Interjection Meaning in Marathi | Kevalprayogi Aavyay
केवलप्रयोगी अव्यय : ज्या शब्दाव्दारे वाक्यातुन आपल्या मनातील आनंद, आश्चर्य, दु:ख, प्रशंसा अश्या भावना व्यक्त केल्या जा1तात त्या अविकारी शब्दाला केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
उदा. : वा, अच्छा, अरेरे, छान, बापरे इ.
➥ बापरे ! केवढा मोठा हत्ती.
➦ अरेरे ! खूप वाईट झाले.
➥ छान ! असेच चांगले काम करत रहा.
➤ वरील वाक्यात “बापरे”, “अरेरे” छान “पण” ही केवलप्रयोगी अव्यय आहेत.
➽ केवलप्रयोगी अव्यय या “!” चिन्हा द्वारे दर्शविले जाते.
Table of Contents
केवलप्रयोगी अव्ययाचे प्रकार :
➽ केवलप्रयोगी अव्ययाचे प्रकार :
केवलप्रयोगी अव्ययाचे नऊ प्रकार आहेत.
१) हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय :
ज्या केवलप्रयोगी अव्यया व्दारे वाक्यात आनंद किंवा हर्ष अश्या भावना व्यक्त केल्या जातात अश्या अविकारी शब्दांना हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
उदा. : ओ-हो, अहाहा, अहा, वा, वाहवा, वा-वा इ.
➥ ओ-हो ! किती उतुंग षटकार मारला आहे.
➦ अहाहा ! किती सुंदर चित्र आहे.
➥ अहा ! किती चविष्ट फळ आहे.
➤ वरील वाक्यात “ओ-हो”, “अहाहा” आणि “अहा” ही केवलप्रयोगी अव्यय आहेत.
२) शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय :
ज्या केवलप्रयोगी अव्यया व्दारे वाक्यात दुःख किंवा व्यथा अश्या भावना व्यक्त केल्या जातात अश्या अविकारी शब्दांना शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
उदा. : आई ग, हाय, हायहाय, अगाई, ऊं, अं, अरेरे इ.
➥ अरेरे ! खूपच वाईट घडले.
➦ आई ग ! किती जोरात लागलं त्याला.
➥ ऊं ! असं व्हायला नको होतं.
➤ वरील वाक्यात “अरेरे”, “आई ग” आणि “ऊं” ही केवलप्रयोगी अव्यय आहेत.
३) आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय :
ज्या केवलप्रयोगी अव्यया व्दारे वाक्यात आश्चर्याच्या भावना व्यक्त केल्या जातात अश्या अविकारी शब्दांना आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
उदा. : बापरे, अरेच्या, अबब, ऑ, अहाहा, ओ, ओहो इ.
➥ अबब ! किती विशाल महासागर हा.
➦ अरेच्या ! तू खरंच पास झालास.
➥ बापरे ! किती मोठं पटांगण हे.
➤ वरील वाक्यात “अबब”, “अरेच्या” आणि “बापरे” ही केवलप्रयोगी अव्यय आहेत.
४) प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय :
ज्या केवलप्रयोगी अव्यया व्दारे मनातील प्रशंसा व्यक्त केली जाते अश्या अविकारी शब्दांना प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
उदा. : छान, ठीक, शाब्बास, वाहवा, भले, फक्कड इ.
➥ शाब्बास ! अखेर तू जिंकलास.
➦ छान ! तुझा खेळ लयबद्द आहे.
➥ वाहवा ! किती सुबक कलाकृती आहे.
➤ वरील वाक्यात “शाब्बास”, “छान” आणि “वाहवा” ही केवलप्रयोगी अव्यय आहेत.
५) संमतीदर्शक केवलप्रयोगी अव्यय :
ज्या केवलप्रयोगी अव्यया व्दारे संमती देण्या-घेण्याची भावना व्यक्त केली जाते अश्या अविकारी शब्दांना संमतीदर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
उदा. : बराय, अच्छा, ठीक, जीहा, हा, इ.
➥ बराय ! मी येतो काळजी घे.
➦ अच्छा ! तू जाऊ शकतोस.
➥ ठीक ! तू उद्या आला तरी चालेल.
➤ वरील वाक्यात “बराय”, “अच्छा” आणि “ठीक” ही केवलप्रयोगी अव्यय आहेत.
६) विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय :
ज्या केवलप्रयोगी अव्यया व्दारे विरोध दर्शविण्याची भावना व्यक्त केली जाते अश्या अविकारी शब्दांना विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
उदा. : छे, अहं, ऊं, हॅट, हू, छट, छेछे, च. इ.
➥ छे ! ते मला नाही आवडत.
➦ छे-छे ! असलं काम मी कधीच करत नाही.
➥ अहं ! तू हे साहस करू नकोस.
➤ वरील वाक्यात “छे”, “छे-छे” आणि “अहं” ही केवलप्रयोगी अव्यय आहेत.
७) तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय :
ज्या केवलप्रयोगी अव्यया व्दारे तिरस्कार किंवा व्देश दर्शविण्याची भावना व्यक्त केली जाते अश्या अविकारी शब्दांना तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
उदा. : शी, हुड, शु, हत, छत, शिक्क, इश्श, हुडत, फुस, छी इ.
➥ शी ! किती घाणेरडी जागा आहे हि.
➦ छी ! कात विचित्र आह ते.
➥ हुड ! मी नाही खाणार.
➤ वरील वाक्यात “शी”, “छी” आणि “हुड” ही केवलप्रयोगी अव्यय आहेत.
नामाचे प्रकार : नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत :… Read more…
८) संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय :
ज्या केवलप्रयोगी अव्यया व्दारे इतरांना संबोधून आपल्या मनातील भावना व्यक्त केली जाते अश्या अविकारी शब्दांना संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
उदा. : अहो, ए, अग, अरे, अगो, बा, रे इ.
➥ ए ! चल जाऊ या.
➦ अहो ! ऐकलत का.
➥ अग ! बस्स झालं आता.
➤ वरील वाक्यात “ए”, “अहो” आणि “अग” ही केवलप्रयोगी अव्यय आहेत.
९) मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय :
ज्या केवलप्रयोगी अव्यया व्दारे इतरांना मौन राहण्याच्या सूचना देण्याची भावना व्यक्त केली जाते अश्या अविकारी शब्दांना मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
उदा. : चुप, चुपचाप, गुपचुप, गप इ.
➥ गप ! माझ्याशी बोलू नको.
➦ चूप ! अभ्यास कर.
➥ चुपचाप ! तुझं काम कर.
➤ वरील वाक्यात “गप”, “चूप” आणि “चुपचाप” ही केवलप्रयोगी अव्यय आहेत.
[ays_quiz id=’45’]इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
interjection meaning in Marathi, interjection in marathi grammar, English Grammar in Marathi, केवलप्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार-Smart School …, interjection Marathi translation of interjection, interjection – Meaning in Marathi, Parts of Speech (शब्दांच्या जाती), Marathi grammar, English to Marathi Dictionary, 10 examples of interjection in marathi, conjunction meaning in marathi grammar, marathi basic grammar, preposition meaning in marathi grammar, interjection example, interjection examples, interjection sentences