Batmi Lekhan in Marathi
निबंध/ Essay/Nibandh

Batmi Lekhan in Marathi | बातमी लेखन नियम, 2 नमुने

Batmi Lekhan in Marathi | बातमी लेखन नियम व नमुने: Batami Lekhan in Marahi

Batmi lekhan format, batmi lekhan in marathi 10th class, 8th class, 9th class,

इयत्ता १०वी च्या कुमारभारती विषयात, उपयोजित लेखन या प्रकारा खाली “बातमी लेखन” विषयावर प्रश्न विचारला जातो.
उपयोजित लेखनातील लेखन कौशल्य, बातमी लेखन यामुळे विदयार्थ्याना एखाद्या खडलेल्या घटनेवर, कसे लेखन करावे, कोणते विचार मांडावे आणि कश्या शब्दात ते प्रकट करावे या गोष्टींचा सराव होतो. त्यामुळेच हा विषय तुमच्या साठी पाठयपुस्तकात समाविष्ट केलेला आहे. जर तुम्हाला लिखाणाची, वाचनाची आवड असेल तर हे क्षेत्र तुम्ही निवडू शकता. (Batmi Lekhan in Marathi)

बातमी लेखनाचे विविध पैलू पाहूया :


आपल्या समाजात आजूबाजूला रोज असंख्य घटना घटत असतात. या घटनांची माहिती, किंवा चालू स्थितीची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचविणे. एखादी घटना किंवा प्रसंग लोकांना कळावा म्हणून त्याची वर्तमानपत्रात माहीती प्रसारित करणे म्हणजे बातमी लेखन होय.

बातमी म्हणजे काय? :

परंतु प्रत्येक घटना बातमी होऊ शकत नाही. उदा० मुलगा शाळेत गेला ही घटना बातमी होऊ शकत नाही, पण मुलगा शाळेत ना जाता १० पास झाला ही बातमी होऊ शकते. अर्थात एखादी घटना बातमी होण्यासाठी त्या घटनेत काहीतरी वेगळेपण असावे लागते.
मग त्या घटना राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, करमणूक, व्यापारविषयक अशा विविध क्षेत्रातील घडामोडीवर बातमी लेखन केले जाते. (Batmi Lekhan in Marathi)

बातमी लेखनाचे गुण मूल्यांकन :

बातमीचे शीर्षक
तटस्थ भूमिकेतील लेखन.
(म्हणजे घडलेली घटना ही तुमच्या संबंधित नसून, एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून बातमी लेखन करावे)
घटनेचा योग्य आणि मोजक्या शब्दात तपशील द्यावा
भाषा शैली साठी

वृत्त/ बातमी लेखनाचे नियम :

(Some information about Batmi Lekhan in Marathi)
१) शीर्षक: बातमीला योग्य शीर्षक द्यावा. बातमीच्या शीर्षकात बातमीचे स्वरूप असावे. शीर्षकावरून वाचकांच्या मनात बातमी वाचण्याची उत्कंठा निर्माण झाली पाहिजे.

२) वृत्ताची सुरुवात: शीर्षकानंतर एका ओळीत बातमीचा स्रोत लिहावा. जसे बातमी कोणत्या भागातील आहे आणि बातमी कोणी दिली आहे.
उदा : ‘आमच्या वार्ताहरांकडून’, ‘आमच्या प्रतिनिधींकडून’

३) स्थळ व दिनांक: बातमीचा ठिकाण आणि दिनांक :
उदा: मुंबई, दि.२४ नोव्हेंबर, नवी मुंबई, १७ मे.

४) सविस्तर बातमी : बातमी २ ते ३ परिच्छेदात असावी. पहिल्या परिच्छेदात बातमीचा महत्वाचा भाग लिहिलेला असावा, त्यावरून बातमी कशाची आहे ते समजले जाऊन बातमी वाचण्याची ओढ निर्माण व्हावी.

वृत्त/ बातमी लेखनाचे नियम :

(Rules of Batmi Lekhan in Marathi)
नंतर पूर्ण बातमी सविस्तर लिहावी. बातमी लिहिताना खालील मुद्दे लक्षात घ्यावे.
➨ घटनेचा अचूक तपशील द्यावा.
➨ लेखन घटने पुरतेच मर्यादित असावे. अवास्तव लेखन करू नये.
➨ कार्यक्रमाचा घटना क्रम नीट मांडावा. बातमी वास्तविक असावी.
➨ लेखन भूतकाळात केलेले असावे.
➨ समारंभाची बातमी असल्यास, अध्यक्ष, आयोजक, प्रमुख पाहुणे कोण यांचा उल्लेख करावा.

उदाहरण-१:

(Example of Batmi Lekhan in Marathi)
शीर्षक : अरुणोदय” सोसायटीतील २०२२ चा नवरात्रौत्सव
सीवूड्स, नवी मुंबई, दि. ६ सप्टेंबर : आमच्या वार्ताहरांकडून :

कालच दसरा संपला आणि नवरात्रीच्या उत्सवाची सांगता झाली. दि. २६ सप्टेंबर तो ५ ऑक्टोबर या दिवसात संपन्न झालेला, यावर्षीचा नवरात्री उत्सव, अरुणोदय सोसायटी साठी खूप महत्वाचा आणि वेगळाच होता.

“अरुणोदय” सोसायटीत २०२२ चा जल्लोषात आणि मोठ्या थाटात साजरा केलेला हा उत्सव खऱ्या अर्थाने वेगळा होता. सर्वात महत्वाचे म्हणजे यावेळी तरुणाईचा सहभाग फार मोठा होता. तरुण वयोगटातील मुला-मुलींनी मनापासून उपवास केला होता. पूर्ण १० दिवस ही सर्व मुले अनवाणी वावरत होती. त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि आनंद पाहून वयस्क मंडळीला ही जोर चढत होता.

मुलांनी केलेली देवीच्या मंडपाची आरास खूप छान दिसत होती. त्यात स्वच्छतेचे महत्व सांगणारी शिल्प, आत्मनिर्भर बनणाऱ्या भारताचे चित्र. झाडे लावा झाडे जगवा असे सांगणारी छोट्या मुलांची आवडती कार्टून्स. पाण्याचा वापर कसा करावा हे दाखवणारी चित्रफीत. सर्वकाही वाखाण्याजोगं होतं. सारे उपक्रम लोकांच्या दृष्टीस पडतील अशी योजनाबद्ध मांडणी. प्रसादाचे वितरण. दुपारी सांस्कृतिक छोट्या मोठ्यांचे खेळ. भजन कीर्तनाचे कार्यक्रम. शाळेतील मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा. रोज रात्री गरबा आणि दांडियाचे योग्य नियोजन. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, आरतीचा होणार जयघोष. त्यातूनच मनमुराद आनंद घेणारी सर्व भक्तगण.

या सर्वात जेंव्हा तरुणाई पुढे होऊन येते तेंव्हा मनाला खूप दिलासा मिळतो. येणारी पिढी आपल्या संस्कृतीचा वारसा असाच पुढे चालू ठेवतील यात शंका वाटत नाही. भरतील सर्व मंडळांनी हे केले तर, भारताची प्रगती अजून वाढेल आणि संस्कृती फुलेल. खऱ्या अर्थाने नवरात्री उत्सव साजरा होईल.

उदाहरण-२:

(Example 2 of Batmi Lekhan in Marathi)
नमुना कृती : खालील विषयावर बातमी तयार करा. (Mar 20)
नवमहाराष्ट्र विद्यालय, शिरवळ या विद्यालयात शिक्षक दिन साजरा झाला. या समारंभाची बातमी तयार करा.

नवमहाराष्ट्र विद्यालयात साजरा झालेला “शिक्षक दिन”

शिरवळ, दनांक ६ सप्टेंबर : आमच्या वार्ताहरा कडून,

५ सप्टेंबर या दिवशी नवमहाराष्ट्र विद्यालयात मोठ्या उत्साहात “शिक्षक दिन” साजरा करण्यात आली. शिक्षक दिनानिमित्त शाळेत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. सुधाकरराव कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला हार घालून पूजन केले. दीप प्रज्वलित करून समारंभास सुरुवात केली. शाळेतील विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या भाषांतून शाळेचे आणि शिक्षणाचे कौतुक केले.

अध्यक्ष, प्रमुख पाहुणे त्यांचे मनोगत व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपले मत व्यक्त करताना. शाळा आणि शिक्षण यांच्यात शिक्षक किती महत्वाची भूमिका निभावतात ते स्पष्ट केले. मोठं-मोठ्या नामवंतांची शिक्षणा विषयीचे मते सांगितली. मुलांच्या मनात शिक्षकांविषयी आदर निर्माण व्हावा यासाठी मार्गदर्शन केले. कार्क्रमाच्या शेवटी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सर्व विध्यार्थ्यानी चांगले सहकार्य केल्या बद्दल त्यांचे विशेष कौतुक करून कार्यक्रमाची सांगता केली.

(All about Batmi Lekhan in Marathi)

Other Essays:

➥ Essay on My School in English
➦ मेरा विद्यालय पर निबंध
➥ Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
➦ Essay on tree in Marathi
➥ माझी शाळा निबंध मराठी
➦ My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
➥ जर मी ढग असतो तर :

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech

4 Replies to “Batmi Lekhan in Marathi | बातमी लेखन नियम, 2 नमुने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *