Godhadi Che Manogat Essay
निबंध/ Essay/Nibandh

Godhadi Che Manogat Essay | गोधडी ची आत्मकथा निबंध | Best Essay

Godhadi Che Manogat Essay – गोधडी ची आत्मकथा निबंध

नमस्कार मित्रांनो आज आपण गोधडी ची आत्मकथा (Godhadi Che Manogat Essay) निबंध पाहणार आहोत.

याच निबंधासाठी विचारले जाणारे निबंधाचे विषय :
– गोधडी ची आत्मकथा, मी गोधडी बोलते (Mi Godadi Bolate),
– गोधडीचे आत्मवृत्त (Godhadiche Atmavrutta),
– गोधडीचे आत्मकथा (Godhadi chi Atmakatha Nibandh in Marathi),
– गोधडीचे आत्मकथन मराठी निबंध (Godhadiche Atmakathan)
– गोधडीचे मनोगत (Godhadi che Manogat Marathi Essay)
– गोधडीचे मनोगत मराठी निबंध (Autobiography of Godhadi in Marathi)
– Godhadi Che Manogat Essay

चला सुरु करूया निबंध ! (Godhadi Che Manogat Essay)

– माझे गाव हे एक खूप छोटे आणि शहरापासून खूप दूर आहे. माझ्या प्राथमिक शिक्षण नंतर, पुढील शिक्षणासाठी मी माझ्या मावशीकडे आलो. मावशीकडे जाताना आईने मला बऱ्याच वस्तू दिल्या होत्या. तसे मावशीकडे ते घेऊन जाणे इतके जरुरीचे नव्हते पण, आई देते म्हटल्यावर नको बळावत नव्हते. त्या सर्वात खास होती ती म्हणजे आईने माझ्यासाठी शिवलेली गोधडी. अरे आपल्या गावापेक्षा मावशी कडे जास्त थंडी असते, म्हणून घेऊन जा ही, आईचा आवाज भावुक झाला होता.

ती गोधडी घेऊन मी, मावशी कडे झोपलो असता, जरासा डोळा लागतो नी लागतो काय,मला एक आवाज आला ‘काय मित्रा मस्त झोपला’
मी दचकचतच उठलो, इकडे-तिकडे भीतीने पाहू लागलो, तितक्यात पुन्हा आवाज आला, अरे वेड्या तिकडे काय पाहतोस बघतोस गोधडी बोलते आहे. तुझी गोधडी, आईने दिलेली.

गोधडीचा आवाज ऐकून मला नवल वाटले, लगेच ती माझ्याशी गप्पा मारू लागली. गोधडी मला म्हणाली, “मला तुझा फार राग येतो”. तु थंडीच्या दिवसात माझ्यामुळे मस्त उब घेऊन झोपी जातोस, पण थंडी संपली की तू मला दूर सारतो. का रे, तुला माझी आठवण फक्त थंडीच्या वेळीच येते? इतर ऋतूमध्ये तु माझ्याकडे पहात सुद्धा नाहीस, असे केल्याने मला उदास वाटते.

तू लहान होता तेव्हा पासून मी तुझी थंडी पासून रक्षा करते, पण तू इकडे मावशी कडे आला तेव्हा तू मला एकदाही धुतले नाहीस. बघ ना केवढी धुळ बसली माझ्या अंगावर, बर जेव्हा माझं काम सरते तेव्हा तू मला कुठल्या पण कोपऱ्यात फेकून देतो. तेथे घाण असते, जळमटे असतात, उंदीर आणि कीटक असतात. त्यांच्यामुळे मी अजून खराब होत चालेले आहे. बघ माझ्या अंगावर किती भोके पडली आहेत. तू जेंव्हा मला एका कोपऱ्यात टाकतो, तेंव्हा माझा दम घुटतो.

आपल्या गावी असताना आई माझी नियमित काळजी घेत असे, मला नदी वर घेऊन जाऊन स्वच्छ धुवत असे. ऊन्हात कडक वाळवून मला संरक्षित करत असे. त्यामुळे मला कधीही त्रास झाला नाही, पण याकडे आल्या पासून मला खूप त्रास होतोय. म्हणूनच मी तुझ्याशी आज बोलायला आली आहे. गोधडीचा प्रश्न, मी तिची काळजी घ्या विषयीचा होता. क्षणात ती शांत झाली, मी मात्र गोधडी कडे बघू लागलो. गोधडी खूप वाईट अवस्थेत होती, हे मला कळले होते.

मी रात्रभर गोधडी चे शब्द आठवत कसा-बस झोपलो, पण सकाळी उठल्यावर पुन्हा गोधडी चे शब्द आठवू लागलो. मी लगेच गोधडी स्वच्छ धुवून घेतली, उन्हात चांगली वाळवून घेतली, आणि सुई धाग्याने ठीकही केली. गोधडी पूर्वीसारखी छान दिसू लागली होती. यापुढे मी तिची मनापासून काळजी घेईन असा मनाशी निश्चय केला आणि गोधडी व्यवस्थित ठेऊन दिली.

Read this : Best Essay on Mobile Utility | Uses of Mobile

तर तुम्हाला (Godhadi Che Manogat Essay), Godhadi Chi Atmakatha Essay in Marathi, or Godhadi che Manogat Nibandh in Marathi. हा मराठी निबंध आवडला असेल तर खाली कमेन्ट मध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि हा मराठी निबंध आपल्या मित्र-मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद !

Essay Topics List in Marathi, Hindi, and English:

Other Essays:

➥ Essay on My School in English
➦ मेरा विद्यालय पर निबंध
➥ Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
➦ Essay on tree in Marathi
➥ माझी शाळा निबंध मराठी
➦ My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
➥ जर मी ढग असतो तर :

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *