types of Pronouns-Smart School

सर्वनामाचे प्रकार :

१] पुरुषवाचक सर्वनाम
२] दर्शक सर्वनाम
३] संबंधी सर्वनाम
४] प्रश्नार्थक सर्वनाम
५] सामान्य सर्वनाम/ अनिश्चित सर्वनाम
६] आत्मवाचक सर्वनाम


१] पुरुषवाचक सर्वनाम (Personal Pronouns):

पुरुषवाचक सर्वनामाचे तीन उपप्रकार पडतात. कारण साधारणता संभाषण कींवा लिखाण हे तीन घटकात होते, एक स्वतः विषयी बोलणारे, दोन ज्याच्याशी बोलतो ते आणि तीन ज्यांच्या विषयी बोलतो ते. हे तिन्ही वर्ग पुरुष गटात येतात म्हणून या सर्वनामांना 'पुरुषवाचक सर्वनाम' असे म्हणतात.

अ] प्रथमपुरुषवाचक सर्वनाम :(First Person Pronouns) :
ज्या सर्वनामाचा उपयोग आपण स्वत:विषयी बोलतांना किंवा लिहितांना करतो त्या सर्वनामाला 'प्रथमपुरुषवाचक सर्वनाम' असे म्हणतात.

उदा. : मी, मला, आम्ही, माझा, आपण, आमचे, स्वतः इ.

मी वाचायला शिकलो.
आम्ही आज एकत्र खेळलो.


आ] द्वितीयपुरुषवाचक सर्वनाम :(Second Person Pronouns) :
ज्या सर्वनामाचा उपयोग आपण समोर बोलण्याऱ्या व्यक्तिचा उल्लेख करण्यासाठी करतो त्या सर्वनामाला 'द्वितीयपुरुषवाचक सर्वनाम' असे म्हणतात.


उदा. : तू, तुला, तुम्ही, तुझा, तुमचे, आपण, स्वतः इ.

तू कोठे चालला आहेस?
तुम्ही आमच्या सोबत खेळाल?


इ] तृतीयपुरुषवाचक सर्वनाम :(Third Person Pronouns) :
ज्या सर्वनामाचा उपयोग आपण एखाद्या त्रयस्थ व्यक्ति कींवा वस्तू यांचा उल्लेख करण्यासाठी करतो त्या सर्वनामाला 'तृतीयपुरुषवाचक सर्वनाम' असे म्हणतात.


उदा. : तो, ती, त्या, ते, त्यांचे, त्याला, त्यांना इ.

तो खूप मस्ती करतो.
त्यांना हे सर्व माहित आहे.


२] दर्शक सर्वनाम :

ज्या सर्वनामाचा उपयोग जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी करतो त्या सर्वनामाला 'दर्शक सर्वनाम' असे म्हणतात.


उदा. : हा, ही, हे, तो, ती, ते इ.

हे घर सुरेख आहे.
ते झाड खूप उंच आहे.


३] संबंधी सर्वनाम :

ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात पुढे येणार्‍या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविण्यासाठी करतो त्या सर्वनामाला 'संबंधी सर्वनाम' असे म्हणतात.


उदा. : जे, ज्या, जो, जी इ.
– ह्या सर्वनामांचा उपयोग मिश्र वाक्यातच होतो.

जो जे वांचेल तो ते लाभो प्राणीजात.
जे असेल ते मिळेल.


४] प्रश्नार्थक सर्वनाम :

प्रश्न विचारण्यासाठी वाक्यात ज्या सर्वनामाचा उपयोग केला जातो त्या सर्वनामाला 'प्रश्नार्थक सर्वनाम' असे म्हणतात.

उदा. : कोण, काय, कोणी, कोणाला, कोणास, किती, कोणाचा इ.

तू कोणाचा अभ्यास केला?
तुला कोणी सांगितले?


५] सामान्य सर्वनाम/ अनिश्चित सर्वनाम :

जो प्रश्नार्थक सर्वनाम वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी उपयोग न होता कोणत्या नामांबद्दल आला आहे हे निश्चित सांगता येत नाही त्या सर्वनामाला 'सामान्य कींवा अनिश्चित सर्वनाम' असे म्हणतात.

उदा. : कोण, काय इ.

काय ही गर्दी.
कोणी कोणास काही सांगु नये.


६] आत्मवाचक सर्वनाम :

ज्या सर्वनामाचा उपयोग आपण ‘स्वतः’ कींवा इतर ‘स्वतः’ या अर्थाने नाम कींवा मूळ सर्वनामा नंतर केला जातो त्या सर्वनामाला 'आत्मवाचक सर्वनाम' असे म्हणतात.


उदा. : आपण, स्वतः इ.

मी स्वतः हे करून पाहिले आहे.
तू स्वतः हे करून दाखवशील.


सर्वनामा विषयी अधिक माहिती :

- मूळ सर्वनामे : मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः इ.
- या सर्वनामां पैकी काही वचनानुसार तर काही लिंगानुसार बदलतात.


Nouns : The name given to a people, objects, birds.... Read more...

* वचनानुसार बदलणारी सर्वनामे :

मी : आम्ही
तू : तुम्ही
तो : तो, ती, ते (एकवचनी)..... ते, ती, त्या (अनेकवचनी)
हा : हा, ही, हे (एकवचनी)..... हे, ही, ह्या (अनेकवचनी)
जो : जो, जी, जे (एकवचनी)..... जे, जी, ज्या (अनेकवचनी)


* लिंगानुसार बदलणारी सर्वनामे :

तो : तो, ती, ते
हा : हा, ही, हे
जो : जो, जी, जे* सामान सर्वनामे :

काही सर्वनामे पुरुषवाचक व आत्मवाचक सर्वनामात उपयोगात येतात उदा. : आपण

आपण : पुरुषवाचक ‘आपण’ हे केवळ अनेकवचनात येते, हे ‘आम्ही’ व ‘तुम्ही’ या अर्थाने उपयोगात येते.

आपण :आत्मवाचक ‘आपण’ हे ‘स्वतः’ या अर्थाने येते.

मराठी  विशेषण Quiz

-: छोटी प्रश्नोत्तरी :-

खालील छोटी प्रश्नोत्तरी सोबत आपण किती समजले त्याचे परीक्षण करूया.

अ) खालील वाक्यातून योग्य ती सर्वनामे ओळखा :

१) जे असेल ते मिळेल.
दर्शक सर्वनाम
प्रश्नार्थक सर्वनाम
संबंधी सर्वनाम
आत्मवाचक सर्वनाम

२) तुला कोणी सांगितले?
प्रथमपुरुषवाचक सर्वनाम
प्रश्नार्थक सर्वनाम
तृतीयपुरुषवाचक सर्वनाम
दर्शक सर्वनाम

३) हे घर सुरेख आहे.
आत्मवाचक सर्वनाम
प्रश्नार्थक सर्वनाम
प्रथमपुरुषवाचक सर्वनाम
दर्शक सर्वनाम

४) तू कोठे चालला आहेस?
द्वितीयपुरुषवाचक सर्वनाम
प्रश्नार्थक सर्वनाम
दर्शक सर्वनाम
प्रथमपुरुषवाचक सर्वनाम

५) जो जे वांचेल तो ते लाभो प्राणीजात.
प्रथमपुरुषवाचक सर्वनाम
आत्मवाचक सर्वनाम
तृतीयपुरुषवाचक सर्वनाम
संबंधी सर्वनाम

६) कोणी कोणास काही सांगु नये.
तृतीयपुरुषवाचक सर्वनाम
सामान्य सर्वनाम
प्रथमपुरुषवाचक सर्वनाम
प्रश्नार्थक सर्वनाम

७) त्यांना हे सर्व माहित आहे.
आत्मवाचक सर्वनाम
प्रथमपुरुषवाचक सर्वनाम
तृतीयपुरुषवाचक सर्वनाम
बलवान

८) ते झाड खूप उंच आहे.
दर्शक सर्वनाम
आत्मवाचक सर्वनाम
प्रश्नार्थक सर्वनाम
प्रथमपुरुषवाचक सर्वनाम

९) मी स्वतः हे करून पाहिले आहे.
दर्शक सर्वनाम
प्रथमपुरुषवाचक सर्वनाम
आत्मवाचक सर्वनाम
तृतीयपुरुषवाचक सर्वनाम

१०) आम्ही आज एकत्र खेळलो.
दर्शक सर्वनाम
प्रश्नार्थक सर्वनाम
आत्मवाचक सर्वनाम
प्रथमपुरुषवाचक सर्वनामYour score is:

Correct answers:
Check our Craft Channel

About Smart School Infolips

From Smart School