Mi Pakshi Zalo Tar Nibandh ! … | मी पक्षी झालो तर !
नमस्कार मुलांनो! आज आपण या लेखामध्ये मी पक्षी झालो तर हा निबंध पाहणार आहोत. निबंध पाठांतर करायचे नसतात. विषय कोणता आहे हे समजून, आपले विचार त्यात क्रमबद्ध पद्धतीने मांडायचे असतात. कधी तुमच्या माहितीसाठी मुद्दे दिलेले असतात. त्यांच्या आधारे निबंध कसा लिहायचा, त्यात काय अपेक्षित आहे आणि आपण निबंध लिहिताना कोणते मुद्दे लक्षात घ्यावयाचे आहेत हे आम्ही नीट समजावून सांगितले आहे (येथे क्लीक करा). चला तर पाहूया आजचा निबंध मी पक्षी झालो तर !…
Table of Contents
मी पक्षी झालो तर ! निबंध निबंध (२००+ शब्दात) :
(Mi Pakshi Zalo Tar Nibandh ! …)
डिसेम्बर चा महिना होता. थंडगार हवा सुटली होती. ख्रिसमस ची सुट्टी लागली होती. आम्ही सर्व त्या दिवशी पतंग उडविण्यासाठी गेलो होतो. वाऱ्यावर हेलकावणाऱ्या पतंग पाहून माझ्या मनात विचार आले, पतंगाप्रमाणे प्रमाणे मलाही आकाशात झेपावता आले तर! खरंच मी पक्षी झालो तर !….
काय मज्जा येईल. मनाला वाटले आले की आकाशात उंच उडावे. जेथे पाहिजे तेथे झटकन पोहोचावे. बस, रिक्षा, ट्रेन, कशाची काही आवश्यकताच नाही. आकाशात उंच भरारी मारता येईल. ढग, इंद्रधनुष्य अगदी जवळ जाऊन पाहता येतील. वरून पाहताना जमीन किती छान दिसत असेल. समुद्रावर घिरट्या मारून समुद्रातील मासे उडत-उडत बघेन. झाडावर बसून फळे खाईन.
मी पक्षी झालो तर आकाशात उडणारे विमाना बरोबर स्पर्धा करीन. पक्षी झाल्याने मला खूप-खूप मजा तर येईल, पण पारध्यां पासून मला धोका असेल. माणसांमध्ये मला वावरता येणार नाही, शाळेत सुद्धा जाता येणार नाही. माझे मित्र मला खेळायला घेणार नाहीत. आईची सुद्धा मला शोधत राहील. मलाही आई शिवाय राहता येणार नाही. पक्ष्यांची एकी असते असे म्हणतात, त्यामुळे ते सारे मला, हाकलून देतील, मला मारतील. मी खाली पडलो तर मला प्रेमाने जवळ कोण घेईल. मला घरी सुद्धा जाता येणार नाही. मला माझ्या घरापासून, मित्रांपासून दूर राहावे लागेल. अरे बापरे! नको रे बाबा पक्षी होणे हा विचारच नको. आहे तेच जीवन चांगले आहे. तसही संत तुकाराम महाराज यांनी म्हटलेच आहे, “ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान”. जसे आहोत त्यातच समाधान मानून राहावे.
| Related: Importance Of Hard Work in Life | जीवनमें परिश्रम का महत्व (Read more…)
मी पक्षी झालो तर ! निबंध (३००+ शब्दात) :
(Mi Pakshi Zalo Tar Nibandh ! …)
मुद्दे : पक्षी व्हावे असे का वाटले, — मनात येणारे विचार — काय काय मजा करता येईल – पक्षी झाल्यावर होणारे तोटे — त्यातील धोके – नको ते पक्षी होणे.
डिसेम्बर चा महिना होता. थंडगार हवा सुटली होती. ख्रिसमस ची ७ दिवस सुट्टी लागली होती. आम्ही सर्व त्या दिवशी पतंग उडविण्यासाठी गेलो होतो. वाऱ्यावर हेलकावणाऱ्या पतंग पाहून माझ्या मनात विचार आले, पतंगाप्रमाणे प्रमाणे मलाही आकाशात झेपावता आले तर! खरंच मी पक्षी झालो तर !….
काय मज्जा येईल. मनाला वाटले आले की आकाशात उंच उडावे, मनाला वाटेल ते ते चटकन करावे. जेथे पाहिजे तेथे झटकन पोहोचावे. बस, रिक्षा, ट्रेन, कशाची काही आवश्यकताच नाही. आकाशात उंच भरारी मारता येईल. ढग, इंद्रधनुष्य अगदी जवळ जाऊन पाहता येतील. जमिनीवरील खूप गमतीजमती वरून पाहता येतील. वरून पाहताना जमीन किती छान दिसत असेल. समुद्रावर घिरट्या मारून समुद्रातील मासे उडत-उडत बघेन. झाडावर बसून फळे खाईन. जंगलात या झाडावर फिरत राहीन. आता मला जंगलात फिरताना वाघाची भीती वाटणार नाही. कारण हे प्राणी मला पकडू शकणार नाहीत. इतर पक्षांच्या, झाडांवरील घरट्यात मला डोकावून पाहता येईल.
.
मी पक्षी झालो तर आकाशात उडणारे विमाना बरोबर स्पर्धा करीन. क्षणात लांब लांब फिरून येईन. पक्षी झाल्याने मला खूप-खूप मजा तर येईल, पण पारध्यां पासून मला धोका असेल. माणसांमध्ये मला वावरता येणार नाही, शाळेत सुद्धा मला जाता येणार नाही. मी पक्षी झाल्याने मला कोणी ओळखणार नाही, माझे मित्र मला खेळायला घेणार नाहीत. आईची सुद्धा मला शोधताना दमछाक होईल. मलाही आई शिवाय राहता येणार नाही. इतर पक्षी मला त्यांच्या जवळ येऊ देणार नाहीत, कारण मी त्यांच्यासाठी इतर पक्ष्यांपेक्षा वेगळा असेन.
पक्ष्यांची एकी असते असे म्हणतात, त्यामुळे ते सारे मला, हाकलून देतील, मला मारतील. मी खाली पडलो तर मला प्रेमाने जवळ कोण घेईल, रात्री मला आईची आठवण अली तर मी कुठे जाऊ. मला घरी सुद्धा जाता येणार नाही. मला माझ्या घरापासून लांब राहावे लागेल, मित्रांपासून दूर राहावे लागेल. अरे बापरे माझे तर खूप नुकसान होईल. नको रे बाबा पक्षी होणे हा विचारच नको. आहे तेच जीवन चांगले आहे. मी खुप आनंदी आहे. तसही संत तुकाराम महाराज यांनी म्हटलेच आहे, “ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान”. जसे आहोत त्यातच समाधान मानून राहावे.
| Related: |Related: Vidyarthi Ka Kartavya Essay in Hindi | विद्यार्थी का कर्तव्य पर निबंध (Read more…)
Other Essays:
Essay on My School in English
मेरा विद्यालय पर निबंध
Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
Essay on tree in Marathi
माझी शाळा निबंध मराठी
My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
जर मी ढग असतो तर :
If I Became The Prime Minister -Marathi Essay
इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech
May you can get the subject for essay writing like mi pakshi zalo tar nibandh, mi pakshi zalo tar marathi nibandh, mi pakshi zalo tar essay in marathi, mi pakshi zalo tar essay in marathi language, mi pakshi zalo tar in marathi language, mi pakshi zalo tar nibandh marathi madhe.