Sainikache Atmavrutta Essay in Marathi | सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध :
नमस्कार मुलांनो! आज आपण Smart School Infolips च्या या लेखामध्ये “सैनिकाचे आत्मवृत्त” (Sainikache Atmavrutta Marathi Nibandh) हा निबंध पाहणार आहोत. निबंध म्हणजे विषय समजून, आपले विचार क्रमबद्ध पद्धतीने मांडणे. तुमच्या माहितीसाठी मुद्दे दिलेले असतात. त्यांच्या आधारे निबंध कसा लिहायचा, त्यात काय अपेक्षित आहे आणि आपण निबंध लिहिताना कोणते मुद्दे लक्षात घ्यावयाचे आहेत हे आम्ही नीट समजावून सांगितले आहे (येथे क्लीक करा). निबंध वाचून सैनिकाचे जीवन किती परिश्रमाचे आणि खडतर आहे याची प्रचिती आल्या शिवाय राहणार नाही. आशा आहे तुम्हाला तो तुम्हाला आवडेल.
सैनिकाचे आत्मवृत्त या विषयासाठी अजून वेगळ्या शब्दात विचाले जाऊ शकते, जसे सैनिकांची जीवनशैली निबंध मराठी, सैनिकाचे मनोगत निबंध मराठी, सैनिकांची जीवनशैली भाषण, सैनिकांची माहिती, शौर्य पदक विजेता सैनिकाचे मनोगत, सैनिकाची आत्मकथा, सैनिकांचे जीवन. चला तर करूया सुरुवात.
सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध (३००+ शब्दांत)
(Sainikache Atmavrutta Essay in Marathi)
मी एक तुमच्या आमच्या सारखा सामान्य जीवन जगणारा सामान्य माणूस आहे. लहानपणा पासूनच मला अन्यायाची चीड येत असे. त्यामुळेच मी सैन्यात जाण्याचे ठरविले होते.
माझा जन्म शेतकरी कुटुंबातील आहे. आई-वडिलांना मी शिकावे, व शेती व्यवसायात राहून त्यात सुधारणा करायचे असे वाटत असे. लहानपणापासून मी खूप धीट होतो. व्यायामाची सवय तिने मला आईमुळेच लागली होती. अभ्यासाबरोबर इतर कामे करण्याची सवय मला आई-बाबांमुळेच लागली होती. इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळं करून दाखवावे ही माझ्या लहानपणापासूनची इच्छा होती. मी शाळेत नववीत असताना चीनने भारतावर केलेल्या हल्ल्याच्या बातम्या ऐकून बेचैन व्हायचो. सैनिकांच्या शौर्याच्या बातम्या वाचून, पाहून आपणही असे काहीतरी करावे असे वाटू लागले. मी माझी ईच्छा माझे आवडते शिक्षक खामकर सरांना सांगितली. त्यांना हे ऐकून खूप आनंद झाला व त्यांनी मला प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केले. दहावी नंतर सैनिकी शाळेत जाण्याचा मी निश्चय केला. दहावी उत्तम गुणांनी पास झालो सैनिक शाळेत जाण्याचा माझा विचार मी आई-वडिलांना सांगितला. आईला थोडी भीती वाटली, कारण सैनिक म्हणजे मरण असते असा तिचा गैर समज होता. पण माझ्या शाळेच्या सरांनी आणि बाबांनी तिला समजावले. सर्वांनी मला प्रेमाचा निरोप दिला व माझे सैनिकी शिक्षण सुरू झाले.
ज्या शिस्तीची मला शाळेत जीवनात गोडी लागली त्या शिस्तीचा आणि अंधुभावाचं मला सैनिकी शाळेत खूप फायदा झाला. सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, मग न्याहारी करणे, वर्गातील शिक्षण, प्रात्यक्षिक हे करणे मला आवडू लागले. शिक्षण पूर्ण झाल्यावर कामावर हजर होण्यापूर्वी तीन आठवड्यांची सुट्टी मिळाली गावात परतल्यावर, गावकऱ्यांनी खूप आनंदात स्वागत केले. गावातील पहिला सैनिक असल्याने माझे बाबा तर खूपच खुश होते. त्याच्या चेहऱ्यावर तो आनंद झळकत होता.
.
सीमा रक्षणासाठी पाठवण्यात आलेल्या तुकडीचे नेतृत्व करण्याची फारमोठी जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. सीमेवर गेल्यावर तेथील भयानक खडतर जीवनाचा अनुभव घेतला. तेथील परिस्थितीने मला अधिकच खंबीर बनवलं होतं. सीमेवर लढताना अनेक वेळा जीवघेणे प्रसंग आले. सहकाऱ्यांची साथ गुरुवर्य यांचा आशीर्वाद, यामुळे यातून यशस्वी बाहेर पडलो.
आता मी सैन्यातून निवृत्त होऊन दहा वर्षे झाली आहेत. सरकारने जमीन दिली आहे, त्यावर शेती करतो. दोन मुले आहेत, ती पण सैनिकी शाळेतच आहेत. माझ्याकडे पाहून त्यांना मेजर लेफ्टनंट व्हायचा आहे. आज मी हे सारे पाहून तृप्त आहे. मला माझ्या देशाची सेवा करता अली व माझी मुले त्याच पावलावर पाऊल ठेवत आहेत. याचा मला खूप-खूप अभिमान आहे.
सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध (५००+ शब्दांत)
मी एक तुमच्या आमच्या सारखा सामान्य जीवन जगणारा सामान्य माणूस आहे. पण आत मी एक सैनिक आहे व कठीण परिश्रमानंतर मला ही वर्दी परिधान करण्याचा गौरव मिळाला आहे. सैनिकांची वर्दी परिधान करताना मला खरंच गौरवास्पद वाटत आहे. लहानपणापासून मला सैनिक बनन्याची ईच्छा होती. यासाठी मी रात्रंदिवस मेहनत केली आहे. घरची परिस्थिती हलाखीची असतांनाही मी हार स्वीकारली नाही. माझे एकच ध्येय होते, आणि ते ठरलेले होते की मला सैनिकच बनायचे आहे. सैनिक बनण्यासाठी मी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास तयार होतो.
जसा मी दहावी ची परीक्षा उत्तीर्ण झालो, तसा मी सैन्यात भरती होण्यासाठी कसरत करू लागलो. दररोज सकाळी ४ वाजात उठून धावणे, व्यायाम करणे सुरु केले. माझ्या मित्रांसोबत, गावातील मोठ्या व्यक्तींना विचारून साइन भरती विषयीची माहिती मिळवत होतो. गावातील शेजारच्या काकांना सांगून ठेवलं होतं की सैनिक भरती असल्यास मला कळवा. एक दिवस वृत्तपत्रातील सैन्य भरतीची जाहिरात पाहून भरत काकांनी मला सूचित केलं. बस याच दिवसाची तर वाट पाहत होतो. दुसऱ्याच दिवशी व मी तेथे जाऊन पोहोचलो. पहिल्याच प्रयत्नात मी परीक्क्षा उत्तीर्ण झालो. मला सैन्यात भरती करण्यात आले.
माझ्या स्वप्नाच्या दिशेनं माझे पहिले पाऊल पडले होते खरे. परंतु माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते. ते माझ्या निर्णयापासून नाराज होते. त्यांना वाटायचे की सैनिक म्हणजे मृत्यू. कधी युद्ध होईल आणि माझ्या मुलाचे काही बरे-वाईट झाले तर, या भीतीने त्यांचा जीव कावरा-बावरा व्हायचा. त्यांना माझी मेहनत आणि माझे कठीण परिश्रमाचे कौतुक होते, माझी सैनिक बनण्याची जिद्द आणि महत्वकांक्षा पाहून, शेवटी त्यांनी माझ्या निर्णयास होकार दिला.
.
सैन्यात भरती झाल्यावर माझी ट्रेनिंग सुरु झाली. मी या प्रशिक्षणादरम्यान खूप कठीण परिश्रम घेतले. माझ्या मेहनती मुळे ४ महिन्यातच ट्रेनिंग संपवून माझी पोस्टिंग काश्मीर सीमेवर करण्याल आली. काश्मीर खूप अशांत भाग आहे, येथे येता-जाता आतंकवादी घटना होताच असतात.
टीव्हीवर या घटना पाहताना, लहानपणी मी या आतंकवाद्यांना योग्य उत्तर देईन त्यांचा सफाया करिन असे स्वप्न पहायचो. आज ते करण्याचा दिवस सत्यात आला होता. २० डिसेंबर २०२० ला आम्हाला आदेश मिळाले की काही आतंकवादी भारताच्या सीमेत घुसपेट करत आहेत. आमची २५ सैनिकांची एक तुकडी या घटनेला मोडून काढण्यासाठी निघाली. आतंकवादी तेथील घराचा आसरा घेऊन, लपून आमच्यावर गोळीबार करत होते. तुकडी प्रमुखांचा मला पुढे जाण्याचा आदेश मिळाला. मी झाड, घर, इतर वस्तूंचा आसरा घेत, पुढे जात होतो. माझ्या मागे माझे तीन सोबती, माझे अनुकरण करत पुढे येत होते. योग्य ठिकाण पाहून मी गोळ्या मारू लागलो. माझ्या या गोळीबारात ५ आतंकवाद्यांना योग्य न्याय दिला होता. मला निशाणा करताना पाहून माझ्या सोबतींनी उरलेल्या आतंकवाद्यांचा खातमा करून, मिशन पूर्ण केले.
या कामगिरी बद्दल, सुभेदार साहेबांनी मला शाब्बासकी दिली व मला पदक देऊन सन्मानित केले. साहेबांच्या मागणी वर मला २६ जानेवारीला सम्मनित करण्यात आले. ही बातमी ऐकून माझ्या आई वडिलांना माझ्या या पराक्रमाचे कौतुक वाटले. त्यांना खूप आनंद झाला, फोने वरील त्यांच्या आवाजातून ते जाणवत होते. त्यांना माझा अभिमान वाटत होता. आता माझी पोस्टिंग म्यानमार सीमेवर करण्यात आली. मी देशाच्या सेवेसाठी अधिक तत्पर आणि अधिक जागरूक आहे.
.
हे सारे ऐकून तुम्हाला कळलेच असेल की, सैनिकाचे जीवन किती कठीण असते. सर्व जगाला माहित आहे की युद्धाने काहीच चांगले होत नाही. पण तरीही परंतु एका सैनिकाला नेहमीं युद्धासाठी तयार राहावे लागते. सैनिक फक्त सीमेवर शत्रू शी काढण्यासाठीच असतात असे नाही. ते देशातील बिकट परिस्थितीत आपल्या देशाचे नागरिकांचे प्राण देखील वाचवतात. त्यांना संकटकाळी मदत करतात. सोबत नेहमी मृत्यूचे फार्मन घेऊन जगात असतात. तरीही खूप समाधानी असतात, कारण त्यांना देशासाठी आपले ऋण उटण्याची संधी मिळालेली असते. त्यांच्या मुळे देशातील नागरिक सुखरूप आहेत याचा त्यांना आभिमान आहे.
तर मित्रांनो हे “सैनिकाचे आत्मवृत्त” तुम्हाला आवडले असेल अशी आशा करतो. हे वाचून तुम्हालाही सैनिक होण्याची ईच्छा झाली असेल ना. सैनिक होणे हा जगातील सूर्वोत्तम मान आहे. या निबंधाचा तुम्हाला फायदा होईल अशी आशा आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेन्ट करून नक्की कळवा. तसेच तुम्हाला काय व्हायचे आहे ते आम्हाला comment करून सांगा. धन्यवाद…
(Sainikache Atmavrutta Essay in Marathi)
.
Other Essays:
➥ Essay on My School in English
➦ मेरा विद्यालय पर निबंध
➥ Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
➦ Essay on tree in Marathi
➥ माझी शाळा निबंध मराठी
➦ My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
➥ जर मी ढग असतो तर :
➦ If I Became The Prime Minister -Marathi Essay
इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech