GK

Bharatmata – भारतमाता | Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 1 : – Textbook Questions and Answers

Bharatmata – भारतमाता | Class 6 Solutions Chapter 1 – Textbook All Questions and Answers

शब्दार्थ:

प्रियतम – आवडती, प्रियकर (darling)
अमुची – आपली (ours’)
गंध – वास (odour, smell)
माती – मृत्तिका (earth, soil)
डुलणारी – वाऱ्यावर हलणारी (oscillating)
शेते – शेती (farming)
धवल – पांढराशुभ्र, सफेद (white)
भिडणे – पोहोचणे (to meet)
गगन – आकाश (sky)
सयविंध्य – सह्याद्री, विंध्याचल पर्वत (Sahyadri)
मानव – माणूस (human being)
शिकवण – उपदेश (to advise, teaching)
सद्गुणी – गुणवान (virtuous)
सदा – नेहमी (always)
ध्वज – झेंडा (flag)
वंदन – नमस्कार (salutation)

प्रश्न 1. रिकाम्या जागा भरा.

रंग वेगळे ……….. वेगळे, तरी येथली सर्व फुले.
मानव सारे ………… असती, शिकवण ही जगतास दिली.
या मातेची मुले ………. सदा तिचा ध्वज उंच धरु.
प्रियतम अमुचे …………… हे, प्रियतम या गंगा जमुना.

उत्तर:
गंध
समान
सद्गुणी
सह्यविंध्य

प्रश्न 2. जोड्या जुळवा.
‘अ’ गट —————‘ब’ गट
1. पाणी ————– (अ) डुलणारी
2. हिमालय ————(ब) सळसळते
3. वारे —————-(क) धवल
4. भारतमाता ———-(ड) झुळझुळते
5. शेते —————-(इ) प्रियतम

उत्तर:
पाणी – – – – – – – – – – (ड) झुळझुळते
हिमालय – – – – – – – – (क) धवल
वारे – – – – – – – – – – – (ब) सळसळते
भारतमाता – – – – – – – (इ) प्रियतम
शेते – – – – – – – – – – – (अ) डुलणारी

प्रश्न 3. कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा.

प्रियतम अमुची …………………. तिची मुले.
रंग वेगळे …………….. सर्व फुले.
प्रिय आम्हाला …………… झुळझुळते.
प्रियकर ही डुलणारी ……………. सळसळते.
प्रियतम आमुचा ………….. जो गगना.
प्रियतम अमुचे सह्यविंध्य …………. जमुना.
या मातेची …………. प्रिय झाली.
या मातेची ………….. उंच धरु.

उत्तर:
भारतमाता, आम्ही सारी
गंध वेगळे, तरी येथली
येथील माती, प्रिय हे पाणा
शेते, प्रिय हे वारे
धवल हिमालय, बघे भिडाया
हे, प्रियतम या गंगा
मुले सद्गुणी, सर्व जगाला
मुले लाडकी, सदा तिचा ध्वज प्रश्न
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 4. सारी मुले कुणाची आहेत?
उत्तर: सारी मुले भारतमातेची आहेत.

प्रश्न 5. फुले कशी आहेत?
उत्तर: फुले विविध रंगांची व गंधाची आहेत.

प्रश्न 3. हिमालय कसा आहे?
उत्तर: हिमालय धवल व गगनाला भिडणारा आहे.

प्रश्न 4. भारतमातेने जगतास कोणती शिकवण दिली?
उत्तर: सारे मानव समान आहेत ही शिकवण भारतमातेने जगतास दिली.

प्रश्न 5. भारतमातेची मुले काय करणार आहेत?
उत्तर: भारतमातेची मुले ध्वज उंच करणार आहेत.

खालील प्रश्नांची दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.कवयित्रीला कोण कोण प्रिय आहे?
उत्तर: कवयित्रीला भारतमाता, सर्व फुले, माती, पाणी, शेते, वारे, हिमालय, सह्याद्री व विध्य पर्वत, गंगा, जमुना, सर्व मुले प्रिय आहेत.

प्रश्न 2. भारतमातेची मुले कशी आहेत? त्यांनी कोणती शिकवण दिली?
उत्तर: भारतमातेची मुले सद्गुणी आहेत. त्यांनी मानव सारे समान आहेत ही शिकवण सर्व जगाला दिली.

प्रश्न 3. भारतमातेविषयी कृतज्ञता कशी व्यक्त केली आहे?
उत्तर:
भारतमाता सर्वांना प्रिय आहे. तिला सर्व वंदन करत आहेत. तिचा ध्वज उंच फडकवून तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

व्याकरण व भाषाभ्यास:

प्रश्न 1. वचन बदला.

मुलगा
माती
पाणी
नदी
किडा
भाजी
घर
झाड
शेत

उत्तर :
मुलगा – मुले
माती – माती
पाणी – पाणी
नदी – नदया
किडा – किडे
भाजी – भाज्या
घर – घरे
झाड – झाडे
शेत – शेते

प्रश्न 2. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

वंदन
माता
सदा
गंध
लाडकी

उत्तर:
वंदन – नमस्कार
माता – आई
सदा – नेहमी
गंध – सुवास
लाडकी – आवडती, प्रिय


प्रश्न 3. खालील शब्दांचे विरूद्धार्थी अर्थाचे शब्द लिहा.

प्रियतम
समान
उंच
सद्गुणी

उत्तर:

प्रियतम x अप्रिय
समान x असमान
उंच x बुटका, ठेंगणा
सद्गुणी x दुर्गुणी


प्रश्न 4. कवितेमध्ये आलेले यमक जुळणारे शब्द शोधा.

मुले
झुळझुळते
गगना
दिली
करू

उत्तर:

मुले – फुले
झुळझुळते – सळसळते
गगना – जमुना
दिली – झाली
करू – धरू

इतर विभाग प्रश्न :

प्रश्न 1. ‘भारतमाता’ शब्द वापरून चार वाक्ये लिहा.
उत्तर:

भारतमाता आम्हाला प्रिय आहे.
आम्ही भारतमातेला वंदन करू.
भारतमातेचा ध्वज उंच धरू,
आम्ही भारतमातेची मुले आहोत.


प्रश्न 2. भारतमाता विविध गोष्टींनी नटलेली आहे. चौकटीत त्यांची नावे लिहा.
उत्तर:

हिमालय
फुले
माती
पाणी
गंगा, जमुना
सयविंध्य

भारतमाता – Short Summary in Marathi

काव्य परिचय:
भारतमाता ही भारतभूमीचे वैशिष्ट्य सांगणारी कविता आहे. भारताच्या मातीत विविधता आहे. निसर्ग भरभरून फुलला आहे. उंच उंच पर्वतरांगा आहेत. हिची प्रजा गुणी असून जगतासाठी आदर्श आहे. भारतमाते विषयी आदर व कृतज्ञता बाळगून आपण तिचा गौरव वाढवू या. तसेच हा ध्वज उंच फडकवू या. हा अर्थ या कवितेतून व्यक्त होतो.

I hope you like this information of Greatest Inventions in the human history.

Essay Topics List in Marathi, Hindi, and English:

English Essay

Question Answer for All Standard

हिंदी निबंध

Accordion title 5

Other Essays:

➥ Essay on My School in English
➦ मेरा विद्यालय पर निबंध
➥ Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
➦ Essay on tree in Marathi
➥ माझी शाळा निबंध मराठी
➦ My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
➥ जर मी ढग असतो तर :

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *