first day of rain in marathi
निबंध/ Essay/Nibandh

First Day Of Rain in Marathi Essay | पावसाळ्यातील पहिला दिवस निबंध

First Day Of Rain in Marathi Essay | पावसाळ्यातील पहिला दिवस निबंध :

Pawasalyatil Pahila Diwas – Smart School Infolips | Pavsalyatil pahila divas smartschool.infolips | Essay on first day of rain in Marathi

नमस्कार मुलांनो! आज आपण या लेखामध्ये पावसाळ्यातील पहिला दिवस हा निबंध पाहणार आहोत. मी पुन्हा एकदा सांगतो आहे. निबंध पाठांतर करायचे नसतात. विषय कोणता आहे हे समजून, आपले विचार त्यात क्रमबद्ध पद्धतीने मांडायचे असतात. निबंध कसा लिहायचा, त्यात काय अपेक्षित आहे आणि आपण निबंध लिहिताना कोणते मुद्दे लक्षात घ्यावयाचे आहेत हे आम्ही नीट समजावून सांगितले आहे (येथे क्लीक करा). चला तर पाहूया आजचा निबंध पावसाळ्यातील पहिला दिवस.

पावसाळ्यातील पहिला दिवस – निबंध (२००+ शब्दात) :

जून महिना संपत आला होता, तरीही पावसाचा पत्ता नव्हता. मे महिन्यातील वैशाखाच्या उन्हाने पृथ्वी तापून निघाली होती, हवेतील उकाडा चांगलाच जाणवत होता. दुपारच्या वेळी बाहेर खेळण्यासाठी जाणे नको वाटायचे. सारे जण, कधी एकदाचा पाऊस सुरु होणार याची आतुरतेने वाट पाहत होते.


अखेर तो दिवस आला, अचानक भर दुपारी आकाशात काळे ढग जमा होऊ लागले. काही सेकंदात निसर्गाचे रूपच पालटून गेले. काही क्षणापुर्वी लागणारी उन्हाची झळ, कमी वाटू लागली. गार वारा जाणवू लागल्या, उन्हाची चमक कमी होऊन अंधार पसरला होता. इतक्यात पावसाची सुरुवात झाली. आम्ही सर्व मुले पहिल्या पावसात भिजायला घरा बाहेर पडलो. पावसात भिजलेल्या सुक्या मातीचा सुगंध, हृदयाच्या बाटलीत पुन्हा पुन्हा भरून घ्यावासा वाटत होता.


थोड्याच वेळात आमच्या अंगणात पाणी साचले. आम्ही पाण्यात खूप मजा केली. आमच्या सोबत झाडावरचे पक्षीही पावसात भिजण्याचा खेळ खेळत होते. साचलेल्या पाण्यात उड्या मारणे, कागदाच्या, पानांच्या होड्या सोडणे हे वेगळेच खेळ सुरु झाले. अखेर आजीने जोराचा दम भरल्याने आम्ही मुले आपापल्या घरी गेलो. आजीने पाणी गरम करून ठेवलंच होतं. छान अंघोळ करून येई पर्यंत आईने गरमा-गरमा चहा आणि भजी करून आणल्या. बाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहत भजीवर ताव मारला.


संध्याकाळ झाली तरी पाऊस पडतच होता. पाऊस व हवे मुळे अचानक वीजही गेली होती. आज टीव्ही, पंखे चालू नसतानाही, काहीच वाटत नव्हतं. बाहेर पाऊस, गार वारा यामुळे मनालाही गारवा मिळाला होता. ओसरीतल्या कट्ट्यावर, आजीच्या कुशीत बसून पावसाला न्याहाळत होतो. आई, बाबा, दादा, ताई सर्वजण पहिल्या पावसाचा आनंद घेत होते. असा पावसाळ्यातील पहिला दिवस माझा खूप-खूप मजेत गेला.

| Related: Importance Of Hard Work in Life | जीवनमें परिश्रम का महत्व (Read more…)

पावसाळ्यातील पहिला दिवस – निबंध (३००+ शब्दात) :

जून महिना संपत आला होता, तरीही पावसाचा पत्ता नव्हता. मे महिन्यातील वैशाखाच्या उन्हाने पृथ्वी तापून निघाली होती, हवेतील उकाडा चांगलाच जाणवत होता. दुपारच्या वेळी बाहेर खेळण्यासाठी जाणे नको वाटायचे. सामान्य माणसांपासून पशू पक्ष्यांसह सर्व जण, कधी एकदाचा पाऊस सुरु होणार याची आतुरतेने वाट पाहत होते.

अखेर तो दिवस आला, अचानक भर दुपारी आकाशात काळे ढग जमा होऊ लागले, वाऱ्याचा वेगही वाढला होता. आणि अचानक निसर्गाचे रूपच पालटून गेले. काही क्षणापुर्वी लागणारी उन्हाची झळ, कमी वाटू लागली. गार वाऱ्याच्या लहरी जाणवू लागल्या, उन्हाची चमक कमी होऊन अंधार पसरला होता. आणि इतक्यात पावसाची सुरुवात झाली. आम्ही सर्व मुले गोंधळ करून नाचू लागलो, पहिल्या पावसात भिजायला घरा बाहेर पडलो.

घरातील मंडळी, अंगणात असलेल्या वस्तू पावसात भिजू नये म्हणून, आत ठेवू लागले. सर्वांची धावपळ सुरू झाली होती, अचानक आलेल्या पावसाने सर्वाना भांबावून सोडलं होतं. आम्ही ही आजीला मदत केली व पुन्हा पावसाच्या धारा अंगावर घेऊ लागलो. ओल्या झालेल्या अंगासोबत, वातावरणही गार झालं होतं. हवेतील गारवा अंगाला जाणवत होता. पावसात भिजलेल्या सुक्या मातीचा सुगंध, हृदयाच्या बाटलीत पुन्हा पुन्हा भरून घ्यावासा वाटत होता.

.

थोड्याच वेळात आमच्या अंगणात पाणी साचले, त्यामुळे आम्ही पाण्यात खूप मजा केली. आजी नको म्हणत असतानाही तिला जुमानले नाही. आमच्या सोबत झाडावरचे पक्षीही पावसात भिजण्याचा खेळ खेळत होते. साचलेल्या पाण्यात उड्या मारणे, कागदाच्या, पानांच्या होड्या सोडणे हे वेगळेच खेळ सुरु झाले. अखेर आजीने जोराचा दम भरल्याने आम्ही मुले आपापल्या घरी गेलो. आजीने पाणी गरम करून ठेवलंच होतं. छान अंघोळ करून येई पर्यंत आईने गरमा-गरमा चहा आणि भजी करून आणल्या. बाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहत भजीवर ताव मारला.

संध्याकाळ झाली तरी पाऊस पडतच होता आजीने देवाजवळ दिवा लावला. पाऊस व हवे मुले अचानक वीजही गेली होती. आज टीव्ही, पंखे चालू नसतानाही, काहीच वाटत नव्हतं. बाहेर पाऊस, गार वारा यामुळे मनालाही गारवा मिळाला होता. ओसरीतल्या कट्ट्यावर, आजीच्या कुशीत बसून पावसाला न्याहाळत होतो. आई, बाबा, दादा, ताई सर्वजण पहिल्या पावसाचा आनंद घेत होते. निसर्गाच्या किमयेचं आज वेगळाच दर्शन झालं होतं. काही वेळान वीज आली. असा पावसाळ्यातील पहिला दिवस खूप-खूप मजेत गेला.

| Related: |Related: Vidyarthi Ka Kartavya Essay in Hindi | विद्यार्थी का कर्तव्य पर निबंध (Read more…)

मराठी इयत्ता ४थी – सर्व धड्यांचे प्रश्न-उत्तर – All Lesson Question Answers

Essay Topics List in Marathi, Hindi, and English:

Question Answer for All Standard

हिंदी निबंध

English Essay

Other Essays:

➥ Essay on My School in English
➦ मेरा विद्यालय पर निबंध
➥ Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
➦ Essay on tree in Marathi
➥ माझी शाळा निबंध मराठी
➦ My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
➥ जर मी ढग असतो तर :

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *