Mi Mukhyadhyapika Zale Tar Essay in Marathi : मी मुख्याध्यापिका झाले तर…मराठी निबंध, / मी मुख्याध्यापक झालो तर मराठी निबंध | Mi Mukhyadhyapika Zale Tar Essay In Marathi.
Table of Contents
माहिती : (Marathi Essay)
नमस्कार मित्रांनो आज आपण Smart School Infolips च्या या लेखात वाचणार आहोत एक मराठी निबंध, मी मुख्याध्यापक झालो/ मुख्याध्यापिका झाले तर. एक मराठी वर्णनात्मक निबंध. अश्या प्रकारच्या निबंधात आपणास वेगवेगळे विषय दिले जाऊ शकतात. या विषयात आपणास आपली कल्पनाशक्ती वापरण्यास खूप वाव असतो. प्रत्येकाच्या विचारानुसार, या विषयाच्या निबंधात विविधता असू शकते. निबंध लिहताना, सुरुवात, गाभा, आणि शेवट, मुद्देसूद आणि रंजक असावा. योजक, अर्थपूर्ण आणि अलंकारिक अशा शब्दांचा उपयोग असावा, ज्यामुळे आपल्या निबंधाचे परिणामकाकरता वाढते.
मी मुख्याध्यापक झालो तर मराठी निबंध (२००+ शब्द):
प्रत्येक व्यक्तीची काही ना काहीतरी स्वप्न असतात. मलाही शाळेचा मुख्याध्यापक होण्याची इच्छा होती. मुख्याध्यापक बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असावी, आणि ती कशी पूर्ण करावी याची संपूर्ण माहिती मिळविली आणि त्या दृष्टीने तयारीला लागलो.
आवश्यक शिक्षण पूर्ण केल्यावर मी मुख्याध्यापक होणार. मुख्याध्यापकांकडे शाळेचे संपूर्ण नियंत्रण असते. मुख्याध्यापक हा शाळेचा मुख्य बिंदू असतो, म्हणूनच तर मुख्याध्यापक म्हणतात, अर्थात सर्व अध्यापकांचा मुख्य. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या तिघांत एकसूत्रता साधण्याचा प्रयत्न करेन. शिस्तीशिवाय आयुष्य यशस्वी होऊ शकत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीची शिस्त बनवून ठेवण्यासाठी प्रयत्न करेन.
मी मुख्याध्यापक झालो तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणा सोबत, त्यांचे चांगले चरित्र व आदर्श व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी मी प्रयत्न करीन. आज जगात सर्व बाजूंनी नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत चालला आहे. चोरी, लबाडी, भ्रष्टाचार, व्याभिचार, धार्मिक दंगे यांचे प्रमाण वाढत आहे. या घटना कमी करण्यासाठी नवीन पिढी पुढे नैतिक मूल्यांचे शिक्षण देणं आवश्यक आहे.
पुस्तकी ज्ञान घेऊन एखादा रोजगार मिळविण्या पेक्षा, ज्ञाना सोबत अनुभव घेऊन नवीन रोजगार कसा तयार करता येईल, याकडे मुलांचे लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी मुलांना पूर्ण सुविधा युक्त रासायनिक कार्यशाळा. वाचनाची तहान भागविण्या साठी मोठे ग्रंथालय उपलब्द करून देईन.
आजचे युग संगणकाचे युग आहे. मुख्याध्यापक झाल्यावर विद्यालयात संगणक शिक्षणावर भर देईन. शालेय स्तरावरच मुलांना व्यायाम व खेळांचे विशेष महत्व सांगितले जातील, व्यायामामुळेच व्यक्तीचा शारीरिक आणि मानसिक विकास होतो. विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी मी प्रोत्साहित करीन.
अशा प्रकारे मुख्याध्यापक या नात्याने मी माझ्या पूर्ण निष्ठेने माझी जबाबदारी पार पाडेन. माझ्या शाळेत अशा शिक्षण पद्धती विकास होईल.
मी मुख्याध्यापक झालो तर मराठी निबंध (४००+ शब्द):
प्रत्येक व्यक्तीची काही ना काहीतरी स्वप्न असतात. मी ही माझ्या शाळेतील मुख्याध्यापकांना पाहून, त्यांचा दरारा, त्यांची शिस्त आणि त्यांना मिळत असलेला मान पाहून. मलाही शाळेचा मुख्याध्यापक होण्याची इच्छा झाली. मुख्याध्यापक बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असावी, आणि ती कशी पूर्ण करावी याची संपूर्ण माहिती मिळविली आणि त्या दृष्टीने तयारीला लागलो.
आवश्यक शिक्षण पूर्ण केल्यावर मी मुख्याध्यापक होणार. मुख्याध्यापकांकडे शाळेचे संपूर्ण नियंत्रण असते, शाळेत अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनाच घ्यावे लागतात. मला माहित आहे, शाळेच्या मुख्यद्यापकाचे पद किती महत्त्वाचे असते. शाळेची व शाळेतील मुलांची प्रगती ही त्या शाळेतील मुख्याध्यापकांवरच अवलंबून असते. हा शाळेचा मुख्य बिंदू असतो, म्हणूनच तर मुख्याध्यापक म्हणतात, अर्थात सर्व अध्यापकांचा मुख्य.
विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या तिघांत एकसूत्रता आणि समानव्यय साधण्याचा प्रयत्न करेन. शिस्तीशिवाय आयुष्य यशस्वी होऊ शकत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीची शिस्त बनवून ठेवण्यासाठी प्रयत्न करेन. मुले शिस्त शिक्षकांना पाहून शिकत असतात, त्यामुळे शिक्षक आणि कर्मचारी वर्गात शिस्तीचे व नियमांचे पालन करावयास सांगेन. ज्याचे पडसाद आपोआपच मुलांवर पडतील.
मी मुख्याध्यापक झालो तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणा सोबत, त्यांचे चांगले चरित्र व आदर्श व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी मी प्रयत्न करीन. आज जगात सर्व बाजूंनी नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत चालला आहे. चोरी, लबाडी, भ्रष्टाचार, व्याभिचार, धार्मिक दंगे यांचे प्रमाण वाढत आहे. या घटना कमी करण्यासाठी नवीन पिढी पुढे नैतिक मूल्यांचे शिक्षण देणं आवश्यक आहे. नैतिक मूल्यांचे महत्व पटवून देऊन चांगले संस्कार करणे गरजेचं आहे. त्यासाठी मी प्रयत्न कारेन.
पुस्तकी ज्ञान घेऊन एखादा रोजगार मिळविण्या पेक्षा, ज्ञाना सोबत अनुभव घेऊन नवीन रोजगार कसा तयार करता येईल, याकडे मुलांचे लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी मुलांना पूर्ण सुविधा युक्त
रासायनिक कार्यशाळा, त्यावर अभ्यास करणारे योग्य शिक्षक. वाचनाची तहान भागविण्या साठी मोठे ग्रंथालय, पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. मुलांना, वाचनाची, भाषणाची, आपली ज्ञान अधिक वाढविण्यासाठी विविध शालेय स्तरावर स्पर्धा आयोजित करेन.
आजचे युग संगणकाचे युग आहे. दिवसेंदिवस संगणकाचा वापर वाढत आहे, अणि पुढेही वाढणार आहे. म्हणून मुख्याध्यापक झाल्यावर विद्यालयात संगणक शिक्षणावर भर देईन. प्राथमिक इयत्तेपासूनच संगणक प्रशिक्षण अनिवार्य करेन. शालेय स्तरावरच मुलांना व्यायाम व खेळांचे विशेष महत्व सांगितले जातील, व्यायामामुळेच व्यक्तीचा शारीरिक आणि मानसिक विकास होतो. म्हणूनच माझा शाळेच्या नियमित आभ्यासा शिवाय, खेळणे व व्यायाम यावर विशेष भर असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी मी प्रोत्साहित करीन. भाषण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करेन
अशा प्रकारे मुख्याध्यापक या नात्याने मी माझ्या पूर्ण निष्ठेने माझी जबाबदारी पार पाडेन. माझ्या शाळेत अशा शिक्षण पद्धती विकास होईल. जी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत, नैतिकता, देशाविषयी प्रेम, संस्कृती विषयी आदर, राष्ट विकासाची भावना निर्माण करेल. एक सशक्त, मजबूत आणि प्रामाणिक भारतीय नाकारिक या शाळेतून बाहेर पडेल. इतरांच्या स्वप्नातील ही शाळा आपल्या येथे अस्थित्वात आलेली असेल.
Other Essays:
Essay on My School in English
मेरा विद्यालय पर निबंध
Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
Essay on tree in Marathi
माझी शाळा निबंध मराठी
My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
जर मी ढग असतो तर :
If I Became The Prime Minister -Marathi Essay
इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech