Prashna 4th Std Marathi Lesson 28 | प्रश्न : Best Solution.
All question answers of Prashna : Sulabhbharati solutions for Marathi – Sulabhbharati 4th Class Solution for all lessons.
Table of Contents
शब्दार्थ:
पशुपक्ष्यांना – To animals
अवगत – Aware/ Known
कला – Art
जमत – Able
प्रश्न – Question
पडतो – Arise / I have
म्हणत – Says
पिसारा – Feather
काळजी – Worry
चारा – Fodder
कोकीळ – The cuckoo
दंग – Awe of / Stunned
राबू – To do hard-work.
विचारतो – Asks
साबू – Soap
भित्रा – A Coward
शूरपणा – Bravery
चिंता – Concern / Worried
गुंता – Entangle
प्र. १. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ) पशुपक्ष्यांना कोणती कला अवगत असते?
उत्तर: पशुपक्ष्यांना जगण्याची कला अवगत असते.
आ) पशुपक्ष्यांप्रमाणे माणसे आनंदाने का जगत नाहीत?
उत्तर: पशुपक्ष्यांप्रमाणे माणसे आनंदाने का जगत नाहीत, कारण त्यांच्या मनात विचारांचा गुंता असतो.
प्र. २. खालील पशुपक्ष्यांना कोणते प्रश्न पडत नाहीत ?
अ) गाय:
उत्तर: गाईला चारा मिळेल की नाही असा प्रश्न पडत नाही.
आ) कोकीळ
उत्तर: कोकीळेला तिचा रंग काळा का आहे असा प्रश्न पडत नाही.
इ) बैल
उत्तर: बैलाला मीच का सतत काम का करत राहू असा प्रश्न पडत नाही.
ई) कावळा
उत्तर: कोणता साबण वापरू असा प्रश्न कावळ्याला पडत नाही.
उ) ससा
उत्तर: मीच का भित्रा आहे, असा प्रश्न सश्याला पडत नाही.
ऊ) चिमणी
उत्तर: मला मोरासारखा पिसारा हवा आहे असा प्रश्न चिमणीला पडत नाही.
प्र. ३. कोण ते सांगा.
अ) पिसारा असणारा – मोर
आ) गाण्यात दंग – कोकिळा
इ) खूप भित्रा – ससा
ई) शूरपणासाठी प्रसिद्ध – वाघ
उ) मनात विचारांचा गुंता असणारा – माणूस
प्र. ४. असे घडले तर काय होईल, ते सांगा.
अ) चिमणीला मोरासारखा पिसारा मिळाला, तर….
उत्तर: तर चिमणी सामान्य आणि खूप छान दिसेल, अशी चिमणी सर्वांना पाहायला आवडेल.
आ) बैलाने कष्ट करायला नाही म्हटले, तर…..
उत्तर: तर शेतकऱ्याचे शेतातील काम रखडून राहील, त्यालाच शेतात खूप काम करावे लागेल.
इ) सशामध्ये शूरपणा आला, तर….
उत्तर: तर ससा छोट्या छोट्या आवाजाला घाबरणार नाही, तो आव्हानांना तोंड देते, धैर्य आणि लवचिकतेचे प्रतीक बनेल.
प्र. ५. शेवटची अक्षरे जुळणारे शब्द लिहा.
उदा., कला – मला.
उत्तर :
१) पिसारा – चारा
२) रंग – दंग
३) राबू – साबू
४) भित्रा – कुत्रा
५) चिंता – गुंता
प्र. ६. कवितेच्या ओळी पूर्ण करा.
अ) चिमणी ……………………..
……………………….पिसारा.
उत्तर:
चिमणी कधी म्हणत नाही
हवा मोरासारखा पिसारा.
आ) वाघोबाचा ………………….
………………………………….कुत्रा.
उत्तर:
वाघोबाचा शूरपणा
मागत नाही कुत्रा.
इ) जो तो ………………..
……………………..चिंता.
उत्तर:
जो तो जगतो आनंदाने
नाही कसली चिंता .
प्र. ७. खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा व लिहा.
अ) कावळा
उत्तर: काळा, वळा,
आ) मोरासारखा
उत्तर: मोर, सार, रसा, खार, खारा, सारखा.
इ) विचारतो
उत्तर: वीर, चार, रवी, चावी,
इ) विचारतो
उत्तर: वीर, चार, रवी, चावी,
प्र. ८. इतर प्रश्न
अ) रिकाम्या जागा भरा
१) बैल कधी म्हणत नाही मीच का ______ ?
२) वाघोबाचा _________ मागत नाही कुत्रा.
३) गाय काळजी करत नाही मिळेल का मला ________ .
४) माणसाच्याच मनात असतो ___________ गुंता.
उत्तर:
१) राबू.
२) शूरपणा
३) चारा
४) विचारांचा
Essay Topics List in Marathi, Hindi, and English:
Question Answer for All Standard
मराठी निबंध
हिंदी निबंध
English Essay
Other Essays:
➥ Essay on My School in English
➦ मेरा विद्यालय पर निबंध
➥ Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
➦ Essay on tree in Marathi
➥ माझी शाळा निबंध मराठी
➦ My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
➥ जर मी ढग असतो तर :
इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech