Visheshan - Samart School

विशेषण :

नामाबद्दल विशेष किंवा अधिक माहिती देणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात.

उदा. :
➥ भावी खूप सुंदर आहे.
➥ परी एक प्रामाणिक विद्यार्थीनी आहे.

विशेषण ओळखणे खूप सोपे आहे. प्रथम वाक्यातील नाम किंवा सर्वनाम ओळखा. मग त्याला कसे, किती, कशी, कुठे असे प्रश्न विचारा.

➤ वरील वाक्यात "भावी", "परी" हे संज्ञा (नाम) आहेत. आणि "सुंदर" आणि "प्रामाणिक" ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.

⤳ भावी कशी आहे ? - मग आपल्याला उत्तर मिळेल | (सुंदर)
⤳ परी कशी विद्यार्थीनी आहे ? - मग आपल्याला उत्तर मिळेल | (प्रामाणिक)

- म्हणून "सुंदर" आणि "प्रामाणिक" हे दोन्ही विशेषण आहेत.

(* कर्ता : वाक्यात येणारे नाम किंवा सर्वनाम यास कर्ता असे म्हणतात. )

विशेष्य म्हणजे काय ?
विशेष्य : वाक्यात ज्या कर्ता किंवा सर्वनामाची विशेषता सांगितली जाते त्यास विशेष्य असे म्हणतात.
- म्हणून : "भावी" आणि "परी" हे दोन्ही विशेष्य आहेत.

➽ विशेषणाचे प्रकार : विशेषणाचे एकूण आठ प्रकार आहेत.
१] गुणवाचक विशेषण
२] परिमाणवाचक विशेषण
३] सार्वनामिक/ संकेतवाचक विशेषण
४] संख्यावाचक विशेषण
५] प्रश्नवाचक विशेषण
६] संबंधवाचक विशेषण
७] व्यक्तिवाचक विशेषण
८] तुलनाबोधक विशेषण

➤ चला प्रत्येक प्रकार तपशीलवार पाहू.

१] गुणवाचक विशेषण (Qualitative Adjective) :

ज्या विशेषण शब्दामुळे कर्त्याचे रंग, रूप, आकार, गुण आणि अवगुण यांचे वर्णन केले जाते त्या शब्दास गुणात्मक विशेषण असे म्हणतात.
उदा. :
➥ भारत जगातील सर्वात सुंदर देश आहे.
➥ जपान खूप प्रगत देश आहे.
➥ वेदांती गोड फळ खाते.

➤ वरील वाक्यात "सुंदर", "प्रगत" आणि "गोड" ही विशेषणे आहेत.

२] परिमाणवाचक विशेषण (Quantitative Adjective):

ज्या विशेषण शब्दामुळे कर्त्याचे प्रमाण, परिमाण किंवा माप-वजन यांचा संबंध सांगितलं जातो त्या शब्दास परिमाणवाचक विशेषण असे म्हणतात.
उदा. :
➥ हर्ष अर्धा लीटर दूध पितो.
➥ तन्मयी थोडेचं जेवण करते.
➥ हर्षालीने काही मिटर कपडा आणला.

➤ वरील वाक्यात "अर्धा लीटर", "थोडेचं" आणि "काही मिटर" ही विशेषणे आहेत.

या मध्येही विशेषणाचे दोन प्रकार आहेत.

अ) निश्चित परिमाणवाचक विशेषण :

ज्या विशेषण शब्दामुळे कर्त्याचे निश्चित परिमाण किंवा माप-वजन यांचा संबंध सांगितलं जातो त्या शब्दास निश्चित परिमाणवाचक विशेषण असे म्हणतात.
उदा. : अर्धा लीटर, दहा क्विंटल.

आ) अनिश्चित परिमाणवाचक विशेषण :

ज्या विशेषण शब्दामुळे कर्त्याचे अनिश्चित परिमाण किंवा माप-वजन यांचा संबंध सांगितलं जातो त्या शब्दास अनिश्चित परिमाणवाचक विशेषण असे म्हणतात.
उदा. : काही लीटर, इतका क्विंटल, जास्त पुस्तके.


३] सार्वनामिक/ संकेतवाचक विशेषण (Pronominal or Demonstrative Adjective) :

जो सर्वनाम शब्द नामाच्या अगोदर येऊन नामाची विशेषता सांगतो त्यास सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. हा विशेषण शब्द नाम किंवा सर्वनाम कडे संकेत दाखवतो.
उदा. :
➥ तो मुलगा चांगलं काम करतो.
➥ कोण आहे जो सर्वात चांगला आहे.
➥ ही एक आश्वासक मुलगी आहे.

➤ वरील वाक्यात "तो", "जो" आणि "ही" ही विशेषणे आहेत.

४] संख्यावाचक विशेषण (Numeral Adjective):

ज्या विशेषण शब्दामुळे कर्त्याची विशेषता संख्येमध्ये दर्शविली जाते त्या शब्दास संख्यावाचक विशेषण असे म्हणतात.
उदा. :
➥ आशिष ने दोन फळे खाल्ली.
➥ विशालच्या घरी पाच लोक आहेत.
➥ हर्षालीने चार लीटर दूध आणले.

➤ वरील वाक्यात "दोन", "पाच" आणि "चार" ही विशेषणे आहेत.

➤ संख्यावाचक विशेषणाचे खालील प्रमाणे उप प्रकार आहेत.
➥ गणना वाचक संख्या विशेषण : उदा. - बारा फुले, दहा रुपये.
➥ क्रम वाचक संख्या विशेषण : उदा. - पहिला घर, दहावा बाक.
➥ आवृत्ती वाचक संख्या विशेषण :उदा. - दुप्पट फायदा, तिप्पट पैसे.
➥ पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण :उदा. - दहा-दहा, चार-चार.
➥ अनिश्चित संख्या विशेषण : उदा. - काही हार, थोडे पाणी.

५] प्रश्नवाचक विशेषण (Interrogative Adjective) :

ज्या विशेषण शब्दामुळे कर्ताला जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारला जातो त्या शब्दास प्रश्नवाचक विशेषण असे म्हणतात.
उदा. :
➥ तू कोणती वस्तू घेऊन आला ?
➥ घरात खाण्यासाठी काय आहे?
➥ तू कोठे जाणार आहेस ?

➤ वरील वाक्यात "कोणती", "काय" आणि "कोठे" ही विशेषणे आहेत.

Nouns : The name given to a people, objects, birds.... Read more...

६] संबंधवाचक विशेषण (Relational Adjective) :

ज्या विशेषण शब्दामुळे एका कर्ताचा संबंध दुसऱ्या कर्त्या सोबत जोडला जातो त्या शब्दास संबंधवाचक विशेषण असे म्हणतात.
उदा. :
➥ पृथ्वीच्या केंद्रस्थानी खूप उष्णता असते.

➤ वरील वाक्यात "च्या" आणि "नी" हे विशेषण आहेत.

७] व्यक्तिवाचक विशेषण :(Nouns Adjective) :

जो विशेषण शब्द व्यक्तिवाचक संज्ञा पासून बनतो व विशेषण म्हणून वापरला जातो त्या शब्दास व्यक्तिवाचक विशेषण असे म्हणतात.
उदा. :
➥ आमच्या कडे बीकानेरी मिठाई मिळते.
➥ पैठणी साड्या जगात प्रसिद्ध आहेत.
➥ मला भारतीय जेवण खूप आवडतो.

➤ वरील वाक्यात "बीकानेरी", "पैठणी" आणि "भारतीय" ही विशेषणे आहेत.


८] तुलनाबोधक विशेषण : (Comparative Adjective) :

ज्या विशेषण शब्दामुळे एका कर्ताची तुलना दुसऱ्या कर्त्या सोबत केली जाते त्या शब्दास तुलनाबोधक विशेषण असे म्हणतात.
उदा. :
➥ आपलं मन हवेपेक्षा हि जोरात धावतं.
➥ साधारण लोकांपेक्षा हि सैनिकाचे जीवन जास्त जोखमीचं.
➥ पूर्ण जगा मध्ये माझा भारत देश खूप सुंदर आहे.

➤ वरील वाक्यात, "पेक्षा", "पेक्षा" आणि "मध्ये" ही विशेषण आहेत.

मराठी  विशेषण Quiz

-: छोटी प्रश्नोत्तरी :-

खालील छोटी प्रश्नोत्तरी सोबत आपण किती समजले त्याचे परीक्षण करूया.

➤ खालील वाक्यातून विशेषण ओळखा.

१. मनीष अर्धा लीटर दूध पितो.
मनीष
अर्धा
लीटर

२. कोण आहे जो सर्वात मोठा आहे ?
कोण
सर्वात
जो

३. तू कोणती वस्तू घेऊन आला ?
कोणती
वस्तू
आला

➤खालील वाक्यातून विशेषणाचा प्रकार ओळखा.

४. प्राणी हिरवा पाला खातात.
गुणवाचक विशेषण
सार्वनामिक/ संकेतवाचक विशेषण
संबंधवाचक विशेषण

५. आज चंद्र ताऱ्यां पेक्षा जास्त चमकतोय.
सार्वनामिक/ संकेतवाचक विशेषण
तुलनाबोधक विशेषण
संबंधवाचक विशेषण

६. पालिकेच्या इमारतीवर तिरंगा फडकर आहे.
तुलनाबोधक विशेषण
संबंधवाचक विशेषण
सार्वनामिक/ संकेतवाचक विशेषणYour score is:

Correct answers:


Check our Craft Channel

About Smart School Infolips

From Smart School