पक्षी हा संतुलित पर्यावरणाचं अविभाज्य घटक आहे टीप लिहा :

पक्षी हा संतुलित घटक खरचं पक्षी हा संतुलित पर्यावरणाचं अविभाज्य घटक आहे. आज आपणच आपल्या सृष्टीला नष्ट करत आहोत, त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्राणी व पक्षी दोन्ही हि जबाबदार आहेत.

पशु व पक्षी हे दोघे पर्यावरणाचे अविभाज्य घटक आहेत. पशु हे जमिनीवर राहतात तर पक्षी हे आकाशात उडतात. म्हणजेच आकाशात उडणाऱ्या सजीव गोष्टी ज्यांना पिसे आणि पंख आहेत त्यांना पक्षी म्हणतात येईल. पक्षी हा अन्न साखळीतील दुय्यम भक्षक आहे, तर काही अन्न साखळीत सर्वोच्च भक्षक आहे.


पक्षी हे पर्यावरणात बीजप्रसारणाचे काम करतात. कधी ते परागीभवनाचे काम करतात, तर कधी छोट्या-छोट्या कीड मुंगी पासून मोठ्या-मोठ्या मृत पशूंना खाऊन पर्यावरण साफ करण्याचे काम पक्षी करत असतात. तसेच कीडी आणि कीटकांना खाण्याचे काम हि, हे पक्षी करतात. हेच कीटक पिकांची नास धूस करतात, त्यामुळे पिकांचे संरक्षण होते.

अश्या प्रकारे पक्षी हे पर्यावरणात बऱ्याच ठिकाणी योग्य ती भूमिका पार पडतात व पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी कळत-नकळत मदत करत असतात. म्हणूनच पक्षी हा संतुलित पर्यावरणाचे एक अविभाज्य घटक आहे.

Check our Craft Channel

About Smart School InfolipsComplete the surveys and make money on Swagbucks

Craft

Are you confuse to select a smart phone, please click below and confirm your decision

Craft

From Smart School