Conjunction in Marathi (उभयान्वयी अव्यय) : Ubhayanwayi avyay mhanaje kay.
उभयान्वयी अव्यय : ज्या शब्दाव्दारे वाक्यातील दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांचा संबंध जोडला जातो अश्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदा. : म्हणून, आणि, किंवा, अन, पण, व, वा इ.
➥ राजेश कथा व कादंबरी वाचतो.
➦ तू खो-खो खेळ आणि मी लंगडी खेळतो.
➥ विनय दिसायला चांगला आहे, पण विश्वासू नाही.
➤ वरील वाक्यात “व“, “आणि” आणि “पण” ही उभयान्वयी अव्यय आहेत.
Table of Contents
उभयान्वयी अव्ययाचे प्रकार :
उभायान्वयी अव्ययाचे दोन प्रकार पडतात.
अ) समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय
आ) असमानत्वदर्शक/ गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय
➤ चला प्रत्येक प्रकार तपशीलवार पाहू.
अ) समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय :
ज्या उभयान्वयी अव्ययाने समान दर्जाची दोन स्वतंत्र वाक्य जोडली जातत त्या उभयान्वयी अव्ययांना समानत्वदर्शक/ प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
➽ समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचे चार उपप्रकार पडतात.
१) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय :
ज्या उभयान्वयी मुळे पहिल्या वाक्यात भर घालून दोन स्वतंत्र वाक्य जोडली जातात, अश्या अविकारी शब्दांना समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदा. : शि, व, अन्, आणि शिवाय, आणखी, न इ.
➥ विकास आला आणि वीज गेली.
➦ विजय शाळेत गेला व अभ्यास करू लागला.
➥ नंदाने आज डब्यात भाजी, पोळी अन् पापडही आणले.
➤ वरील वाक्यात “आणि”, “व” आणि “अन्” ही उभयान्वयी अव्यय आहेत.
२) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय :
ज्या उभयान्वयी शब्दामुळे वाक्यात दिलेल्या दोन गोष्टींपैकी एकाच गोष्टीला पसंती दर्शविली जाते अश्या अविकारी शब्दाला विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदा. : वा, अगर, की, किंवा, अथवा, इ.
➥ आज मैदानात किंवा घरी खेळू.
➦ तुला पुस्तक हवे कि वही?
➥ तुला चहा वा सरबत मिळेल.
➤ वरील वाक्यात “किंवा”, “कि” आणि “वा” ही उभयान्वयी अव्यय आहेत.
३) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय :
ज्या उभयान्वयी शब्दामुळे पहिल्या वाक्यामध्ये काही उणीव, कमतारता, दोष असल्याचा दर्शवितात अश्या अविकारी शब्दाला न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदा. : बाकी, पण, किंतु, परी, परंतु, तरीही इ.
➥ माधवने अभ्यास केला, तरीही नापास झाला.
➦ अखिल हुशार आहे, पण आळशी आहे.
➥ फुले उमलली किंतु उन्हामुळे कोमेजली.
➤ वरील वाक्यात “तरीही”, “पण” आणि “किंतु” ही उभयान्वयी अव्यय आहेत.
४) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय :
ज्या उभयान्वयी शब्दामुळे पहिल्या वाक्यातील घटनेच्या परिणाम हा दुसऱ्या वाक्यात दर्शवितात अश्या अविकारी शब्दाला परिणामबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदा. : सबब, यास्वत, म्हणून, तेव्हा, त्यामुळे, याकरिता, इ.
➥ ग्रीष्माने मनापासून अभ्यास केला म्हणून ती पास झाली.
➦ स्वरा नेहमी शांत राहते याकरिता तीची प्रशंसा होते.
➥ बागेत खूप फुले उमलली यास्तव पाहावयास गर्दी झाली.
➤ वरील वाक्यात “म्हणून”, “याकरिता” आणि “यास्तव” ही उभयान्वयी अव्यय आहेत.
Short notes on birds | पक्षी हा संतुलित पर्यावरणाचं ….
आ) असमानत्वदर्शक/ गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय :
ज्या उभयान्वयी अव्ययाने दोन असमान दर्जाची स्वतंत्र वाक्य, म्हणजे एक वाक्य प्रधान व दुसरे गौण वाक्य जोडली जातात त्या उभयान्वयी अव्ययांना असमानत्वदर्शक/ गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदा. :
➥ मानव परीक्षेत पास झाला कारण त्याने खूप अभ्यास केला.
➥ उच्च शिक्षण घ्यावे यास्तव तो पुण्यास गेला.
➽ असमानत्वदर्शक/ गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचे चार उपप्रकार पडतात.
१) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय :
ज्या उभयान्वयी अव्ययामुळे प्रधान वाक्याचे स्वरूप दुसऱ्या वाक्यात कळते अश्या अविकारी शब्दांना स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदा. : की, म्हणजे, म्हणून, जे इ.
➥ पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणजे परिभ्रमण करते.
➦ एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर.
➥ दहा वाजले कि मी झोपणार.
➤ वरील वाक्यात “म्हणजे”, “म्हणजे” आणि “कि” ही उभयान्वयी अव्यय आहेत.
२) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय :
ज्या उभयान्वयी अव्ययामुळे प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतु हा दुसऱ्या गौण वाक्यात कळतो अश्या अविकारी शब्दांना उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदा. : यास्तव, म्हणून, कारण, सबब, की इ.
➥ योग्य उपचार मिळावेत, यास्तव तो मुंबईला आला.
➥ चांगले कपडे मिळावेत म्हणून तो कपड्याच्या मोठ्या दुकानात गेला.
➤ वरील वाक्यात “यास्तव” आणि “म्हणून” ही उभयान्वयी अव्यय आहेत.
Marathi Numbers in words | Marathi Ank | मराठी अंक
३) करणबोधक उभयान्वयी अव्यय :
ज्या उभयान्वयी अव्ययामुळे प्रधान वाक्यातील क्रिया घडण्याचे कारण गौण वाक्यामधून दर्शविले जाते अश्या अविकारी शब्दांना करणबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदा. : का, की, कारण इ.
➥ माझे काम झाले कि मी जाईन.
➥ विराजला मानसशास्त्राची माहिती नाही कारण हा विषय त्याला आवडत नाही.
➤ वरील वाक्यात “कि” आणि “कारण” ही उभयान्वयी अव्यय आहेत.
४) संकेतबोधक उभयान्वयी अव्यय :
ज्या उभयान्वयी अव्ययामुळे प्रधान वाक्यातील क्रिया घडण्याचे संकेत गौण वाक्यात दर्शविले जातात व त्याचा परिणाम प्रधान वाक्यात झालेला दिसतो अश्या अविकारी शब्दांना संकेतबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदा. : जर-तर, म्हणजे, की, तर इ.
➥ जर मेहनत केलीस तर यश मिळेल.
➥ तू झाडावर चढलास की, आपण फळ खाऊ.
➤ वरील वाक्यात “जर-तर” आणि “की” ही उभयान्वयी अव्यय आहेत.
[ays_quiz id=’44’]इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
Conjunction in Marathi :
Conjunction meaning in marathi, conjunctivitis meaning in marathi, conjunction in marathi, conjunctivitis in marathi, conjunction examples in marathi, conjunction in marathi grammar, conjunction sentences in marathi, conjunction words in marathi,