निबंध :

1. माझा आवडता ऋतू-पावसाळा - निबंध (Around 300 words)

2. माझा आवडता ऋतू-पावसाळा - निबंध (Around 200 words):

3. माझा आवडता ऋतू-पावसाळा - निबंध (Around 100 words):1. माझा आवडता ऋतू-पावसाळा (Around 300 words):(Go Top)

pavasala आपल्या भारतात मुख्यतः तीन ऋतू आहेत. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा. प्रत्येक ऋतू साधारणतः चार-चार महिन्याचे असतात. यातील पावसाळा हा माझा सर्वात आवडता ऋतू आहे.

पावसाळा सुरु होण्या आगोदर उन्हाळ्याचे राज्य असते, उन्हाच्या गर्मीने सर्व जण त्रासून गेलेले असतात. उन्हाने अंगाची होणारी लाही, घामाच्या येणाऱ्या धारा या सर्वानी मन अगदी त्रस्त झालेले असते. हे त्रस्त झालेले मन, मग पावसाची आतुरतेने वाट पाहत राहत, अगदी चातक पक्ष्या हुन जास्त. कधी एकदाचा हा पाऊस सुरु होतो आणि आमच्या मनाला शांत करून सर्वत्र गारवा पसरवतो.

अखेर तो दिवस येतो, अचानक ढग जमा होऊ लागतात. जोराचा वारा सुटतो, धूळ हि उडू लागते आणि या धुळी सोबत कधी पावसाची रिमझिम सुरु होते ते कळतही नाही. क्षणात वातावरण बदलून जाते. हैराण, परेशान आम्ही मित्र नाचू लागतो, पावसात भिजतो. पहिल्या पावसात भिजण्याची मजा काही वेगळीच. पहिल्या पावसाने भिजलेल्या मातीचा सुगंध, अतुलनीय असतो, मला हा सुगंध पुन्हा-पुन्हा साठवून ठेवावसा वाटतो.

पावसामुळे सर्व कडे आनंद पसरतो, झाडे हिरवीगार होतात. काही दिवसांनी पृथ्वी हि हिरवीगार शाल पांघरून घेते. वातावरणात हवेचा गारवा जाणवू लागतो. नद्या पुन्हा जोराने वाहू लागतात. तलावे, धरणे भरली जातात. खास करून शेतकरी राजा खुश होतो. शेतीच्या कामला सुरुवात होते.

आम्हा मुलांनाही शाळेत जायला आवडते. शाळेची हि सुरवात याच वेळी झालेली असते. नवीन रेनकोट, गमबूट, छत्री नुसती मज्जाच मजा असते. शाळेतून येताना पावसात भिजणं, वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडण्याची मज्जा म्हणजे अवर्णनीय असते. रिमझिम पावसात इंद्रधनुष्याची सप्तरंगी कमान हि बघायला मिळते. पावसात पक्षी हि खूप आनंदी होतात, ते हि पावसात भिजतात, मोर नाचू लागतात. एकंदर सगळीकडे आनंदी-आनंद असतो.


पावसाचे काही चांगले तसेच काही वाईट परिणाम होतात. कधी-कधी खूप छान वाटणारा हा पाऊस रौद्र रूप धारण करतो. सोसाट्याचा वारा सुटतो मुसळधार पाऊस कोसळू लागतो. आणि मग सगळीकडे हाःहाकार होतो. नद्या-नाले भरून पूर येतो. गावेच्या-गावे वाहून जातात सर्व जनजीवन विस्कळीत होतं. अतोनात जीवित हानी आणि वित्तयहानी हि होते.

पण काहीही असलं तरी पाऊस हा आवश्यक आहे. पाऊसामुळे आपल्याला पिण्यासाठी आणि इतर जीवनावश्यक

गोष्टींसाठी पाणी मिळते. खरं तर पावसाचे फायदेच जास्त आहेत आणि म्हणूनच मला पावसाळा जास्त, जास्त आणि खूप जास्त आवडतो.

============================

2. माझा आवडता ऋतू-पावसाळा (Around 200 words):(Go Top)

आपल्या भारतात मुख्यतः तीन ऋतू आहेत. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा. प्रत्येक ऋतू साधारणतः चार-चार महिन्याचे असतात. यातील पावसाळा हा माझा सर्वात आवडता ऋतू आहे. पावसाळा सुरु होण्या आगोदर उन्हाच्या गर्मीने सर्व जण त्रासून गेलेले असतात. सर्व जण पावसाची आतुरतेने वाट पाहत राहत.

अचानक ढग जमा होऊ लागतात. जोराचा वारा सुटतो आणि पावसाची रिमझिम सुरु होते. क्षणात वातावरण बदलून जाते. आम्ही सारे मित्र नाचू लागतो, पावसात भिजु लागतो. पहिल्या पावसाने भिजलेल्या मातीचा सुगंध हि खूप असतो.

पावसामुळे झाडे हिरवीगार होतात. काही दिवसांनी पृथ्वी हि हिरवीगार शाल पांघरून घेते. नद्या पुन्हा जोराने वाहू लागतात. तलावे, धरणे भरली जातात. खास करून शेतकरी राजा खुश होतो. शेतीच्या कामला सुरुवात होते.


पावसात आम्हा मुलांनाही शाळेत जायला आवडते. नवीन रेनकोट, गमबूट, छत्री नुसती मज्जाच मजा असते. शाळेतून येताना पावसात भिजतो, वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडतो. रिमझिम पावसात इंद्रधनुष्याची सप्तरंगी कामान हि बघायला मिळते.

पावसाचे काही चांगले तसेच काही वाईट परिणाम ही होतात. खूप छान वाटणारा हा पाऊस कधी-कधी रौद्र रूप धारण करतो. मुसळधार पाऊस कोसळू लागतो आणि मग सर्वकडे हाःहाकार होतो. नद्या-नाले भरून पूर येतो. गावेच्या-गावे वाहून जातात सर्व जनजीवन विस्कळीत होतं. अतोनात जीवित हानी होते.

पण काहीही असलं तरी पाऊस हा आवश्यक आहे. पाऊसामुळे आपल्याला पिण्यासाठी आणि इतर जीवनावश्यक

गोष्टींसाठी पाणी मिळते. खरं तर पावसाचे फायदेच जास्त आहेत आणि म्हणूनच मला पावसाळा जास्त आवडतो.

============================


3. माझा आवडता ऋतू-पावसाळा (Around 100 words):(Go Top)

माझा आवडता ऋतू पावसाळा आहे. पावसाची रिमझिम सुरु होते तेंव्हा थोड्याच वेळात वातावरण बदलून जाते. आम्ही सारे मित्र नाचू लागतो, पावसात भिजतो, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवतो, खूप मज्जा करतो .

पावसामुळे झाडे हिरवीगार होतात. काही दिवसांनी पृथ्वी हि हिरवीगार होऊन जाते. नद्या जोराने वाहू लागतात. तलावे, धरणे भरली जातात. खास करून शेतकरी खुश होतो. शेतीच्या कामला सुरुवात होते.


पावसात आम्हा मुलांनाही शाळेत जायला आवडते. नवीन रेनकोट, गमबूट, छत्री नुसती मज्जाच मजा असते. शाळेतून येताना पावसात भिजतो, वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडतो. जास्त पाऊस पडल्याने कधी-कधी शाळेला सुट्टी हि मिळते. रिमझिम पावसात इंद्रधनुष्याची सप्तरंगी कामान हि बघायला मिळते.

पाऊस हा आवश्यक आहे. पाऊसामुळे आपल्याला पिण्यासाठी आणि इतर जीवनावश्यक गोष्टींसाठी पाणी मिळते. खरं तर पावसाचे फायदेच जास्त आहेत आणि म्हणूनच मला पावसाळा जास्त आवडतो.

Check our Craft Channel

About Smart School Infolips


Complete the surveys and make money on Swagbucks

Craft

Visit our Informative site:
Infolips.com

Infolips

From Smart School