Sarvanaam Smart School Infolips

सर्वनाम :

वाक्यात नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास 'सर्वनाम' असे म्हणतात.
उदा. : तो, ती, ते, हा, हि, हे, त्याने, त्याचे, त्याला, ह्याने, ह्याचे, ह्याला इ.

* एखाद्या वाक्यात किंवा परिच्छेदात पुन्हा-पुन्हा नाम येत असेल तर त्या नामाचा वारंवार उच्चार टाळण्यासाठी नामाच्या ऐवजी जे शब्द आपण वापरतो त्या शब्दांना 'सर्वनाम' असे म्हणतात.
* खरं तर सर्वनामांच्या शब्दांना स्वतःचा अर्थ नसतो, ते ज्या नामांबद्दल उपयोगात येतात त्यांना त्या नामचा अर्थ प्राप्त होतो.
* वाक्यात सर्वनामाचा उपयोग करण्या आधी तो ज्या नामासाठी उपयोगात येणार आहे त्या नामाचा उल्लेख करणे आवश्यक असते. एक सर्वनाम हा बऱ्याच नामां साठी वापरता येतो. जसे 'तो' हा सर्वनाम राम, देश, थवा, मुलगा, घोळका, रस्ता अशा बऱ्याच प्रकारच्या नामाबद्दल वापरता येतो.

* खाली काही वाक्यांचे उदाहारण पाहु म्हणजे आपल्या लगेच लक्षात येईल :


१) आकाश शाळेत जातो.
आकाश खेळत आहे.
आकाश मित्रांना मदत करतो.
आकाश पोहायला शिकला आहे.

वरील परिच्छेदात 'आकाश ' हे नाम वारंवार आले आहे,
ते टाळण्यासाठी आपण खालील बदल करू.

२) आकाश शाळेत जातो.
तो खेळत आहे.
तो मित्रांना मदत करतो.
तो पोहायला शिकला आहे.

वरील परिच्छेद-२ मध्ये 'तो' हा सर्वनाम उपयोगात आला आहे जो परिच्छेद-१ मधील 'आकाश ' ह्या नाम ऐवजी वापरण्यात आला. म्हणजेच वाक्याचा अर्थ न बदलता नाम 'आकाश' च्या जागी 'तो' हा सर्वनाम वापरून नामाची वारंवारता टाळली व वाक्य शुद्ध केले.


थोडक्यात : परिच्छेदातील वाक्यात नामाची पुनरावृत्ती टाळण्याकसाठी उपयोगात येणाऱ्या शब्द म्हणजे 'सर्वनाम' होय.
Check our Craft Channel

About Smart School Infolips

From Smart School