Samanyarupe, Vibhakti-Smart School Infolips

विराम चिन्हे - मराठी (Punctuation Marks) :


आपण जेव्हा बोलतो तेव्हा काही ठिकाणी थांबावे लागते, या थांबाण्याला विराम असे म्हणतात. लेखन करताना हे थांबे किंवा विराम वाचकास लक्षात येण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्यांनाच 'विराम चिन्हे' असे म्हणतात.

➤संभाषण करताना आपण आवाजात चढ-उतार करून आपले भाव व्यक्त करतो. वाक्य मधेच तोडतो, आश्चर्य व्यक्त करतो, वाक्यातील काही शब्दांवर जोर देतो. काही भावना व्यक्त करताना वाक्याच्या उच्चारात बदल करतो, कधी कमी जास्त वेगात बोलतो. पण या साऱ्या भावना, भाव, हावभाव आपण लेखनात करू शकत नाही, त्या भावना वाचकास समजण्यासाठी विराम चिन्हांचा उपयोग करतात.

➤शब्दातून व्यक्त न होऊ शकलेला आशयही या चिन्हातून व्यक्त करता येतो. म्हणून बोलण्यातील आशय लेखनात येण्यासाठी कोणते विराम चिन्ह कोणत्या ठिकाणी योग्यरितीने वापरने याचे अचूक ज्ञान असणे आवश्यक आहे. ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण येथे करणार आहोत.

क्र.चिन्हाचे नावचिन्ह कार्यउदाहरणे
१.पूर्णविराम. १) वाक्य पूर्ण झाले की हे चिन्ह देतात. माझे काम पूर्ण झाले.
२) एखाद्या शब्दाचे संक्षिप्त रूप दाखविण्यासाठी याचा उपयोग होतो. स.न.वि.वि., उदा.
२.अर्धविराम; एकाच प्रकारची उपवाक्य जोडण्यासाठी हे चिन्ह देतात.तो आला; त्याने पहिले; त्याने जिंकले.
३.स्वल्पविराम, १) संबोधना नंतर हे चिन्ह देतात.मित्रा, हे काम करशील का?
२) दोन किंवा अधिक वाक्य वेगळी दर्शविण्यासाठी.पावसामुळे सारी सृष्टी आनंदित झाली, कोकिळा गाऊ लागली, गायी हंबरू लागल्या.
३) एकाच आशयाचे शब्द किंवा गट एकानंतर एक आल्यास. आम्ही बागेत पक्षी, झाडे, रोपटी, स्मारके आणि फुलपाखरू पहिले.
४.प्रश्नचिन्ह? १) प्रश्न असलेल्या वाक्याच्या शेवटी हे चिन्ह देतात.तू काय करतोस ?
२) आश्चर्य वा नाराजी व्यक्त करण्यासाठी ही, हे चिन्ह देतात. काय म्हणतोस ?
३) साशंका व्यक्त करण्यासाठी कंसात हे चिन्ह वापरतात.करण माझ्याशी स्नेहाने (?) बोलतो.
५.उद्गार चिन्ह! १) आनंद, आश्चर्य, दुःख अश्या भावना व्यक्त करण्यासाठी हे चिन्ह देतात.➭ वा! किती छान आहे हे.
➭ अरेरे! किती वाईट झाले हे.
२) कधी-कधी अचानक वेदनात्मक किंवा भीतीच्या भावना व्यक्त करताना हे चिन्ह देतात. ➭ अग आई ग!
➭ अरे देवा!
➭ अबब! किती मोठा साप हा.
६.अपूर्णविराम/ व्दिबिंदू चिन्ह: क्रम किंवा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास हे चिन्ह देतात.स्पर्धेत भाग घेणाऱ्यांची नावे : वेदांती, भावी, ग्रीष्मा, तन्मयी, हर्षल.
७.संयोग चिन्ह - दोन किंवा अधिक शब्द जोडण्यासाठी हे चिन्ह देतात.➭ आमच्या शिक्षकांचे वय चाळीस-पंचेचाळीस असेल.
➭ साहित्य-संस्कृती-मंडळ; मुंबई-पुणे रास्ता.
८.अपसारण चिन्ह
(हे चिन्ह संयोग चिन्हांपेक्षा दुप्पट लांब असते.)
बोलत असताना पुढचे बोलण्यास अवघड वाटत असल्यास किंवा वाक्य खंडित झाल्यास हे चिन्ह देतात.➭ विजयने आम्हास मित्राची – महेशची – गोष्ट सांगितली.

➭ मला तुला किही सांगायचे आहे. पण –
९.अधोरेखा शब्द एखादे शब्द किंवा वाक्याकडे वाचकाचे लक्ष वेधण्यासाठी असे अधोरेखित करतात. वाक्य महत्वाचे दर्शविण्यासाठी ही असे करतात. ➭ स्वर व व्यंजन मिळून अक्षरतयार होते.

छापील मजकुरात वाक्य अधोरेखित करण्या ऐवजी जाड (bold) अक्षरात लिहितात.
१०.विकल्प चिन्ह / वाक्यात दोन किंवा अधिक विकल्प दर्शविण्यासाठी हे चिन्ह देतात.बाबा माझ्यासाठी येताना पेन/ पेन्सिल/ वही/ पुस्तक आणा.
११.एकेरी अवतरण चिन्ह ' ' एखाद्या शब्दाचे विशेष स्पष्टीकरण द्यायचे झाल्यास ते नाव या चिन्हात लिहितात. ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ लिहिला.
१२.दुहेरी अवतरण चिन्ह" " १) लेखनात पात्राच्या तोंडचे वाक्य वा पूर्ण संवाद द्यावयाचा असल्यास या चिन्हात लिहितात. ➭ राजेश म्हणाला "तुझ्यासाठी हेच उत्तम आहे."
१३.लोपचिन्ह ... वाक्य अपूर्ण असेल, पुढचे नीट सांगता येत नसेल किंवा पुढे सांगायची आवश्यता नसेल तर हे चिन्ह देतात. मला तुला काही सांगायचे आहे... पण पुन्हा केंव्हा तरी....
१४.फुल्या xxx वाक्यात अपशब्द लिहिताना अवघड वाटल्यास हे चिन्ह देतात. xxx, पुन्हा तसंच केलास ना.
१५.काकपद^ लेखनात एखादा शब्द वा वाक्य लिहायचे राहून गेल्यास हे चिन्ह देऊन तो मजकूर लिहितात. सुंदर
तो खूप ^ होता.
१६.वरीलप्रमाणे ।। जेव्हा वरच्या ओळीतील शब्द खालच्या ओळीत पुन्हा लिहावयाचे असल्यास हे चिन्ह देतात. ती तुझी वही आहे.
ती माझी ।। ।।
१७.गोल कंस ( ) आशयाचा ओघ थांबवून त्यात अधिक भर घालावयाची असल्यास हे कंस वापरतात. दशरथाच्या तीन राण्या होत्या, कौसल्या (पहिली), सुमित्रा (दुसरी) आणि कैकयी (तिसरी).
१८.चौकोनी कंस [ ] एकापेक्षा अधिक कंसांचा उपयोग कायवयाचा असल्यास हे कंस वापरतात. [निबंध लिहिताना लक्षात ठेवण्याचे नियम (उदाहरणासह) पुढे दिले आहेत]
१९.महिरपी कंस { } एकापेक्षा अधिक कंसांचा उपयोग कायवयाचा असल्यास हे ही कंस वापरतात. लेखनात हा कंस खूप कमी वापरला जातो. { वर्गात पाळावयाचे नियम (स्पष्टीकरणासह) पुढे दिले आहेत }
Check our Craft Channel

About Smart School Infolips

From Smart School