Mi Pahilela Apghat Essay in Marathi | मी पाहिलेला अपघात :
नमस्कार मुलांनो! आज आपण या लेखामध्ये “मी पाहिलेला अपघात” Mi Pahilela Apghat Essay in Marathi, हा निबंध पाहणार आहोत. निबंध म्हणजे विषय समजून, आपले विचार क्रमबद्ध पद्धतीने मांडणे. तुमच्या माहितीसाठी मुद्दे दिलेले असतात. त्यांच्या आधारे निबंध कसा लिहायचा, त्यात काय अपेक्षित आहे आणि आपण निबंध लिहिताना कोणते मुद्दे लक्षात घ्यावयाचे आहेत हे आम्ही नीट समजावून सांगितले आहे (येथे क्लीक करा). चला तर पाहूया आजचा निबंध मी पाहिलेला अपघात (Mi Pahilela Apghat Essay in Marathi).
Mi pahilela apghat marathi essay, रस्त्यावरील अपघात प्रसंग लेखन, प्रसंग लेखन इयत्ता दहावी, प्रसंग लेखन मी पाहिलेला अपघात,
मुद्दे: सहलीला जाणे — गड चढणे — चढताना आलेली मजा —- अचानक एका विद्यार्थ्याचे दरीत कोसळणे — झाडावर अडकणे —- त्याला वाचविण्यासाठी वाटाड्याने केलेले प्रयत्न —- मित्रांचे सहकार्य — दोरीला धरुन वर येणे — सर्वांना झालेला आनंद — मनात आलेले विचार.
Table of Contents
मी पाहिलेला अपघात – मराठी निबंध (२००+ शब्दात)
मागच्या महिन्यात आमच्या गावातील आम्ही मित्र-मैत्रिण मिळून एकूण १५ जण राजगडावर सहलीला जाण्यासाठी निघालो होतो. आमच्या सोबत शेजारील गावातला एका वाटाड्या, त्यांच्या एक कुत्रा होता. थंडीचे दिवस होते सकाळच्या गार वातावरणात, गडावर चढायला सुरुवात केली. गड तास सोपा नव्हता. रामुकाकांचा कुत्रा खूप हुशार होता. जिथे चुकीची वाट गेली असेल तिकडे तो जातच नव्हता, त्यावर रामुकाका अंदाज घेत आणि आम्हाला मार्गदर्शन करत.
अचानक कुणाचा धक्का लागला की आणखी काही झालं कळलं नाही. एका वळणावर चेतनचा पाय घसरला आणि तो खाली दरीत कोसळला. मयंकने त्याला हात देण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. चेतन निसटून खाली गेला होता. आम्ही खाली बघितलं, तर तो एक दगडाच्या जागेत अडकला होता. त्याला पाय रोवून धरायला जागा होती, तो उभाही राहू शकत होता. पण तो तेथून वर चढू शकत नव्हता. वाटाड्या काकांनी त्याला ओरडून धीर दिला. त्यांच्या कमरेला एक दोरी होती, ती त्यांनी खाली सोडली पण ती अर्धा पर्यंतच गेली. आता काय करणार शेवटी आमच्यातल्या मुलींचे दुपट्टे घेतले सगळ्यांची मिळून एक मजबूत दोरी बनवली. दोरीला बांधून ती खाली सोडली. दोरी चेतन पर्यंत पोहचली, रामुकाकांनी त्याला सांगितलं की, दोरीला धरून, डोंगराला पाय लावून सावकाश वर चढ. अजिबात घाबरू नकोस. हळूहळू चेतन वर आला.
आम्हा सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आज त्या म्हणीचा अर्थ काळाला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती! हा अपघात आमच्या कायमचा लक्षात राहिल
मी पाहिलेला अपघात – मराठी निबंध (३००+ शब्दात)
मागच्या महिन्यात आमच्या गावातील, आम्ही मित्र-मैत्रिण मिळून एकूण १५ जण राजगडावर सहलीला जाण्यासाठी निघालो होतो. आम्हाला राजगड चालूनच जायचं होतं म्हणून खालच्या गावातला एका वाटाड्या सोबत घेतला होता. त्यांच्या बरोबर त्यांचा एक कुत्रा ही होता. थंडीचे दिवस होते सकाळच्या गार वातावरणात, गडावर चढायला सुरुवात केली. छान गार हवा होती, सर्वात उत्साह होता. मजेत, हसत, गाणी म्हणत गड चढत होतो. गड तास सोपा नव्हता. रामुकाकांचा कुत्रा खूप हुशार होता. जिथे चुकीची वाट गेली असेल तिकडे तो जातच नव्हता, त्यावर रामुकाका अंदाज घेत आणि आम्हाला मार्गदर्शन करत. अर्ध्यापेक्षा जास्त गड चढून झाला होता. वाटेत थोडा आराम केला, छान थंडगार लिंबू पाणी प्यायला, आणि पुन्हा एकदा गड चढायला सुरुवात केली.
अचानक कुणाचा धक्का लागला की आणखी काही झालं कळलं नाही. एका वळणावर चेतनचा पाय घसरला आणि तो खाली दरीत कोसळला. मयंकने त्याला हात देण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. चेतन निसटून खाली गेला होता. आम्ही खाली बघितलं, तर तो एक दगडाच्या जागेत अडकला होता. त्याला पाय रोवून धरायला जागा होती, तो उभाही राहू शकत होता. पण तो तेथून वर चढू शकत नव्हता. येथून जर तो खाली निसटला असता तर मात्र पूर्णपणे दरीच्या तळाशी गेला असता. त्याचं काय झालं असतं याची कल्पनाही करू शकत नाही. वाटाड्या काकांनी त्याला ओरडून धीर दिला. सांगितलं तुला काही करून आम्ही वर आणू काळजी करू नकोस. त्यांच्या कमरेला एक दोरी होती, ती त्यांनी खाली सोडली पण ती अर्धा पर्यंतच गेली.
.
आता काय करणार शेवटी आमच्यातल्या मुलींचे दुपट्टे घेतले सगळ्यांची मिळून एक मजबूत दोरी बनवली. दोरीला बांधून ती खाली सोडली. दोरी चेतन पर्यंत पोहचली, रामुकाकांनी त्याला सांगितलं की, दोरीला धरून, डोंगराला पाय लावून सावकाश वर चढ. अजिबात घाबरू नकोस, खाली किंवा मागे बघू नकोस, सगळ्यांनी त्याला धीर दिला. हळूहळू चेतन वर आला.
आम्हा सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. आज त्या म्हणीचा अर्थ काळाला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती! त्यानंतरचा आमचा प्रवास खरंच छान पार पडला. पण तो अपघात आमच्या कायमचा लक्षात राहिल.
Other Essays:
➥ Essay on My School in English
➦ मेरा विद्यालय पर निबंध
➥ Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
➦ Essay on tree in Marathi
➥ माझी शाळा निबंध मराठी
➦ My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
➥ जर मी ढग असतो तर :
➦ If I Became The Prime Minister -Marathi Essay
इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech