A Rainy Day Essay for kids | पावसाचे दिवस निबंध – लहान मुलांसाठी
Table of Contents
A) पावसाचा दिवस निबंध #1 : (१०० शब्द)
मला पावसाळा खूप जास्त आवडतो. आज पावसाळ्याचा दिवस असून दिवसभर पाऊस पडत आहे. मी आणि माझे मित्र बाहेर खेळाच्या मैदानात गेलो आणि पावसात खेळत होतो. संध्याकाळी आकाशात एक प्रचंड इंद्रधनुष्य तयार झालेले दिसले. खूप सुंदर दृश्य दिसत होते ते. याची मजा आम्हा मुलांशिवाय कुणाला नाही समजणार.
पावसामुळे रस्त्यावर पाणी तुंबले आहे. मी आणि माझे मित्र कागदी, बेटाच्या पानांच्या होड्या तयार केल्या आणि त्यांना साचलेल्या पाण्यात सोडल्या. पावसामुळे वातावरण आल्हाददायक होते, थंड हवेमुळे मन ताजेतवाने होते. पावसात भिजायला मजा येते. पाण्यात उड्या मारत मित्रांना भिजवायला आणखीन मजा येते. मला पावसाळ्याच्या दिवसात गरम तळलेले पदार्थ खायला आवडतात, विशेषतः भजी.
(A Rainy Day Essay, kids | पावसाचा दिवस)
B) पावसाचे दिवस निबंध #2 : (१०० शब्द)
मला पावसाळा हा ऋतू खूप खूप आवडतो. पावसाळा हा तर सर्व लहान मुलांचा आवडीचाच असतो. पावसात भिजायला, पावसाच्या धारा अंगावर घ्यायला मला खूप आवडतात. पावसामुळे सर्व कसे हिरवेगार होऊन जाते, वातावरणात गारवा पसरतो. आकाशात पडणारे इंद्रधनुष्य, थंड गार हवा, आणि अधिक पावसामुळे शाळेला मिळणारी सुट्टी. याची मजा आम्हा मुलांशिवाय कुणाला नाही समजणार
खरे तर उन्हामुळे त्रासलेले आपण सारे पावसाची वाट पाहत असतो. पाऊस सर्वाना हवा-हवासा वाटतो. शेतकऱ्याला शेतीसाठी, आपल्याला पिण्यासाठी, धरणात पाणी साठवण्यासाठी पावसाची आवशक्यता असते. आपल्यासाठी जीवनावश्यक असलेला पाणी पावसामुळेच मिळतो, पावसामुळे, झाडे रुजली जातात. म्हणूनच पावसाळ्यात आपण नवीन झाडे लावून ती रुजवितो. पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम तळलेले पदार्थ खायला आवडतात. म्हणून मला पावसाळा खूप खूप आवडतो.
Essay Topics List in Marathi, Hindi, and English
Other Essays:
➥ Essay on My School in English
➦ मेरा विद्यालय पर निबंध
➥ Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
➦ Essay on tree in Marathi
➥ माझी शाळा निबंध मराठी
➦ My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
➥ जर मी ढग असतो तर :
इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech