Essay On My Favourite Tree
निबंध/ Essay/Nibandh

Essay On My Favourite Tree in Marathi | निबंध माझे आवडते झाड | Best Marathi Essays #1

Essay On My Favourite Tree | निबंध माझे आवडते झाड : निबंध मराठीत

Question Can be Asked that Essay On My Favourite Tree – Mango, Essay On My Favourite Tree – Coconut, My Favourite Mango Tree like.

१) माझे आवडते झाड (आंबा) : Maze Avadte Zad Essay in Marathi

२) माझे आवडते झाड (नारळ) – Essay On My Favourite Tree

१) माझे आवडते झाड (आंबा) : (Go Top) – Essay On My Favourite Tree

तसे तर मला सर्वच झाडे आवडतात, पण तरीही त्यातील आंब्याचे झाड विशेष आवडते. हे झाड कसे बहरलेले असते. त्याच्या सावलीत वाटसरूंना विसावा घेता येतो, लांब-मोठ्या पानांमुळे त्याच्याखाली हवाही अधिक थंड असते. आंब्याच्या पानांना छान सुगंध असतो. शुभकार्याच्या वेळी आंब्याच्या पानांना खूप महत्व आहे. मंगल प्रसंगी याचे तोरण करून दरवाज्यास बांधतात. देवासमोर ठेवायच्या घटावरही आंब्याची पाने ठेवतात. आंब्याच्या झाडाला मोहर आलाकी त्याचा सुगंध सर्वदूर पसरतो.

आंब्याच्या झाडापासून मिळणाऱ्या आंब्याचे तर अजून जास्त उपयोग आहेत. आंब्याच्या कैरांचे पन्हे खूप गुणकारी असते. तसेच कैरीचे लोणचे, कैरीची चटणी खूप-रुचकर लागते. लिहताना तोंडाला पाणी सुटले. या सर्वांचा शिरोमणी म्हणजे. पिकलेला-रसाळ-गोड-सोनेरी आंबा. जितका खावा तितका थोडाच वाटतो. म्हणूनच तर आंब्याला फळांचा राजा म्हणतात. यापासून आंब्याचा रस, आंबापाळी, मुरंबा असे खाद्य बनवून, इतर ऋतूतही आंब्याचा आस्वाद घेता येतो. इतके गुणकारी व चविष्ट फळ देणारे आंब्याचे झाड खरंच मला खूप-खूप आवडते.

Samas in marathi | समास व समासाचे प्रकार

२) माझे आवडते झाड (नारळ) (Go Top)

तसे तर मला सर्वच झाडे आवडतात, पण तरीही त्यातील नारळाचे झाड हे त्याच्या विशेष गुणांमुळे जास्त आवडते. हे झाड उंचच-उंच वाढलेले असते. त्याच्या झावळ्यां पासून छोट्या झोपड्यांचे छतही बनवले जाते. झावळ्यांच्या कडक काठ्यांपासून केरसुणी बनवतात. झावळ्यांच्या पात्यांपासून टोपल्या, सूप, शोभेच्या वस्तू व इतरही बरेच काही बनविता येते.

नारळीच्या झाडापासून मिळणाऱ्या नारळचेही खूप उपयोगाचे असते. हिंदू संस्कृतीत प्रत्येक शुभकार्यात नारळ हे महत्वाचे असते. नारळ स्वयंपाक घरात तर खूप उपयोगी असते. कोकणात सर्वच भाज्यांमध्ये नारळ हे असतेच. नारळाची चटणी, नारळाची सोलकढी तर खूपच रुचकर व गुणकारी असते. नारळाची चिक्की, नारळाचे पाक असेच बरेच पदार्थ बनविता येतात. आणि नारळ आपल्याला सर्वच ऋतुंमध्य उपलब्ध असतो.

अश्याप्रकारे झाडाच्या सर्वच भागाचे उपयोग होत असणारे हे कल्पवृक्षाचे झाड मला खूप-खूप आवडते.

Animals and their homes in Marathi| पशुपक्ष्यांची घरे 

Essay on tree in Marathi

Essay on tree in Marathi | निबंध माझे आवडते झाड: my favourite tree mango essay in marathi, my favourite tree essay in hindi, my favourite tree, essay on my favourite mango tree in मराठी, my favourite tree mango, essay on my favourite tree in marathi, essay on save trees in marathi language.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *