Vachan v tyache Prakar Smart School Infolips

वचन व त्याचे प्रकार (Number) :

वाक्यातील नामाने दर्शवलेली वस्तु एक आहे की अनेक आहेत याचा बोध होतो यालाच वचन असे म्हणतात.

➽ वचनाचे प्रकार :

मराठी भाषेत वचनाचे दोन प्रकार आहेत.

१] एकवचन
२] अनेकवचन


१) एकवचन :
ज्या नामाव्दारे व्यक्ती किंवा वस्तू एकच आहे असा बोध होतो त्या नामास एकवचन समजले जाते.

उदा. : पान, माणूस, पेन, पुस्तक, झाड इ.

२) अनेकवचन :
ज्या नामाव्दारे व्यक्ती किंवा वस्तू एकापेक्षा जास्त आहेत असा बोध होतो त्या नामास अनेकवचन समजले जाते.

उदा. : मुले, इमारती, जाडे, पाने, पुस्तके इ.


वचनामुळे नामांच्या रूपात होणारे बदलांचे नियम पाहू :

नियम - १

‘आ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त मध्ये होतात :
➥ मुलगा – मुलगे
➥ कपडा – कपडे
➥ बगळा – बगळे
➥ आंबा – आंबे
➥ चेहरा – चेहरे

‘आ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन तसेच राहते :
➥ भाषा – भाषा
➥ विद्या – विद्या
➥ दिशा – दिशा
➥ सभा – सभा

नियम - २
‘आ’ कारान्त शिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाचे रुपे दोन्ही वचनात सारखीच राहतात :
➥ थेंब – थेंब
➥ देव – देव
➥ कवी – कवी
➥ वर्ग – वर्ग
➥ शिक्षक – शिक्षक

Nouns : The name given to a people, objects, birds.... Read more...

नियम - ३
‘ई’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन ‘या’ कारान्त मध्ये होतात :
➥ नदी – नद्या
➥ टोपी – टोप्या
➥ गाडी – गाड्या
➥ यादी – याद्या
➥ पगडी – पगड्या

नियम - ४
‘ऊ’ कारान्त स्त्रीलिंगी अनेक वचन ‘वा’ कारान्त मध्ये होतात :
➥ जाऊ – जावा
➥ सासू – सासवा
➥ ऊ – ऊवा
➥ पीसु – पीसवामराठी  विशेषण Quiz

-: छोटी प्रश्नोत्तरी :-

खालील छोटी प्रश्नोत्तरी सोबत आपण किती समजले त्याचे परीक्षण करूया.

➤ वचनाच्या प्रकारावर दोन प्रकारे प्रश्न विचारले जातात :

⟴ अ) वचन बदला - यात दिलेल्या वाचनामध्ये बदल करायचे असते.
⟴ आ) वचन ओळखा - यात दिलेल्या वाचनाचा प्रकार लिहायचा असतो.

➤ खालील शब्दांचे वचन बदला :

१) आवड
आवडे
आवडी

२) जंगल
जंगले
जंगली

३) चिमणी
चिमणे
चिमण्या

४) स्त्रिया
स्त्री
स्त्रियां

➤ खालील शब्दांच्या वचनाचा प्रकार ओळखा :

५) इमारत
अनेकवचन
एकवचन

६) पगड्या
अनेकवचन
एकवचन

७) पुस्तके
अनेकवचन
एकवचन

८) सहल
अनेकवचन
एकवचनYour score is:

Correct answers:


Check our Craft Channel

About Smart School Infolips

From Smart School