Shabdanchya Jati Smart School Infolips

शब्दांच्या जाती (शब्दांचे प्रकार) - Parts of Speech :


मराठी व्याकरण योग्य रीतीने समजून घेण्यासाठी शब्दांच्या जाती माहीत असणे आवश्यक आहे.

मुख्यतः शब्दांच्या दोन जाती आहेत :

अ) विकारी
ब) अविकारी

अ) विकारी :

ज्या शब्दांमध्ये लिंग, वचन व विभक्ती मुळे बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात.

विकारी शब्दांच्या चार जाती आहेत :

१) नाम (Noun) :

उदा : भावी,नदी, आकाश, हुशारी, वृक्ष, देश, घर, बाग, मंदिर, शाळा, बंगला इ.

२) सर्वनाम (Pronoun) :

उदा : मी, तो, ती, ते, हा, हि, हे, कोण, कोणी, कोणाला, जो, जी, जे इ.

३) विशेषण (Adjective) :

उदा : हुशार, गोरा, श्रीमंत, महान, विशाल, चांगला, प्रसिद्ध, मजेदार, इ.

➤ पण काही विशेषणे अविकारी आहेत - उदा. : कडू, दहा, बारा, किमती इ.

४) क्रियापद (Verb) :

उदा : जाणे, गेला, पाहणे, बघणे, पळणे, धावणे, हसणे, रडणे, खेळणे, वाचणे इ.


ब) अविकारी (अव्यये) :

ज्या शब्दांमध्ये लिंग, वचन व विभक्ती मुळे कोणताही बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द असे म्हणतात. अविकारी शब्दांच्या चार जाती आहेत :

५) क्रियाविशेषण अव्यय (Adverb) :

उदा : हळू, पटकन, पूर्वी, फार, आधी, तिकडे, सर्वदूर, मागे, इथे, कमी, भरपूर इ.

६) उभयान्वयी अव्यय (Conjuntion) :

उदा : आणि, तर, पण, किंवा, तरी, व, परंतु, म्हणून, वा, शिवाय, म्हणजे इ.


७) शब्दयोगी अव्यय (Preposition) :

उदा : वर, कडे, पेक्षा, खाली, बाहेर, पर्यंत, हि, आत, वरून, आतील, आतून इ.

८) केवलप्रयोगी अव्यय (Interjection) :

उदा : वा !, अहाहा !, अरेरे !, अबब !, आग !, आईग !, बापरे !, शाब्बास !, अच्छा !, छी !, अरेच्या ! इ.

Check our Craft Channel

About Smart School Infolips


Complete the surveys and make money on Swagbucks

Craft

Are you confuse to select a smart phone, please click below and confirm your decision

Craft

From Smart School