Samanyarupe, Vibhakti-Smart School Infolips

उपसर्ग व प्रत्यय :


उपसर्ग (Prefix) :

मूळ धातूच्या आधी जी अक्षरे किंवा शब्द जोडली जातात त्यांना 'उपसर्ग' असे म्हणतात.

➽ अ, आ, ना, कु, सु, सं, वि, गैर, अप, बिन, परी, उप, प्र इ. हे उपसर्ग आहेत.
➽ उपसर्ग जोडून तयार होणार्‍या शब्दांना 'उपसर्गघटित शब्द' असे म्हणतात.

उदा. :
➤ गैरहजर ⇒ गैर + हजर ↦ येथे 'हजर' या मूळ शब्दाआधी 'गैर' हे उपसर्ग जोडले.
➤ अपयश ⇒ अप + यश
➤ बिनचूक ⇒ बिन + चूक
➤ सुगंध ⇒ सु + गंध
➤ उपहार ⇒ उप + हार
➤ प्रतिकार ⇒ प्रति + कार
➤ संहार ⇒ सं + हार


प्रत्यय (Suffix) :

मूळ धातूच्या नंतर जी अक्षरे किंवा शब्द जोडली जातात त्यांना 'प्रत्यय' असे म्हणतात.

➽ न, क, करी, कडे, भर, ता, दार, वर, वान, नी, पण, पणा, य, ऊन इ. हे प्रत्यय आहेत.
➽ प्रत्यय जोडून तयार होणार्‍या शब्दांना 'प्रत्ययघटित शब्द' असे म्हणतात.

उदा. :
➤ बाळासाठी ⇒ बाळा + साठी ↦ येथे 'बाळा' या मूळ शब्दाच्या पुढे 'साठी' हे प्रत्यय जोडले.
➤ नदीकडे ⇒ नदी + कडे
➤ झाडावर ⇒ झाडा + वर
➤ जनता ⇒ जन + ता
➤ दुकानदार ⇒ दुकान + दार
➤ शहाणपणा ⇒ शहाण + पणा

Nouns : The name given to a people, objects, birds....

Read more...

मराठी  विशेषण Quiz

-: छोटी प्रश्नोत्तरी :-

खालील छोटी प्रश्नोत्तरी सोबत आपण किती समजले त्याचे परीक्षण करूया.

अ) योग्य उपसर्ग जोडून शब्द तयार करा :
१) प्रामाणिक

गैर
अप

२) प्रचार

सु
अप

३) विरोध
बिन
गैर
अप

४) प्रसिद्ध
बिन
कु
गैर

आ) योग्य प्रत्यय जोडून शब्द तयार करा :
५) वर्ष
वान
भर
पणा

६) शेत
पु
पणा
करी

७) शाळा
पासून
ऊन
पणा

८) गाडी
दार
वान
पणाYour score is:

Correct answers:

Check our Craft Channel

About Smart School Infolips

From Smart School