निबंध/ Essay/Nibandh

Essay on School | माझी शाळा निबंध मराठी

Essay on School easy , माझी शाळा निबंध मराठी essay on my school :

१) माझी शाळा (१०० शब्द)

२) माझी शाळा (२०० शब्द)

१) माझी शाळा (१०० शब्द) : (Go Top)

माझ्या शाळेचे नाव विद्या प्रसारक हायस्कूल असे आहे. माझ्या शाळेची इमारत तीन मजल्याची आहे. प्रत्येक मजल्यावर दहा-दहा वर्ग आहेत. प्रत्येक वर्गातील वातावरण नेहमी प्रकाशित असते.

माझ्या शाळेचे मोठे पटांगण आहे. मधल्या सुट्टीत कींवा खेळाच्या तासाला आम्ही तेथे खेळतो. येथेच माझ्या शाळेचे स्नेहसंमेलन, वार्षिक कार्यक्रम आणि झेंडावंदनाचे कार्यक्रम होतात. माझ्या शाळेत मोठे ग्रंथालयही आहे. वाचनासाठी स्वतंत्र जागाही आहे. मुलांना बचतीची सवय लागावी म्हणून शाळेत ‘विद्यार्थी बँक’ ही आहे. नियमित अभ्यासा व्यतिरिक्त इतर स्पर्धा परीक्षाही होतात व त्याची तयारीही करवून घेतात.

शाळेतील सर्वच शिक्षक आम्हांला चांगले शिकवतात. म्हणून तर आम्हाला शाळेचा कधीच कंटाळा वाटत नाही. उलट मोठ्या सुट्टीतही शाळेची आठवण येते. अशी माझी शाळा मला खूप-खूप प्रिय आहे.

Maza Avadta rutu Marathi Nibandh – पावसाळा

२) माझी शाळा (२०० शब्द): (Go Top)

माझ्या शाळेचे नाव विद्या प्रसारक हायस्कूल असे आहे. माझ्या शाळेची इमारत तीन मजल्याची असून सुरेख आणि आकर्षक आहे. प्रत्येक मजल्यावर दहा-दहा वर्ग आहेत. वर्गांची रचनाही खूप सूर्यप्रकाश आणि सतत हवा खेळती राहील अशीच आहे. त्यासाठी मोठ-मोठ्या खिडक्या आणि रुंद दरवाजे आहेत. वर्गातील वातावरण नेहमी प्रकाशित असते.

माझ्या शाळेचे मोठे पटांगण आहे. मधल्या सुट्टीत कींवा खेळाच्या तासाला आम्ही तेथे खेळतो. येथेच माझ्या शाळेचे स्नेहसंमेलन, वार्षिक कार्यक्रम आणि झेंडावंदनाचे कार्यक्रम होतात. झेंडावंदनाच्या दिवशी कवायत व इतर सांस्कृतिक कार्यक्रम ही होतात. खूप धमाल असते त्यादिवशी.

या शाळेचे मोठे ग्रंथालयही आहे. वाचनासाठी स्वतंत्र जागाही आहे. आम्हाला ६ दिवसांच्या मुदतीवर काही पुस्तक वाचण्यासाठी घरी घेऊन येण्यासही सुविधा आहे. जे आमच्यासाठी खूप चांगले आहे. मुलांना बचतीची सवय लागावी म्हणून शाळेत ‘विद्यार्थी बँक’ ही आहे, जेथे आम्ही १ रुपया पासून १०० रुपया पर्यंत जमा करू शकतो, व हवे असेल तेंव्हा ते काढूही शकतो. हितर अनोखी आणि खूप चांगली सुविधा शाळेने आमच्यासाठी केली आहे. नियमित अभ्यासा व्यतिरिक्त इतर स्पर्धा परीक्षाही होतात व त्याची तयारीही करवून घेतात.

माझ्या शाळेतील सर्वच शिक्षक आम्हांला चांगले तर शिकवतातच पण चांगले संस्कार ही घडवितात. शाळेतील इतर कर्मचारी ही खूप प्रेमाची वागणूक देतात. म्हणून तर आम्हाला शाळेचा कधीच कंटाळा वाटत नाही. उलट दोन दिवसापेक्षा जास्त सुट्टी असली की शाळेची आठवण येते. अशी माझी शाळा मला खूप-खूप प्रिय आहे.

सर्वनामाचे प्रकार : सर्वनामाचे मुख्य सहा प्रकार आहेत. १] पुरुषवाचक सर्वनाम … अधिक जाणून घ्या…

Essay on School | माझी शाळा निबंध मराठी

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार

essay in marathi language on my school, essay on my school picnic in marathi, essay on school picnic in marathi, essay on first day of school in marathi, shortessay on school in marathi, ,

My School Essay In marathi, माझी शाळा वर निबंध, माझी शाळा निबंध मराठी इयत्ता पाचवी, माझी शाळा निबंध मराठी इयत्ता आठवी, my school essay in english, माझी शाळा निबंध विकिपीडिया, माझी शाळा भाषण,माझी शाळा निबंध इंग्रजी, माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *