my favourite festival
निबंध/ Essay/Nibandh

Essay on My Favourite Festival in Marathi | दिवाळी निबंध

Essay on my Favourite festival in Marathi | मराठी निबंध : माझा आवडता सण : Maza Aavadata San Diwali.

My

➤ माझा आवडता सण दिवाळी – (लहान मुलांसाठी)

Essay on my Favourite festival – Diwali in Marathi

दिवाळी हा आपला व वर्षातील सर्वात मोठा सण आहे.
दिवाळी हा प्रकाशाचा व आनंदाचा सण आहे.
दिवाळीत करंज्या, शंकरपाळ्या, चकल्या लाडू असे खाद्यपदार्थ करतात.
आम्ही घराला रंग लावून घर सजवतो.
घरा समोर कंदील लावतो आणि रांगोळी काढतो.
दिवाळीत फटाके वाजवून आनंदा साजरा करतात.
मुले भुई चक्र व फुलबाजे पेटवून आपला आनंद लुटतात.
दिवाळीत आम्हाला मुलांना शाळेला सुट्टी असते.
आम्हाला नवीन कपडे घालायला मिळतात.
असा हा मौजेचा आणि आनंदाचा दिवाळी सण मला खूप आवडतो.

➤ माझा आवडता सण दिवाळी – (२०० -शब्द)

१) माझा आवडता सण दिवाळी – (१०० -शब्द) : (Go Top)

Essay on my Favourite festival – Diwali in Marathi

दिवाळी हा सण अश्विन-कार्तिक महिन्यात येतो. दिवाळी हा प्रकाशाचा, उत्साहाचा व आनंदाचा सण आहे. प्रत्येक घराला नवे रंग लावतात, आकाश कंदील लावतात, वेगवेगळ्या लाईट्स ने सजवतात. घरासमोर रांगोळी काढतात. आजूबाजूचा परिसरही लाईट्स व मोठे-मोठे आकाश कंदील लावून सुशोभित करतात.

दिवाळीत घरोघरी लाडू, करंज्या, चिवडा, चकल्या असे अनेक प्रकारचे फराळ बनवतात. लहान-मोठ्यांना हे पदार्थ खूप आवडतात. दिवाळीत फटाके वाजवून आनंद साजरा करतात. लहान मुलेही भुईचक्र, फुलबाजे असे छोटे फटाके पेटवून आनंद साजरा करतात. दिवाळीत आम्हा मुलांच्या शाळेला सुट्टी असते, आम्हा मुलांची तर मौजच असते.

दिवाळीत सर्वजण नवीन कपडे घालतात, एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. दिवाळीत आपल्या माणसांची आठवण करून आनंदाने शुभेच्छा देतो. हेचतर या सणाचे वैशिष्टय आहे. म्हणूनच हा प्रकाशाचा सण मला खूप-खूप आवडतो.

Essay on School | माझी शाळा निबंध मराठी

२) माझा आवडता सण दिवाळी – (२०० -शब्द) : (Go Top)

Essay on my Favourite festival – Diwali in Marathi

दिवाळी हा सण अश्विन-कार्तिक महिन्यात येतो. दिवाळी हा प्रकाशाचा, उत्साहाचा व आनंदाचा सण आहे. हा सण धन-त्रयोदशी, नरक-चतुर्दशी, लक्ष्मी-पूजन, पडावा आणि भाऊबीज अशा पाच दिवसांचा असतो. दिवाळीत सर्वकडे लख-लखीत झालेलं दिसतो. प्रत्येक घराला नवे रंग लावतात, आकाश कंदील लावतात, वेगवेगळ्या लाईट्स ने सजवतात. घरासमोर रांगोळी काढतात, दारांना नव-नवे तोरण बांधतात. प्रत्येक घर अगदी नवी शाल पांघरून अगदी नवा झाल्या सारखा दिसत असतो. आजूबाजूचा परिसरही लाईट्स व मोठे-मोठे आकाश कंदील लावून सुशोभित करतात. रस्ते, हॉटेल्स, दुकाने, मॉल वेगवेगळ्या लाईट्सने सजविलेले असतात. प्रत्येकात नवीन उत्साह भरलेला असतो.

दिवाळीत घरोघरी लाडू, करंज्या, चिवडा, चकल्या, शंकरपाळ्या, अनारसे असे अनेक प्रकारचे फराळ बनवतात. लहान-मोठ्यांना हे पदार्थ खूप आवडतात. बरेच जण यासाठीच दिवाळीची वाट पाहत असतात. दिवाळीत फटाके वाजवून आनंद साजरा करतात. लहान मुलेही आपापल्या परीने भुईचक्र, फुलबाजे, लवंगी असे छोटे फटाके पेटवून आनंद साजरा करतात. आपल्या घरी पाहुणे येतात, कधी आम्ही मामाकडे जातो. आम्हा मुलांची तर मौजच असते.

दिवाळीत आम्हा मुलांच्या शाळेला सुट्टी असते, म्हणून अजून जास्त मजा येते. सर्वजण नवीन कपडे घालतात, एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात, कोणाला भेटकार्ड पाठवून शुभेच्छा देतात. आत्ता तर मेसेजेस आणि फोन करूनही शिभेच्छा दिल्या जातात. अगदी सातासमुद्रा पारही आपल्या माणसांची आठवण करून आनंदाने शुभेच्छा देतो. हेचतर या सणाचे वैशिष्टय आहे. एकमेकांचे सुख-दुःख, हेवे-दावे विसरून, हा आनंद उत्सव साजरा करतात. सर्व वातावरणच आनंदित आणि उत्साहित झालेलं असतं. म्हणूनच हा प्रकाशाचा सण मला खूप-खूप आवडतो.

Essay on tree in Marathi | निबंध माझे आवडते झाड

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार

Essay on my favourite festival :

my favourite festival, essay on my favourite festival, my favourite festival diwali essay, माझा आवडता सण दिवाळी, माझा आवडता सण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *