Fulpakharu Ani Madhamashi
5th

Fulpakharu Ani Madhamashi | फुलपाखरू आणि मधमाशी | Complete Answers

Maharashtra State Board | Class 5 | Marathi Solutions | Chapter 28, फुलपाखरू आणि मधमाशी | Fulpakharu Ani Madhamashi

फुलपाखरू आणि मधमाशी: All Questions – Answers | Notes, Textbook Exercise | Fulpakharu Ani Madhamashi

Q. 1 : कोण ते लिहा.

(अ) बागेत स्वच्छंदपणे फिरणारे.
उत्तर: फुलपाखरू

(आ) कामात मग्न असणारी.
उत्तर: मधमाशी

(इ) थुईथुई नाचणारे.
उत्तर: कारंजं

More Questions on, Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 28. | Fulpakharu Ani Madhamashi

फुलपाखरू आणि मधमाशी | Fulpakharu Ani Madhamashi

Q. 2: जोड्या जुळवा.

अ’ गट ‘ब’ गट
१. सुंदर(अ) मध
२. औषधी(आ) सुवास
३. मंद(इ) सकाळ
४. दरवळणारा(ई) वारा

उत्तर:

अ’ गट उत्तर:
१. सुंदर(इ) सकाळ
२. औषधी(अ) मध
३. मंद(ई) वारा
४. दरवळणारा(आ) सुवास

Q.3: तुम्हांला काय पाहिल्यानंतर आनंद होतो?

उत्तरः सकाळी बागेत गेल्यावर मला सकाळच्या कोवळ्या किरणांमुळे चमकणारे गावातावरील दवबिंदू पाहात राहावेसे वाटतात. पक्ष्यांची किलबिलाट ऐकायला आणि उडणारे पक्षी पाहायला खूप आवडतात. मंद वाऱ्या सोबत डोलणारी रंगीबेरंगी फुले आणि त्यांवर भिरभिरणारे विविध प्रकारची सुंदर फुलपाखरे पाहिल्यावर मन सुखावते. सकाळच्या अशा सुखद अनुभवाने मन प्रसन्न होते.

Q.4: एक, मध यांसारखे पाठात आलेले शब्द लिहा.

उत्तर: धन, तर, ढग, मन, बघ, पण.

Q.5: खालील शब्दांना ‘दार’ शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.

उदा., ऐट – ऐटदार.
चमक, दुकान, माल, चोप, भाल, खास, आम, गमती, रुबाब, वजन.

उत्तर: चमक : चमकदार,
दुकान : दुकानदार,
माल : मालदार,
चोप : चोपदार,
भाल : भालदार
खास : खासदार
आम : आमदार
गमती : गमतीदार
रुबाब : रुबाबदार
वजन : वजनदार

Q.6: खालील शब्दांना ‘पणा’ शब्द जोडून नवीन शब्द बनले आहेत. वाचा. शब्द वापरून वाक्ये लिहा.

–> चांगुलपणा, मोठेपणा, लहानपणा, वेगळेपणा, मोकळेपणा, सोपेपणा, कठीणपणा.

Q.: उपक्रम:

  1. फुलपाखरांविषयीच्या कविता मिळवा. वर्गात म्हणून दाखवा.
  2. फुलपाखरांची चित्रे मिळवा. वहीत चिकटवा.

वाचा. लक्षात ठेवा:

फुलपाखरे नाजूक असतात.
त्यांना पकडू नका. इजा करू नका.

ओळखा पाहू!

उंचाडी मान, फताडे पाय,
वाळवंटात डुगडुग जाय.

उत्तर: उंट

Q.7:a) कुंडीवरील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द पानांवर आहेत, योग्य जोड्या जुळवा व लिहा.

Fulpakharu Ani Madhamashi

उत्तर: मोठा x लहान,
अनेक x एक,
उत्तर x प्रश्न,
खाली x वर,
फिकट x गडद,
हरणे x जिंकणे.

Q.7:b) खालील दोन फुलांवरील शब्दांचे मिळून योग्य जोडशब्द तयार करा व लिहा.
उदा. गोरगरीब

Fulpakharu Ani Madhamashi

उत्तरः पुरणपोळी, गोडधोड, गोरगरीब, खाऊनपिऊन, इकडेतिकडे, कामधाम

Q.9: खाली दिलेले पाठ क्र. १ ते १५ मधील नवीन शब्द व त्यांचे अर्थ वाचा. याचप्रमाणे इतर पाठांतील नव्याने परिचित झालेल्या शब्दांचा अर्थ समजून घेऊन तुमचा शब्दसंग्रह तयार करा.

शब्दार्थ: Fulpakharu Ani Madhamashi

स्वच्छंदपणे – मुक्तपणे (freely),
दरवळणे – पसरणे (to be diffused widely)
मग्न असणे – पूर्णपणे रमून जाणे (to be engrossed)
सकाळ – प्रभात (morning),
मध – फुलांतून मिळणारा रस (honey)
सुंदर – मनोहर (beautiful)
कारंजे – पाण्याचा फवारा (fountain)
सुवास – सुगंध (fragrance)
दरवळणे – पसरणे (to be diffused widely)

शब्दार्थ: | Fulpakharu Ani Madhamashi

दूर – लांब.
निरखून पाहणे- लक्षपूर्वक पाहणे.
मोहक – सुंदर
तुडुंब भरणे – काठोकाठ भरणे.
जाहली – झाली.
आणिक – आणि.
बटबटीत – मोठाले, विद्रूप.
ध्यान – विशिष्ट रूप.
गाठणे – पोहचणे.
अपुला – आपला, स्वतःचा.
कांती – तेज.
प्रभातकाळ – पहाट, सूर्योदयाचा काळ.
संध्यासमयी – संध्याकाळी.
न्हाऊ घालणे – अंघोळ घालणे.
झूल – बैलांच्या अंगावर टाकण्यात येणारे रंगीत व नक्षीदार कापड.
बाशिंग – बैलांच्या डोक्याला बांधण्याचे आभूषण.

शब्दार्थ: Fulpakharu Ani Madhamashi
दिन – दिवस.
धाडधाड्आपटणे – जोरजोरात आदळणे.
पाऊसधोऽधोऽ कोसळणे-खूप जोराचा पाऊस पडणे.
गुणगुणणे – हळू आवाजात गाणे.
पानांआड – पानांमागे.
बिलगणे – प्रेमाने मिठी मारणे.
मंजूळ – ऐकायला गोड.
तीर – काठ.
लता-वेल.
वृक्ष- झाड.
सुमन- फूल.
लव्हाळी – पाण्यात किंवा पाण्याजवळ वाढणारी एक वनस्पती.
आम्रतरू – आंब्याचे झाड.
शीतल-थंड.
घट – मातीचा घडा (माठ).

More questions for you : सरावासाठी अधिक प्रश्न | Fulpakharu Ani Madhamashi

Q.1. कोण ते लिहा.

रम्य अशी ती – सकाळ
बागेत सुंदर दिसणारी – फुलझाडे
सर्वत्र दरवळणारा – सुवास
औषधी असणारे – मध
मंद वाहणारा – वारा

Q.2. एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. या पाठातील संवाद कोणाकोणात व कुठे झाला आहे?
उत्तर: या पाठातील संवाद मधमाशी व फुलपाखरू यांच्यात एका बागेत झाला आहे.

2. फुलपाखरू मधमाशीला कुठे गप्पा मारायला बोलवत आहे?
उत्तरः
फुलपाखरू मधमाशीला गुलाबाच्या फांदीवर गप्पा मारायला बोलवत आहे.

3. मधमाशी बाहेर कशासाठी आली आहे?
उत्तर:
मधमाशी बाहेर मध गोळा करण्यासाठी आली आहे.

4. कोणत्या गोष्टीत आनंद असतो, असे मधमाशी म्हणते.
उत्तरः
कामात मग्न राहण्यात आनंद असतो, असे मधमाशी म्हणते.

5. फुलपाखराला कोणती गोष्ट आवडत नाही?
उत्तरः
मधमाशीला त्याच्याबरोबर गप्पा मारायला वेळ नाही, ह गोष्ट फुलपाखराला आवडत नाही.

6. मधमाशीला मध गोळा करण्याचं काम कोणी दिलं?
उत्तरः
मधमाशीला मध गोळा करण्याचं काम राणीमाशीने दिलं.

7. फुलपाखराने मधमाशीचा कोणता गुण सांगितला आहे?
उत्तरः
मधमाशी इतरांना मोठेपणा देते हा तिचा गुण फुलपाखराने सांगितला आहे.

8. मधमाशीने फुलपाखराचा कोणता गुण सांगितला आहे?
उत्तरः
फुलपाखराचे विचार खूप चांगले आहेत. त्यामुळे त्याला ‘सगळेच चांगले दिसते’ हा फुलपाखराचा गुण मधमाशीने सांगितला आहे.

Q.3 : पुढील प्राण्यांचे कंसात दिलेले गुण निवडून लिहा.
(प्रयत्नशील, कामसू, इमानदार, लबाड, दयाळू, चपळता, वेगवान, मेहनती)

घोडा – वेगवान
कोळी – प्रयत्नशील
मासे – चपळता
मधमाशी – कामसू
चिमणी – मेहनती
कुत्रा – इमानदार
गाय – दयाळू
कोल्हा – लबाड

थोडक्यात उत्तरे लिहा.

Q.4 : फुलपाखराने आणि मधमाशीने सकाळचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे?

उत्तरः फुलपाखरू व मधमाशीने सकाळचे वर्णन खालील प्रकारे केले.
फुलपाखरू आणि मधमाशी हे दोघे एका सकाळी बागेत भेटले. फुलपाखरू म्हणाले, “आजची सकाळ किती सुंदर आहे. बागेतील फुलझाडं किती सुंदर दिसत आहेत. फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळत आहे.” त्यावर मधमाशी म्हणाली, “कारंजे थईथुई नाचत आहेत, मंद वारा सुटला आहे. सगळं कसं छान वाटतंय.”

Q.5 : व्याकरण व भाषाभ्यास: | Fulpakharu Ani Madhamashi

1. खालील शब्दार्थांचा अर्थपूर्ण वाक्यात उपयोग करा.
उत्तरः

स्वच्छंदपणे – मुलांना स्वच्छंदपणे फिरून दयाव.
सवड – आवडत्या कामासाठी आपल्याला सवड मिळते.
मग्न – देवज्ञ अभ्यासात मग्न होता.

2. ‘दार’ शब्द जोडा व नवीन शब्द तयार करा.

बलुते – बलुतेदार
मामले – मामलेदार
किल्ला – किल्लेदार

3. समानार्थी शब्द लिहा.

सकाळ – प्रभात
बाग – उदयान, उपवन
सुवास – सुगंध
मंद – हळू
मजा – मौज
मध – मकरंद
मन – चित्त
सवड – वेळ

4. वचन बदला. | Fulpakharu Ani Madhamashi

कारंजा – कारंजे
वारा – वारे
फांदी – फांदया
मधमाशी – मधमाशा
फुलपाखरू – फुलपाखरे
माणूस – माणसे
डोळा – डोळे

Essay Topics List in Marathi, Hindi, and English:

Other Essays:

➥ Essay on My School in English
➦ मेरा विद्यालय पर निबंध
➥ Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
➦ Essay on tree in Marathi
➥ माझी शाळा निबंध मराठी
➦ My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
➥ जर मी ढग असतो तर :

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *