Adjective in Marathi
मराठी जग

Adjective in Marathi | विशेषण व विशेषणाचे प्रकार

Adjective in Marathi : Complete informaration about Adjective in Marathi | Visheshan v Visheshanache Prakar.

विशेषण :

नामाबद्दल विशेष किंवा अधिक माहिती देणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात.

उदा. :
➥ भावी खूप सुंदर आहे.
➥ परी एक प्रामाणिक विद्यार्थीनी आहे.

विशेषण ओळखणे खूप सोपे आहे. प्रथम वाक्यातील नाम किंवा सर्वनाम ओळखा. मग त्याला कसे, किती, कशी, कुठे असे प्रश्न विचारा.

➤ वरील वाक्यात “भावी”, “परी” हे संज्ञा (नाम) आहेत. आणि “सुंदर” आणि “प्रामाणिक” ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.

⤳ भावी कशी आहे ? – मग आपल्याला उत्तर मिळेल | (सुंदर)
⤳ परी कशी विद्यार्थीनी आहे ? – मग आपल्याला उत्तर मिळेल | (प्रामाणिक)

– म्हणून “सुंदर” आणि “प्रामाणिक” हे दोन्ही विशेषण आहेत.

(* कर्ता : वाक्यात येणारे नाम किंवा सर्वनाम यास कर्ता असे म्हणतात. )

विशेष्य म्हणजे काय ?
 विशेष्य : वाक्यात ज्या कर्ता किंवा सर्वनामाची विशेषता सांगितली जाते त्यास विशेष्य असे म्हणतात.
– म्हणून : “भावी” आणि “परी” हे दोन्ही विशेष्य आहेत.

विशेषणाचे प्रकार :

➽ विशेषणाचे प्रकार : विशेषणाचे एकूण आठ प्रकार आहेत.
१] गुणवाचक विशेषण
२] परिमाणवाचक विशेषण
३] सार्वनामिक/ संकेतवाचक विशेषण
४] संख्यावाचक विशेषण
५] प्रश्नवाचक विशेषण
६] संबंधवाचक विशेषण
७] व्यक्तिवाचक विशेषण
८] तुलनाबोधक विशेषण

➤ चला प्रत्येक प्रकार तपशीलवार पाहू.

१] गुणवाचक विशेषण (Qualitative Adjective) :

ज्या विशेषण शब्दामुळे कर्त्याचे रंग, रूप, आकार, गुण आणि अवगुण यांचे वर्णन केले जाते त्या शब्दास गुणात्मक विशेषण असे म्हणतात.
उदा. :
➥ भारत जगातील सर्वात सुंदर देश आहे.
➦ जपान खूप प्रगत देश आहे.
➥ वेदांती गोड फळ खाते.

➤ वरील वाक्यात “सुंदर”, “प्रगत” आणि “गोड” ही विशेषणे आहेत.

२] परिमाणवाचक विशेषण (Quantitative Adjective):

ज्या विशेषण शब्दामुळे कर्त्याचे प्रमाण, परिमाण किंवा माप-वजन यांचा संबंध सांगितलं जातो त्या शब्दास परिमाणवाचक विशेषण असे म्हणतात.
उदा. :
➥ हर्ष अर्धा लीटर दूध पितो.
➦ तन्मयी थोडेचं जेवण करते.
➥ हर्षालीने काही मिटर कपडा आणला.

➤ वरील वाक्यात “अर्धा लीटर”, “थोडेचं” आणि “काही मिटर” ही विशेषणे आहेत.

या मध्येही विशेषणाचे दोन प्रकार आहेत.

अ) निश्चित परिमाणवाचक विशेषण :

ज्या विशेषण शब्दामुळे कर्त्याचे निश्चित परिमाण किंवा माप-वजन यांचा संबंध सांगितलं जातो त्या शब्दास निश्चित परिमाणवाचक विशेषण असे म्हणतात.
उदा. : अर्धा लीटर, दहा क्विंटल.

आ) अनिश्चित परिमाणवाचक विशेषण :

ज्या विशेषण शब्दामुळे कर्त्याचे अनिश्चित परिमाण किंवा माप-वजन यांचा संबंध सांगितलं जातो त्या शब्दास अनिश्चित परिमाणवाचक विशेषण असे म्हणतात.
उदा. : काही लीटर, इतका क्विंटल, जास्त पुस्तके.

नाम म्हणजे काय ? : एखाद्या व्यक्तिला, वस्तुला, पक्षांना, प्राण्यांना, एखाद्या ठिकाणाला तसेच काल्पनिक घटक, व्यक्तीच्या भावना किंवा… Read more…

३] सार्वनामिक/ संकेतवाचक विशेषण :

सार्वनामिक/ संकेतवाचक विशेषण (Pronominal or Demonstrative Adjective) : जो सर्वनाम शब्द नामाच्या अगोदर येऊन नामाची विशेषता सांगतो त्यास सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. हा विशेषण शब्द नाम किंवा सर्वनाम कडे संकेत दाखवतो.
उदा. :
➥ तो मुलगा चांगलं काम करतो.
➦ कोण आहे जो सर्वात चांगला आहे.
➥ ही एक आश्वासक मुलगी आहे.

➤ वरील वाक्यात “तो”, “जो” आणि “ही” ही विशेषणे आहेत.

४] संख्यावाचक विशेषण (Numeral Adjective):

ज्या विशेषण शब्दामुळे कर्त्याची विशेषता संख्येमध्ये दर्शविली जाते त्या शब्दास संख्यावाचक विशेषण असे म्हणतात.
उदा. :
➥ आशिष ने दोन फळे खाल्ली.
➦ विशालच्या घरी पाच लोक आहेत.
➥ हर्षालीने चार लीटर दूध आणले.

➤ वरील वाक्यात “दोन”, “पाच” आणि “चार” ही विशेषणे आहेत.

➤ संख्यावाचक विशेषणाचे खालील प्रमाणे उप प्रकार आहेत.
➥ गणना वाचक संख्या विशेषण : उदा. – बारा फुले, दहा रुपये.
➥ क्रम वाचक संख्या विशेषण : उदा. – पहिला घर, दहावा बाक.
➦ आवृत्ती वाचक संख्या विशेषण :उदा. – दुप्पट फायदा, तिप्पट पैसे.
➥ पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण :उदा. – दहा-दहा, चार-चार.
➥ अनिश्चित संख्या विशेषण : उदा. – काही हार, थोडे पाणी.

५] प्रश्नवाचक विशेषण (Interrogative Adjective) :

ज्या विशेषण शब्दामुळे कर्ताला जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारला जातो त्या शब्दास प्रश्नवाचक विशेषण असे म्हणतात.
उदा. :
➥ तू कोणती वस्तू घेऊन आला ?
➦ घरात खाण्यासाठी काय आहे?
➥ तू कोठे जाणार आहेस ?

➤ वरील वाक्यात “कोणती”, “काय” आणि “कोठे” ही विशेषणे आहेत.

नामाचे प्रकार : नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत :… Read more…

६] संबंधवाचक विशेषण (Relational Adjective) :

ज्या विशेषण शब्दामुळे एका कर्ताचा संबंध दुसऱ्या कर्त्या सोबत जोडला जातो त्या शब्दास संबंधवाचक विशेषण असे म्हणतात.
उदा. :
➥ पृथ्वीच्या केंद्रस्थानी खूप उष्णता असते.

➤ वरील वाक्यात “च्या” आणि “नी” हे विशेषण आहेत.

७] व्यक्तिवाचक विशेषण :(Nouns Adjective) :

जो विशेषण शब्द व्यक्तिवाचक संज्ञा पासून बनतो व विशेषण म्हणून वापरला जातो त्या शब्दास व्यक्तिवाचक विशेषण असे म्हणतात.
उदा. :
➥ आमच्या कडे बीकानेरी मिठाई मिळते.
➦ पैठणी साड्या जगात प्रसिद्ध आहेत.
➥ मला भारतीय जेवण खूप आवडतो.

➤ वरील वाक्यात “बीकानेरी”, “पैठणी” आणि “भारतीय” ही विशेषणे आहेत.

८] तुलनाबोधक विशेषण : (Comparative Adjective) :

ज्या विशेषण शब्दामुळे एका कर्ताची तुलना दुसऱ्या कर्त्या सोबत केली जाते त्या शब्दास तुलनाबोधक विशेषण असे म्हणतात.
उदा. :
➥ आपलं मन हवेपेक्षा हि जोरात धावतं.
➦ साधारण लोकांपेक्षा हि सैनिकाचे जीवन जास्त जोखमीचं.
➥ पूर्ण जगा मध्ये माझा भारत देश खूप सुंदर आहे.

➤ वरील वाक्यात, “पेक्षा”, “पेक्षा” आणि “मध्ये” ही विशेषण आहेत.

[ays_quiz id=’37’]

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :

List of adjectives in Marathi, adjective – Meaning in Marathi, Marathi Adjectives, adjective meaning in marathi, types of adjective in marathi, adjective of quality in marathi, विशेषण शब्द लिस्ट मराठी, adjective words, adjective examples, marathi adjectives for food, adjective meaning in marathi definition, marathi adjectives for beautiful.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *