Kriyapad in Marathi - Smart School

वाक्य व त्याचे प्रकार (Types of Sentence):

मराठी भाषेची सुरुवात ही स्वर आणि व्यंजन यापासून होते. स्वर व व्यंजन मिळून अक्षर तयार होते. अक्षरं एकत्र येऊन शब्द तयार होतात. अश्या शब्दांच्या रचना करून तयार केलेल्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात.

वाक्यात शब्दांची रचना अर्थपूर्णअसेल तरच त्याला आपण वाक्य असे म्हणतो.
या शब्दाचा संचामध्ये कर्ता, कर्म, प्रश्न, उद्गार, आज्ञा आणि कधीकधी एक किंवा अधिक गौण वाक्य असतात. हे वाक्य पूर्णविराम किंवा प्रश्नचिन्हासह समाप्त होते.
अर्थपूर्ण वाक्यातील प्रत्येक शब्दाचा संबंध त्याच्या इतर शब्दांशी (पदाचा) असतो. वाक्यातील अश्या शब्दांच्या आठ जाती आहेत, यात चार विकारी व चार अविकारी.
विकारी शब्दांमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. अविकारी शब्दांमध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय. नाम व सर्वनाम हे वाक्यातील कर्ता असतात. कर्ता व क्रियापद हे वाक्यातील मुख्ये पद असतात. क्रियापदानुसार वाक्यात कर्म जोडलं जाते.

मराठीत वाक्याचे दोन प्रकार आहेत :

अ) अर्थावरून पडणारे प्रकार
आ) स्वरूपावरुन पडणारे प्रकार

१) अर्थावरून वाक्याचे प्रकार :

१) विधानार्थी वाक्य :
ज्या वाक्यात कर्त्या सोबत साधारण विधान केले जाते, त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा .
१) मी मराठी बोलतो.
२) भावी खूप छान आहे.
३) निल पुस्तक वाचतो.

२) प्रश्नार्थी वाक्य :
ज्या वाक्यात कर्त्याने प्रश्न विचारला जातो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा. :
१) तू अभ्यास केला का ?
२) तू गाणे कधी शिकलास ?
३) वेदांती कोणते चित्र काढते ?

३) आज्ञार्थी वाक्य :
ज्या वाक्यामधून आज्ञा, उपदेश, विनंती, आशीर्वाद, प्रार्थना ई. भावनांचा बोध होतो त्या वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा.
१) देव तुझे कल्याण करो - आशीर्वाद
२) कोणी आवाज करू नका. -विनंती
३) हे ईश्वरा सर्वांचं कल्याण कर.- प्रार्थना
४) तो आवाज आधी बंद कर. - आज्ञा
५) कधी खोटे बोलू नये - उपदेश

४) उद्गारार्थी वाक्य :
ज्या वाक्यामध्ये कर्त्याच्या मनातील भावनां व्यक्त केल्या जातात, त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा.
१) अबब ! किती मोठा पराक्रम हा.
२) शाब्बास ! अखेर तू करून दाखवलंस.
३) वा ! तुझ्या सारखा तूच.

५) नकारार्थी वाक्य :
ज्या वाक्यामधून स्पष्टपणे नकार दर्शविला जातो त्या वाक्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा.
१) मला चहा आवडत नाही.
२) मला स्वस्थ बसने रुचत नाही.
३) आई कधी अराम करत नाही.

६) होकारार्थी वाक्य :
ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्या वाक्यास होकारार्थी वाक्य असे म्हणतात .

उदा .
१) मला खेळायला खूप आवडते.
२) वेदांती अभ्यास करत आहे.
३) रुद्र आता खूप बोलू लागला आहे.

७) संकेतार्थी वाक्य :
जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली तर दुसरी गोष्ट घडेल असे संकेत दिले जातात, त्या वाक्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा.
१) जर मेहनत केली तरच यश मिळेल.
२) लक्ष देऊन काम केले असते तर नुकसान टळले असते.
३) जर यावर्षी पाऊस पडला तर चांगले पीक येईल.


आ) स्वरूपावरुन/ रचनेवरून वाक्याचे प्रकार :

१) सरल (शुद्ध ) वाक्य :
ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व विधेय असतो, त्या वाक्यास सरळ किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात.

उदा.
१) भावी भात खाते.
२) अमित क्रिकेट खेळतो.
३) दिलीप पुस्तक वाचतो.

२) संयुक्त वाक्य :
जी दोन किंवा अधिक सरळ वाक्य ही उभयान्वि अव्ययांनी जोडली जातात, त्या वाक्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात.

उदा.
१) विजा चमकू लागल्या आणि वाराही सुटला.
२) देशात भ्रष्टाचार वाढला तशी बेकारी वाढली.
३) मी ते काम केले तासा वाद सुटला.

३) मिश्र वाक्य :
जेव्हा वाक्यातील एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य ही उभयान्वि अव्ययाने जोडलेली असतात, ते हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात.

उदा.
१) पुढे चांगलं शिकावं म्हणून तो शहरात गेला.
२) तो मुंबईला आला आणि प्रसिद्ध झाला.
३) सचिनने चांगले निर्णय घेतले म्हणून भारत जिंकला.

Nouns : The name given to a people, objects, birds.... Read more...

Check our Craft Channel

About Smart School Infolips

From Smart School