Types of Sentence in Marathi
मराठी जग

Samanyarupe marathi | सामान्यरूपे

Samanyarupe marathi सामान्यरूपे : (The word ordinary form) नामांना किंवा सर्वनामांना विभक्ती प्रत्येय लावण्यापूर्वी मूळ शब्दात जो फरक होतो त्यास ‘सामान्यरूप’ असे म्हणतात.

उदा. :
पाणी : पाण्यास, पाण्याला, पाण्याने, पाण्याचा – (या मध्ये ‘पाण्या’ हे सामान्यरूप आहे).
झाड : झाडाला, झाडाने, झाडाचा, झाडास, झाडाच्या – (या मध्ये “झाडा” हे सामान्यरूप आहे).

विभक्ती व त्याचे प्रकार :

Samanyarupe marathi सामान्यरूपे : वाक्यातील शब्दांचे एकमेकांशी संबंध प्रस्थापित करणाऱ्या बदलला ‘विभक्ती‘ असे म्हणतात.

➽ विभक्तीचा हा संबंध आठ प्रकारचा आहे :

विभक्तीविभक्तीचे कारकार्थएकवचन प्रत्येय अनेकवचन प्रत्येय
प्रथमा कर्ता
व्दितीयाकर्मस, ला, तेस, ला, ना, ते
तृतीयाकरणने, शी, एनी, ही, ई, शी
चतुर्थीसंप्रदानस, ला, तेस, ला, ना, ते
पंचमीअपादानऊन, हूनऊन, हून
षष्ठीचा, ची, चेचे, च्या, ची
सप्तमीअधिकरणत, ई, आत, ई, आ
संबोधनसंबोधननो, भो

कर्ता म्हणजे काय :
वाक्यातील क्रियापदाने दाखवलेली क्रिया जो करतो त्यास ‘कर्ता‘ असे म्हणतात.

कर्त्यांची विभक्ती बहुतांशी प्रथमा असते म्हणून कर्ता हा प्रथमेचा कारकार्थ आहे.

उदा. :
➥ रुद्र नृत्य करतो. (नृत्याची क्रिया रुद्र करतो म्हणून रुद्र हा कर्ता आहे.)
➦ भावी खेळत आहे. (खेळण्याची क्रिया भावी करते म्हणून भावी हा कर्ता आहे.)
➥ वेदांती चित्र काढत आहे. (चित्र काढण्याची क्रिया वेदांती करते म्हणून वेदांती हा कर्ता आहे.)

Marathi Numbers in words | Marathi Ank | मराठी अंक

कर्म म्हणजे काय :

कर्म म्हणजे काय :
वाक्यातील क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्याच्यावर घडते त्याला ‘कर्म’ असे म्हणतात.
➤ प्रत्यक्ष कर्माची विभक्ती व्दितीया असते म्हणून कर्म हा व्दितीयेचा कारकार्थ आहे.

➤ उदा. :
➥ हर्षाली वासरास पुसते. (पुसण्याची क्रिया वासरावर होते म्हणून वासरू हे कर्म आहे.)
➦ तन्मयी मांजरास पाणी पाजते. (पाणी पाजण्याची क्रिया मांजरावर होते म्हणून मांजर हे कर्म आहे.)
➥ स्वरा रोपट्यास रोवते. (रोवण्याची क्रिया रोपट्यावर होते म्हणून रोपटे हे कर्म आहे.)

करण म्हणजे काय :
वाक्यातील क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्या साधनाने घडते त्याला ‘करण’ असे म्हणतात.

➤ कारणाची विभक्ती तृतीया असते म्हणून करण हा तृतीयेचा कारकार्थ आहे.

➤ उदा. :
भावी काठीने पक्षी उडवते. (पक्षी उडवण्याची क्रिया काठीने होते म्हणून काठी हे करण आहे.)

संप्रदान म्हणजे काय :
वाक्यातील क्रियापदाने दान देण्याची क्रिया ज्याच्यावर होते त्याला ‘संप्रदान’ असे म्हणतात.
➤ संप्रदानाची विभक्ती चर्तुर्थी असते म्हणून संप्रदान हा चर्तुर्थीचा कारकार्थ आहे.

➤ उदा. :
वेदांतीने तन्मयीला कविता शिकविली. (कविता शिकविण्याची क्रिया तन्मयीवर होते म्हणून तन्मयी हे संप्रदान आहे.)

नाम म्हणजे काय ? : एखाद्या व्यक्तिला, वस्तुला, पक्षांना, प्राण्यांना, एखाद्या ठिकाणाला तसेच काल्पनिक घटक.… Read more…

आपदान म्हणजे काय :

आपदान म्हणजे काय :
वाक्यातील क्रियापदाने एका ठिकाणावरून सुरु होणारी क्रिया दुसरीकडे जाऊन संपते म्हणजे तिचा वियोग होतो त्याला ‘आपदान’ असे म्हणतात.
➤ आपदानाची विभक्ती पंचमी असते म्हणून आपदान हा पंचमीचा कारकार्थ आहे.

➤ उदा. :
रुद्र घरून आत्ताच बागेत आला. (रुद्रची बागेत येण्याची क्रिया घरून सुरु होते म्हणून घर हे आपदान आहे.)

अधिकरण म्हणजे काय :
वाक्यातील क्रियापदाने क्रियेचा स्थान किंवा काळ दर्शविला जातो त्यास ‘अधिकरण’ असे म्हणतात.
➤ अधिकरणाची विभक्ती सप्तमी असते म्हणून अधिकरण हा सप्तमीचा कारकार्थ आहे.

➤ उदा. :
निल दररोज सकाळी व्यायाम करतो. (निलच्या व्यायाम करण्याच्या क्रियेचा काळ ‘सकाळी’ या शब्दातून व्यक्त होतो म्हणून ‘सकाळी’ हे अधिकरण आहे.)

पुल्लिंगी नामांचे विभक्ती प्रत्ययाने होणारे सामान्यरूपातील बदल :

शब्द प्रकारएकवचनएक वचनाचे प्रत्येयअनेकवचनअनेक वचनाचे प्रत्येय
‘अ’कारान्तघर घरा + त = घरातघरेघरां + ना = घरांना
‘आ’कारान्तवाडावाड्या + ला= वाड्यालावाडेवाड्यां + ना= वाड्यांना
‘ई’कारान्तकोळी कोळ्या + ने = कोळ्याने कोळीकोळ्यां + नी = कोळयांनी
‘ऊ’कारान्तखडू खडू + स = खडूस खडूंखडूं + स = खडूंस
‘ए’कारान्तगोखलेगोखल्यां + चा = गोखल्यांचा गोखलेगोखल्यां + च्या = गोखल्यांच्या
‘ओ’कारान्तरेडिओ रेडिओ + स = रेडिओस रेडिओरेडिओं+ स = रेडिओंस


स्त्रीलिंगी नामांचे विभक्ती प्रत्ययाने होणारे सामान्यरूपातील बदल :

शब्द प्रकारएकवचनएक वचनाचे प्रत्येयअनेकवचनअनेक वचनाचे प्रत्येय
‘अ’कारान्तवेल वेली + स = वेलीसवेलवेलीं + ना = वेलींस
‘आ’कारान्तशाळाशाळे + ने = शाळेने शाळाशाळां + नी = शाळांनी
‘ई’कारान्तनदीनदी + स = नदीसनद्या नद्यां + ना = नद्यांना
‘ऊ’कारान्तकाकूकाकू + ला = काकूलाककवाककवां + ना = काकवांना
‘ए’कारान्तडोकेडोक्या + स = डोक्यासडोकेडोक्यां + ना = डोक्यांना
‘ऐ’कारान्तमैनामैने + ला = मैनेलामैनांमैनां + नी = मैनांनी
‘ओ’कारान्तबायकोबायको + ला = बायकोलाबायकांबायकां + नी = बायकांनी


नंपुसकलिंगी नामांचे विभक्ती प्रत्ययाने होणारे सामान्यरूपातील बदल :

शब्द प्रकारएकवचनएक वचनाचे प्रत्येयअनेकवचनअनेक वचनाचे प्रत्येय
‘अ’कारान्तफुलफुला + त = फुलातफुलेफुलां + त = फुलांत
‘ई’कारान्तलोणीलोण्या + त = लोण्यातलोणीलोण्या + चा = लोण्याचा
‘ऊ’कारान्तकोकरूकोकरा + स = कोकरासकोकरेकोकरां + स = कोकरांस
‘ए’कारान्तमडकेमडक्या + त = मडक्यातमडकीमडक्यां + त = मडक्यांत


इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार

या लेखात आपण खालील प्रश्नांची उत्तरं पहिली Samanyarupe marathi सामान्यरूपे :

सामान्यरूपे, The word’s ordinary form, विभक्ती, Vibhakti, विभक्तीची रूपे, विभक्तीची प्रत्येय,
विभक्ती व त्याचे प्रकार, Vibhakti v tyache prakar in Marathi,
कर्ता म्हणजे काय?, karta mhanaje kay?, Karta in Marathi,
कर्म म्हणजे काय, karm mhanaje kay?, Karm in Marathi,
करण म्हणजे काय ?, karan mhanaje kay?, Karan in Marathi,
संप्रदान म्हणजे काय?, Sampradan mhanaje kay?, Sanpradan in Marathi,
आपदान म्हणजे काय, aapadan mhanaje kay?, Apadan in Marathi,
अधिकरण म्हणजे काय ?, Adhikaran mhanaje kay? Adhikaran in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *