेला सुंदर निसर्ग भयाण दिसू लागेल. पृथ्वी वर भयानक स्थिती उत्पन्न होईल. ओसाड, उजाड रान सर्वत्र दिसेल, पाना-फुलांशिवाय झाडे लाकडाच्या खांबांसारखी उभी असलेली दिसतील. फुलपाखरांचे थवे नसतील, पक्ष्यांची किलबिलाट नसेल. पर्यावरणाचा समतोल ढासळेल, उष्णतेचे प्रमाण वाढेल. पाण्या वीणा, सर्वांचेच अस्तित्वच नष्ट होईल.

पाऊस पडला नाही तर काय होऊ शकते, या कल्पनेचं अंगावर काटा आला. खरच ही कल्पना करवत नाही. असा विचारही मनात ना येवो. यासाठी झाडे लावा. झाडे जगावा. पाण्याचा वापर योग्य तसा आणि तितकाच करा.

|Related: World International Days | List of 1000+ आंतरराष्ट्रीय दिवस

Paus Padla Nahi Tar Essay | पाऊस पडला नाही तर

Other Essays:

➥ Essay on My School in English
➦ मेरा विद्यालय पर निबंध
➥ Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
➦ Essay on tree in Marathi
➥ माझी शाळा निबंध मराठी
➦ My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
➥ जर मी ढग असतो तर :
➦ If I Became The Prime Minister -Marathi Essay

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech

पाऊस पडला नाही तर निबंध, जर पाऊस पडला नाही तर निबंध, marathi पाऊस पडला नाही तर निबंध लेखन, पाऊस पडला नाही तर कविता मराठी,, पाऊस पडला नाही तर काय होईल, पाऊस पडला नाही तर काय होईल उत्तर, पाऊस पडला नाही तर explain why, पाऊस पडला नाही तर निबंध in marathi, पाऊस पडला नाही तर pdf.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *