my favourite festival in marathi
निबंध/ Essay/Nibandh

Essay on my favourite festival in Marathi |निबंध

माझा आवडता सण गणपती – (२०० -शब्द): Ganapati San | Ganpati San | Utsav

Essay on my favourite festival in Marathi – Ganpati| माझा आवडता सण गणपती, Ganesh chaturthi, maza avadta san, maza avadta san ganesh chaturthi in marathi, गणेश उत्सव मराठी निबंध, माझा आवडता सण गणेश उत्सव निबंध, लाडक्या गणपती बाप्पा वर निबंध, Marathi Essay on “My favorite festival is Ganesh Chaturthi या सर्व विषयांवर हा नबंध लिहिता येईल. 

१) माझा आवडता सण गणपती – (१०० -शब्द) : (Go Top)

गणपती हा सण भाद्रपद महिन्यात येतो. पारतंत्र्याच्या काळात, लोकांनी एकत्र येण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव हा सण सुरु केला. आपापल्या श्रद्धे नुसार प्रत्येक जण हा सण साजरा करतात.

घरी बाप्पा येणार म्हणून घर सजवलं जातं, बाप्पाच्या बैठकीसाठी मखर (आरास) बनवली जाते. घरातील सर्वजण मिळून याची तयारी करतात, रंगीबेरंगी रोषणाईने मखराची सजावट केली जाते.

घरातील सर्वजण मिळून, आम्ही बाप्पाची मूर्ती आणायला जातो, बाप्पाच्या मूर्तीची स्थापना झाल्यावर, आम्ही सारेजण गणपतीची आरती करतो. प्रसादमध्ये उकडीचे मोदक खातो, जे मला फार आवडतात. गणपतीच्या दिवसात जागरण करतो, नाचतो, गातो, मस्ती करतो आणि श्रद्धेने पूजा करतो.

अखेर बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी आम्ही सर्वजण जड अंतःकरणाने बाप्पाचे बाप्पाचा निरोप घेतो. सर्वकुटुंबा सोबत राहून साजरा केलेला हा सण मला खूप-खूप आवडतो.

| Related: Essay on School | माझी शाळा निबंध मराठी

२) माझा आवडता सण गणपती – (२०० -शब्द) : (Go Top)

गणपती हा सण भाद्रपद महिन्यात येतो. हा सण श्रद्धा आणि हौसेचा आहे. पारतंत्र्याच्या काळात, लोकांनी एकत्र येण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव हा सण सुरु केला. आज ह्या सणाचे स्वरूप खूप मोठे झाले आहे. बरेच जण आपापल्या श्रद्धेनुसार दीड, पाच, सात कींवा दहा दिवस हा सण साजरा करतात.

बाप्पाच्या आगमनाची तयारी तर खूपच मजेची असते. घरी बाप्पा येणार म्हणून घर सजवलं जातं, बाप्पाच्या बैठकीसाठी मखर (आरास) बनवली जाते. घरातील सर्वजण मिळून याची तयारी करतो, दरवर्षी नवीन संकल्पना, नव्या साधनांनी, हे मखर बनवले जाते, त्याची रंगीबेरंगी रोषणाईने सजावट केली जाते. याच संकल्पने मार्फत पाणी-वाचावा, झाडे-वाचावा, परिसर स्वच्छ करा असे संदेश दिले जातात.

घरातील सर्वजण मिळून बाप्पाची मूर्ती आणायला जातो, तेंव्हाही खूप मजा येते. आमच्या घरी गणपती बाप्पा सात दिवसांसाठी येतात. बाप्पाच्या मूर्तीची स्थापना झाल्यावर, आम्ही सारेजण मिळून गणपतीची आरती करतो. प्रसादमध्ये उकडीचे मोदक खातो, जे मला फार आवडतात. गणपतीच्या दिवसात जागरणही करतात. नाचतात, गातात, विनोद, धमाल, मस्ती करतो. बाप्पाची दिवसातून चार वेळा आरती करतो. सात दिवस श्रद्धेने पूजा करतो.

अखेर तो दिवस येतो ज्याची आम्ही कधीच वाट पाहत नाही. बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस. यादिवशी आम्ही सर्वजण जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप देतो. काहीजण ढोलताशाच्या गजरात बाप्पाचे विसर्जन करतात. मुबंईत तर हा सोहळा पाहण्यासारखा असतो. सर्वकुटुंबा सोबत राहून साजरा केलेला हा सण खरंच खूप-खूप आवडतो.

|Related: Essay on tree in Marathi | निबंध माझे आवडते झाड

Other Essays:

➥ Essay on My School in English
➦ मेरा विद्यालय पर निबंध
➥ Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
➦ Essay on tree in Marathi
➥ माझी शाळा निबंध मराठी
➦ My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
➥ जर मी ढग असतो तर :
➦ If I Became The Prime Minister -Marathi Essay

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech

Essay on my favourite festival in Marathi :

my favourite festival ganpati in marathi, माझा आवडता सण – गणपती, गणेश चतुर्थी, गणपती उत्सव निबंध मराठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *