How To Write An Essay In Marathi | निबंध कसा लिहावा | Nibandha kasa lihava | Nibandh lekhan Kase Karave |
निबंध लिहिणे हे बऱ्याच जणांना कठीण वा कंटाळवाणे वाटते. याचे कारण असते, निबंध कसा लिहतात हेच आपल्याला माहित नसते. बरेचजण निबंधही पाठ करतात व परीक्षेत तासाच्या तसा लिहितात. पण जर तो तुमच्या शब्दात, तुमच्या विचारात स्पष्ट केलात तर तो अधिक प्रभावी ठरतो. चला तर शिकूया मग निबंध लिहायला.
निबंध म्हणजे एखाद्या विषयावर आपले विचार मांडणे. निबंध लिहिण्यासाठी आपल्याला काही विषय दिले जातात, त्या विषयावर आपल्याला आपले विचार मांडायचे असतात. हे विचार मांडताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेऊन निबंध लिहिण्याचा सराव करावा लागेल. यासाठी खालील मुद्दे समजून घेऊ, म्हणजे आपल्याला यापुढे निबंध लिहिणे सोपे जाईल.
विचारात घ्यावे लागणारे मुद्दे :
➥ दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना सर्व मुद्द्यांचा वापर करावा.
➥ निबंधात किती परिच्छेद असावेत याला मर्यादा नसते, पण किमान तीन परिचछेद पाडावेत.
➦ मुद्द्यानुसार अधिक परिच्छेद पाडले तरी चालतील.
➥ भाषा सोपी, शुद्ध असावी.
➦ निबंधाची सुरुवात आकर्षक असावी, ज्यामुळे निबंध पुढे वाचण्याची उत्कंठा वाढली जाते.
➦ शेतकरी आत्महत्या विषयावरील निबंधासाठीः
फक्त पाच पैसे किलो! अशक्य! हे कसे असू शकते! हे काय चालू आहे? शेतकर्याच्या कष्टाचे इतकेच मोल आहे का?………. यानंतर मात्र लगेच निबंधाच्या टॉपिकची ओळख व त्या विषयाचे गांभीर्य याचा उल्लेख करावा.
➥ पुढचा भाग म्हणजे निबंधाचा गाभा असतो. यामध्ये विषयाची मुख्य कल्पना, तपशील व आपण मांडत असलेल्या मुद्द्यांच्या समर्थनार्थ एखादे छोटे उदाहरण द्यावे.
➦ शेवटच्या परिच्छेद मध्ये थोडक्यात सर्व मतांचा सारांश मांडून, स्वतःचे मत मांडावे व काही सूचना लिहाव्यात. निबंधाचा शेवट करतानाही आशादायी, समस्या निवारण, उपाययोजना सुचवणारा, भविष्याबद्दल मंगल चित्र रंगवणारा असावा. समस्या किती का असेना, ती निवारण्याचे बळ तुम्हा तरुणाईच्या मनगटात नक्कीच आहे, हे निबंधातून जाणवायला हवे.
➥ निबंधात म्हणी, वाक्प्रचार, काव्यपंक्ती, सुविचार याचा योग्य त्याठिकाणी वापर करावा.
➦ निबंधामध्ये थोर व्यक्तींची विधाने, माहिती असल्यास व विषयाला अनुकूल असल्यास जरूर द्यावीत.
➥ निबंधात शक्यतो पूर्ण गुण देत नाहीत. त्यामुळे आपले गुण कमी होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. विशेषतः व्याकरणाच्या चुका टाळाव्यात. शब्दलेखन व विरामचिन्हे व्यवस्थित द्यावीत.
➦ निबंधात आशय भरपूर असावा, त्याला आधिक महत्त्व आहे.
➥ विनाकारण थापा मारून, निबंध वाढवण्याच्या प्रयत्न करू नये.
➦ एका परिच्छेदानंतर दुसरा परिच्छेद लिहिताना एकमेकांशी संबंध असावा.
➥ जे मराठी निबंधाच्या बाबतीत आहे, तेच इंग्रजी च्या बाबतही लागू होते. Same things are to be applied to write a essay in English
➦ निबंधाला किती गुण आहेत यावरून, निबंधाची शब्दमर्यादा लक्षात घ्यावी. ५ गुण असलेल्या निबंधाला किमान १० आणि कमाल १५ ओळींचे निबंध असावे.
शालेय स्तरावरील निबंध आणि स्पर्धा परीक्षा स्तरावरील निबंध यात खूप फरक असतो. स्पर्धा परीक्षांसाठी निबंध लिहिताना अर्थातच निबंध लेखनाची पातळी वाढत जाते; ती वाढत जायला ही हवी. कारण जस-जसे वय वाढते, शिक्षण वाढते तसे आपले अनुभव वाढत जातात. आपल्याकडील शब्द भांडार वाढत जातो. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची आपली दृष्टी प्रगल्भ बनत असते, आपल्या जाणिवा समृद्ध होत असतात. वृत्ती डोळस बनते, परिस्थिती समजून घेण्याची आपली कल्पकता वाढलेली असते. विचारांत नवी झळाळी, कल्पनेस नवी प्रेरणा मिळत असते. या सगळ्याचे प्रतिबिंब आपल्या निबंधातून उमटायला हवे.
Other Essays:
Essay on My School in English
मेरा विद्यालय पर निबंध
Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
Essay on tree in Marathi
माझी शाळा निबंध मराठी
My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
जर मी ढग असतो तर :
If I Became The Prime Minister -Marathi Essay
इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech
So in this article, we have seen some rules abour how to do essay writing in Marathi. What are the essay writing format, essay writing topics and how to write an essay in English. Essay writing examples, essay writing in Marathi. How to solve myself essay writing? What is an essay in Marathi? How do I write an essay? What are types of essay writing? Is there an essay Writing in MPSC?. I hope you get all the answers to the questions.