Jar Mi Pantpradhan Zalotar
निबंध/ Essay/Nibandh

If I Became The Prime Minister -Marathi Essay | मी पंतप्रधान झालो तर…

If I Became The Prime Minister -Marathi essay | मी पंतप्रधान झालो तर मराठी निबंध | Me Pantpradhan Zalo Tar Marathi Nibandh :

माहिती : (Marathi Essay)

नमस्कार मित्रांनो आज आपण Smart School Infolips च्या या लेखात वाचणार आहोत एक मराठी निबंध, जर मी पंतप्रधान झाले/ झालो तर. एक मराठी वर्णनात्मक निबंध. अश्या प्रकारच्या निबंधात आपणास बरेच वेगवेगळे विषय दिले जाऊ शकतात. या विषयात आपणास आपली कल्पनाशक्ती वापरण्यास खूप वाव असतो. आपण आत्तापर्यंत मिळविले ज्ञान, वाचलेली माहितीच्या आधारे, हे विषय सहज हाताळू शकतो. अर्थात, प्रत्येकाच्या विचारानुसार, या विषयाच्या निबंधात विविधता असू शकते. निबंध लिहताना, सुरुवात, गाभा, आणि शेवट, मुद्देसूद आणि रंजक असावा. योजक आणि अर्थपूर्ण अशा अलंकारिक शब्दांचा उपयोग असावा, ज्यामुळे आपल्या निबंधाचे परिणाम करता वाढते. असे निबंध लिहून आपण आपली लेखन शैली विस्तृत करू शकतो.

याच अर्थाच्या निबंधासाठी, खालील प्रमाणे विषय दिले जाऊ शकतात, जसे (Options in Marathi Essay)
मी पंतप्रधान झाल्यास (Mi Pantpradhan Zalyas), मी पंतप्रधान झाले तर (Mi Pantpradhan Zale),
जर मी पंतप्रधान झाले तर निबंध (Jar Mi Pantpradhan Zale Tar Niband),
मी पंतप्रधान झालो तर या विषयावर निबंध (Mi Pantpradhan Zalo Tar Ya Vishayavar Niband)
प्रधानमंत्री झालो तर मराठी निबंध (Pantpradhan zalo tar Marathi Nibandh)

मी पंतप्रधान झालो तर मराठी निबंध (२००+ शब्द):

एक दिवस मी विचार करत होतो, की खरंच मी पंतप्रधान झालो तर…” वाढत्या भ्रष्टाचारात जर मला असे सर्वोच्च अधिकार मिळाले, तर मी या भारत देशाचा काया पालट करू शकतो. मी नक्की काही चांगला बदल करू शकतो.

जर मी पंतप्रधान झालो तर, मी स्वतःला भारतीय जनतेचा सेवक मानेन. हा अधिकार मला जनतेने दिला आहे, त्यांचा मान, त्यांनी दिलेली जबाबदारी सदैव स्मरणात ठेवीन. आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा गैर-वापर होणार नाही याची काळजी घेईन. जनतेने दिलेली जबाबदारी ईमानदारीने पार पाडीन.
सामान्य माणूस मात्र भ्रष्टाचारात होरपळत आहे. मी सर्व प्रथम भ्रष्ठाचारावर घाव घालीन. जे कोणी दोषी असतील, त्यांना जनतेकडून शिक्षा केली जाईल. असे कडक शासनाचे नियम बनविले जातील, की पुन्हा कोणी भ्रष्ट होण्यास प्रवृत्त होणार नाही.

सामान्य माणसाला सुखी करन्यासाठी, कोणतेही नवनवीन धोरणे, योजना ठरवतांना व त्या अमलात आणताना, त्या-त्या विषयातील विद्वान व जाणकार व्यक्तींना त्यात सामील करेन. देश प्रेम आणि देश प्रगत याच गोष्टींना प्राधान्य देईन.

दशासमोर खुप सऱ्या समस्या आहेत, जसे शिक्षण, भ्रष्टाचार, बेकारी, बेरोजगारी, दारिद्र्. अशी परीस्थित निर्माण करते, चोरी-चकारी, लुटपाट, अत्याचार, खून-खराबा. अशा असंख्य समस्यांचे एकच मूळ कारण आहे लोकसंख्या. लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी, कडक कायदे तयार करीन, देशाचे प्रतीक चिन्ह राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत याचा मान हा प्रत्येक भारतीयाने राखलाच पाहिजे.

देशाचे राज्यकारभार पाहणे हा एक यज्ञ आहे. प्रत्येकाने या कामात हातभार लावला पाहिजे देशातील तळागाळातील सर्व स्तरातील निस्वार्थी, कार्यक्षम, सेवाभावी, कर्तव्यदक्ष कार्यकर्त्यांचा एक संघ तयार करीन. संपूर्ण जगाला प्रेमाचा आणि शांतीचा संदेश भारताकडून जाईल, यासाठी मी कटिबद्ध असेन.

मी पंतप्रधान झालो तर मराठी निबंध (३००+ शब्द):

एक दिवस मी विचार करत होतो, की खरंच मी पंतप्रधान झालो तर…” वाढत्या भ्रष्टाचारात जर मला असे सर्वोच्च अधिकार मिळाले, तर मी या भारत देशाचा काया पालट करू शकतो. मी नक्की काही चांगला बदल करू शकतो.
जर मी पंतप्रधान झालो तर, मी स्वतःला भारतीय जनतेचा सेवक मानेन. हा अधिकार मला जनतेने दिला आहे, त्यांचा मान, त्यांनी दिलेली जबाबदारी सदैव स्मरणात ठेवीन. आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा गैर-वापर होणार नाही याची निकराने काळजी घेईन. इतकंच काय, माझ्या मंत्री मंडळातील प्रत्येक सभासदास याची जाणीव करून देईन. जनतेने दिलेली जबाबदारी मोठ्या विश्वासाने आणि ईमानदारीने पार पाडीन. एक कमालीची शिस्त संपूर्ण मंत्री वर्गात, व्हावी यासाठी मी कटिबद्ध असेन.

आपल्या देशात सर्वत्र भ्रष्टाचार रुपी भस्मासुर बोकाळलाय. सामान्य माणूस मात्र यात होरपळत आहे. मी पंतप्रधान झालो की, सर्व प्रथम भ्रष्ठाचारावर घाव घालीन. जे कोणी दोषी असतील, त्यांना भर चौकात, जनतेकडून शिक्षा केली जाईल. असे कडक शासनाचे नियम बनविले जातील, की पुन्हा कोणी भ्रष्ट होण्यास प्रवृत्त होणार नाही. भ्रष्टाचाऱ्यास तात्काळ शिक्षा देऊन, विषय तेथेच बंद. सामान्य माणसाला सुखी करन्यासाठी, मी कटिबद्ध असेन. जर सामान्य माणसाचा विकास झाला, जर त्याचे उपन्न वाढले तरच, देशाचा विकास होईल. देशाच्या कल्याणासाठी कोणतेही नवनवीन धोरणे, योजना ठरवतांना व त्या अमलात आणताना, त्या-त्या विषयातील विद्वान व जाणकार व्यक्तींना त्यात सामील करेन. देश प्रेम आणि देश प्रगत याच गोष्टींना प्राधान्य देईन.

.

दशासमोर खुप सऱ्या समस्या आहेत, जसे शिक्षण, भ्रष्टाचार, बेकारी, बेरोजगारी, दारिद्र्. अशी परीस्थित निर्माण करते, चोरी-चकारी, लुटपाट, अत्याचार, खून-खराबा. अशा असंख्य समस्यांचे एकच मूळ कारण आहे लोकसंख्या. मी पंतप्रधान झालो तर, लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी, कडक कायदे तयार करीन, त्यांचे काटेकोर पालन करेन. लोकांना लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व पटवून दिले जातील. देशाचे प्रतीक चिन्ह राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत याचा मान हा प्रत्येक भारतीयाने राखलाच पाहिजे. तसे ना केल्यास, त्याला दंडित केले जाईल. सर्वांसाठी हे सक्तीचे असेल.


देशाचे राज्यकारभार पाहणे हे सहज-सोपी गोष्ट नाही, हा एक यज्ञ आहे. प्रत्येकाने या कामात हातभार लावला पाहिजे त्यासाठी मी पंतप्रधान या नात्याने देशातील तळागाळातील सर्व स्तरातील निस्वार्थी, कार्यक्षम, सेवाभावी, कर्तव्यदक्ष कार्यकर्त्यांचा एक संघ तयार करीन. जगातील इतर देशांसोबत भारताचे संबंध चांगले व्हावेत, संपूर्ण जगाला प्रेमाचा आणि शांतीचा संदेश भारताकडून जाईल, यासाठी मी कटिबद्ध असेन.

| Related : Health is Wealth Essay in Hindi | स्वास्थ्य ही संपत्ती है|

मी पंतप्रधान झालो तर मराठी निबंध (६००+ शब्द):

आपण शिक्षण घेत असताना, अनेक जण आपल्याला विचारत असतात, की तूला मोठा झाल्यावर काय व्हायचं आहे. मग कोणी सांगतो, डॉक्टर, इंजियर, कोणी शिक्षक आणि बरेच काही. एक दिवस काकांनी मला प्रश्न विचारला, जर तू पंतप्रधान झालास तर? त्या क्षणी मला काही सुचलं नाही. मी उत्तर ना देताच तसाच स्तब्ध राहिलो आणि विचार करू लागलो खरंच मी “मी पंतप्रधान झालो तर…” वाढत्या भ्रष्टाचारात जर मला हे सर्वोच्च अधिकार मिळाले, तर मी या भारत देशाचा काया पालट करू शकतो.

जर मी पंतप्रधान झालो तर, मी स्वतःला भारतीय जनतेचा सेवक मानेन. हा अधिकार मला जनतेने दिला आहे, त्यांचा मान, त्यांनी दिलेली जबाबदारी सदैव स्मरणात ठेवीन. आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा गैर-वापर, किंवा आपल्या कडून काही गैर-वर्तणूक होणार नाही याची निकराने काळजी घेईन. इतकंच काय, माझ्या मंत्री मंडळातील प्रत्येक सभासदास याची जाणीव करून देईन. जनतेने दिलेली जबाबदारी मोठ्या विश्वासाने आणि ईमानदारीने पार पाडीन. एक कमालीची शिस्त संपूर्ण मंत्री वर्गात, व्हावी यासाठी मी कटिबद्ध असेन.

आपल्या देशात सर्वत्र भ्रष्टाचार रुपी भस्मासुर इतका मुरलाय, की त्याचा अंतच दिसत नाही. सामान्य माणूस मात्र यात होरपळत आहे. सर्व नेते असेच म्हणत असतात कि, ही भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट केली पाहिजे, पण सुरवात कोणीच करत नाहीत. मी पंतप्रधान झालो की, सर्व प्रथम भ्रष्ठाचारावर घाव घालीन. जे कोणी दोषी असतील, त्यांना भर चौकात, जनतेकडून शिक्षा केली जाईल. असे कडक शासनाचे नियम बनविले जातील, की पुन्हा कोणी भ्रष्ट होण्यास प्रवृत्त होणार नाही. भ्रष्टाचाऱ्यास तात्काळ शिक्षा देऊन, विषय तेथेच बंद. लोकांना रोजगार निर्माण करून, त्यांची कमीत-कमी उत्पन्न समाधान कारक करून, भ्रष्टचार बंद करण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करिन.

.

|Related : Jaha Chah Wahan Raha Essay in Hindi | जहाँ चाह वहाँ राह :

“मी पंतप्रधान झालो तर’ सामान्य माणसाला सुखी करन्यासाठी, मी कटिबद्ध असेन. जर सामान्य माणसाचा विकास झाला, जर त्याचे उपन्न वाढले तरच, देशाचा विकास होईल. देशाच्या कल्याणासाठी कोणतेही नवनवीन धोरणे, योजना ठरवतांना व त्या अमलात आणताना, त्या-त्या विषयातील विद्वान व जाणकार व्यक्तींना त्यात सामील करेन. मी प्रत्येक मंत्र्याचे शिक्षण, अनुभव, व रुची लक्षात घेऊन, त्यांना योग्यच्या कार्याची जबाबदारी डेनिम. प्रत्येकात देशप्रेम व हिताचेच विचार राहतील, यासाठी वेळोवेळी त्यानं प्रोत्साहित करत राहीन. देश प्रेम आणि देश प्रगत याच गोष्टींना प्राधान्य देईन.

.

आपल्या दशासमोर सध्या खुप सऱ्या समस्या आहेत, जसे योग्य शिक्षण, शिक्षण क्षेत्रात खाजगी संस्थांचे वाढत चाललेले भ्रष्टाचार, शाळा कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेत होणारे घोटाले. शिक्षणाचा घसरत चाललेला दर्जा. देशात वाढत चाललेली बेकारी, बेरोजगारी, यामुळे दारिद्र्याचे वाढत चाललेले प्रमाण. अशी परीस्थित निर्माण करते, चोरी-चकारी, लुटपाट, अत्याचार, खून-खराबा. लोकांच्या स्वस्थ-आरोग्य विषयी घसरत चाललेले आलेख. अशा असंख्य समस्यांचे एकच मूळ कारण आहे आणि ते म्हणजे. प्रचंड प्रमाणात वाढत असलेली लोकसंख्या. मी पंतप्रधान झालो तर, लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी, कडक कायदे तयार करीन, त्यांचे काटेकोर पालन करेन. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींस कडक शासन केले जाईल. लोकांना लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व पटवून दिले जातील.

भारत देश हा अनेक भाषा, अनेक धर्मांनी नटलेला आहे. त्यामुळेच आपल्या देशाने धर्मनिरपेक्षता आणि सर्व धर्म समभाव हे तत्व स्वीकारलेले आहे. मी पंतप्रधान झालो तर या तत्वांना अधिक बळकट आणि सुधृढ करण्याचा प्रयत्न कारेन. देशाचे प्रतीक चिन्ह राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत याचा मान हा प्रत्येक भारतीयाने राखलाच पाहिजे. तसे ना केल्यास, त्याला दंडित केले जाईल. सर्वांसाठी हे सक्तीचे असेल. आपण आपल्या देशाचे मान ठेवला तरच, इतरांकडून भारतास मान मिळेल.

.

| Related : विज्ञान प्रदर्शनी में एक घंटा – हिंदी निबंध

देशाचे राज्यकारभार पाहणे हे सहज-सोपी गोष्ट नाही, हा एक यज्ञ आहे. प्रत्येकाने या कामात हातभार लावला पाहिजे त्यासाठी मी पंतप्रधान या नात्याने देशातील तळागाळातील सर्व स्तरातील निस्वार्थी, कार्यक्षम, सेवाभावी, कर्तव्यदक्ष कार्यकर्त्यांचा एक संघ तयार करीन. देशातील सामान्य जनतेचे प्रश्न समजण्यासाठी आणि त्यावर उपाय-योजना करण्यासाठी, या सेवाभावी संघटनांची मदत होईल. भारताला संपूर्ण विश्वात गौरवाचे व सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करेन. जगातील इतर देशांसोबत भारताचे संबंध चांगले व्हावेत, संपूर्ण जगाला प्रेमाचा आणि शांतीचा संदेश भारताकडून जाईल, यासाठी मी कटिबद्ध असेन.

धन्यवाद मित्रांनो, अशा करतो वरील निबंध तुम्हाला आवडला असेल. अश्याच आशयाचे निबंध लिहिण्यसाठी तुम्हाला याची नक्की मदत होईल.
तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असतील किंवा काही सुचवायचे असेल, काही बदल हवे असतील, किंवा आमच्या काही चुका असतील, तर कमेंट करून आमच्या निदर्शनास आणून द्या. तुमचा अभिप्राय महत्वाचा आहे, यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते.

Other Essays:

Essay on My School in English
मेरा विद्यालय पर निबंध
Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
Essay on tree in Marathi
माझी शाळा निबंध मराठी
My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
जर मी ढग असतो तर :

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *