marathi katha lekhan
निबंध/ Essay/Nibandh

Marathi Katha Lekhan | मराठी कथालेखन

Marathi Katha Lekhan | मराठी कथालेखन :

नमस्कार! आज आपण मराठी उपयोजित लेखन मधील एक घटक “कथालेखन” (Marathi Katha Lekhan) कसे करायचे? हे पाहणार आहोत. या लेखामध्ये तुम्हाला मराठी कथा लेखन लिहताना कोणत्या महत्त्वाची गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते सांगणार आहोत. मराठी कथा लेखन – Marathi Katha Lekhan 9th, 10th, 12th Class. या लेखात कथा कशी लिहावी? कथेची सुरुवात कशी करावी.

आपल्याला मुद्द्यांवरून गोष्ट लिहायची असेल म्हणजेच कथालेखन लिहायची असेल तर खालील गोष्टी लक्षात ठेवूनच कथालेखन करावे. कथालेखन करण्यासाठी आपल्याला मुद्दे दिलेले असतात, त्या मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करावे.

|Related: Television Boon or Curse – Essay in English | दूरदर्शन से लाभ और हानि… (Read more)

महत्वाचे मुद्दे :

➦ कथा लिहिताना सुरुवातीला पहिल्या ओळीवर मधोमध कथेचे शीर्षक लिहावे.
➦ शीर्षकावरून कथेच्या विषयाची कल्पना यायला हवी.
➥ कथा आकर्षक असावी.
➦ कथा कमीत कमी तीन परिच्छेदात विभागाची.
➥ कथा लिहताना ती भूतकाळात झालेली आहे अश्या संदर्भात असावी.
➦ कथेत प्रसंगानुसार वातावरण निर्मिती करावी.
➦ कथेतील पात्रे, ठिकाणे, गावांची नावे द्यावीत.
➥ कथेची भाषा साधी, शुद्ध, आणि सोपी असावी.
➦ वाक्यांची रचना छोटी असावी.
➥ कथेत संभाषण यावे.
➦ कथेत वाक्प्रचार, म्हणी, थोर व्यक्तींच्या वाक्यांचे संदर्भ द्यावेत.
➥ कथेच्या शेवटी एका वेगळ्या परिच्छेदात कथेचे तात्पर्य लिहावे.



इतर माहिती :

कोणते महत्वाचे मुद्दे आहेत हे तर समजले पण, तरी प्रश्न उभा राहतो की कथा लिहायची कशी. चला तर अजून काही गोष्टी समजून घेऊ.
जसे आपण सर्व जणांना गोष्टी वाचण्यास आणि ऐकण्यास खूप आवडते. पण जेव्हा वेळ येते गोष्ट लिहण्याची तेव्हा बरेच प्रश्न उभे राहतात. यातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सुरुवात करायची कशी?

तर तुम्हाला सांगायला आवडेल की, कथा लेखन करताना तुम्ही तुमच्या कल्पना शक्तीचा वापर करायचा. जसे आपण बऱ्याच वेळा करत असतो.

आपण सर्व मित्र गप्पा मारतो असतो ना मी मोठं झाल्यावर हे करणार, मी हे बनणार आहे. त्यावेळी आपण जशी कल्पना करतो अगदी तशीच कल्पना करत कथालेखन लिहावे. फरक फक्त एवढाच आहे की आपल्या या साठी एक विषय दिला जातो त्या विषयावर एक छान शी गोष्ट कल्पनेने तयार करायची आणि लिहायची. लिहिलेल्या कथेतून कोणता बोध मिळाला हे सांगायचे आहे.

आता वाटते ना सोपे, हां म्हणजे जी गोष्ट आपण केली आहे ती लिहिणे आता सोपे वाटते हो ना. बस झालं तर जी गोष्ट सोपी ती सहज केली जाऊ शकते.

|Related : निबंध लेखन कसे करावे हे संपूर्ण समजून घेण्यासाठी येथे क्लीक करा



कथालेखन विषयावरील प्रश्न :

कथालेखनात खालील विषयावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसे
➢ शीर्षकावरून कथालेखन
➣ कथाबिजावरून कथालेखन,
➣ दिलेल्या शब्दावरून कथालेखन
➢ अपूर्ण कथा पूर्ण करणे
➣ मुद्यावरून कथा लेखन

आम्ही खाली एका अपूर्ण कथा लेखनाचा नमुना तुमच्या सरावासाठी दिला आहे.

अपूर्ण कथा पूर्ण करा.

खाली दिलेली अपूर्ण गोष्ट पूर्ण करा व शीर्षक देऊन तात्पर्य लिहा :

ढोलकपूर गावच्या बाजूलाच एक जंगल होते. जंगलात एक तलाव होते, आणि तळ्याच्या काठावर एक झाड होते. त्या झाडाच्या पायथ्याशी एक मुंग्यांचे वारूळ होते वारुळात अनेक मुंग्या राहत होत्या.
एकदा एक मुंगी तळ्याच्या काठावरुन चालली होती. इतक्यात जोराचा वारा आला. मुंगी उडून तळ्यात पडली. तळ्यात पाणी भरपूर होते तिने खूप प्रयत्न केले पण तिला काही केल्या बाहेर येता येईना. मुंगीची ही सारी धडपड झाडावर बसलेल्या कबुतराने पाहिली. त्याला तिची दया आली. त्याने झाडाचे पान तोडले व पाण्यात टाकले. ते पान मुंगीपासून दूर पडले; पण थोड्या वेळाने हळूहळू ते मुंगी जवळ आले. मुंगी पानावर चढली हळूहळू वारा वाहत होता, तसे पान तळ्याच्या काठाशी आले. मुंगी तळ्याच्या बाहेर आली….

उत्तर : काही दिवसांनी झाडापासून थोड्या अंतरावर मुंगीला एक शिकारी दिसला. त्याच्या हातात एक बंदूक होती. शिकाऱ्याने बंदुकीचा नेम तिला वाचवणाऱ्या त्या कबुतरावर धरला होता. हे पाहताच ती मुंगी वेगाने त्या शिकाराच्या दिशेने चालत गेली. पटकन ती त्याच्या पायावर चढली आणि त्याच्या पायाला कडाडून चावली, त्यामुळे त्याचा नेम चुकला.

बंदुकीच्या आवाजाने ते कबुतर उडून गेले. उडून गेल्यामुळे त्याचे प्राण वाचले. वाचण्यात आपल्याला यश मिळाले हे पाहून मुंगीला खूप आनंद झाला.

तात्पर्य : उपकाराची परत फेड

शीर्षक : मुंगी आणि कबूतर.

|Related: Importance Of Hard Work in Life – Essay in Hindi| जीवनमें परिश्रम का महत्व (Read more…)

Other Essays:

Essay on My School in English
मेरा विद्यालय पर निबंध
Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
Essay on tree in Marathi
माझी शाळा निबंध मराठी
My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
जर मी ढग असतो तर :
If I Became The Prime Minister -Marathi Essay

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech

I hope you get the answers to the following questions to write katha Lekhan in Marathi? Write Marathi Katha Lekhan? how to write short Katha Lekhan in Marathi for 10th class? How to write Matha Lekhan in Marathi with morals? Marathi Katha Lekhan writing?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *